আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
7 : 29

وَالَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ لَنُكَفِّرَنَّ عَنْهُمْ سَیِّاٰتِهِمْ وَلَنَجْزِیَنَّهُمْ اَحْسَنَ الَّذِیْ كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

७. आणि ज्यांनी ईमान बाळगले आणि (पैगंबर आचरणच्या दृष्टीने) सत्कर्म केले, आम्ही त्यांच्या सर्व अपराधांना त्यांच्यापासून दूर करू, आणि त्यांच्या नेक कामांचा चांगला मोबदला प्रदान करू. info
التفاسير:

external-link copy
8 : 29

وَوَصَّیْنَا الْاِنْسَانَ بِوَالِدَیْهِ حُسْنًا ؕ— وَاِنْ جٰهَدٰكَ لِتُشْرِكَ بِیْ مَا لَیْسَ لَكَ بِهٖ عِلْمٌ فَلَا تُطِعْهُمَا ؕ— اِلَیَّ مَرْجِعُكُمْ فَاُنَبِّئُكُمْ بِمَا كُنْتُمْ تَعْمَلُوْنَ ۟

८. आम्ही प्रत्येक माणसाला आपल्या माता-पित्याशी सद्‌वर्तन करण्याची शिकवण दिली आहे. तथापि जर ते हा प्रयत्न करतील की तुम्ही माझ्यासोबत त्याला सहभागी करून घ्यावे, ज्याचे तुम्हाला ज्ञान नाही तर त्यांचे म्हणणे मान्य करू नका. तुम्हा सर्वांना परतून माझ्याचकडे यायचे आहे, मग मी त्या प्रत्येक गोष्टीशी, जी तुम्ही करीत होते अवगत करवीन. info
التفاسير:

external-link copy
9 : 29

وَالَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ لَنُدْخِلَنَّهُمْ فِی الصّٰلِحِیْنَ ۟

९. आणि ज्या लोकांनी ईमान कबूल केले, आणि सत्मर्क करीत राहिले त्यांना आम्ही आपल्या नेक (सदाचारी) दासांमध्ये सामील करू. info
التفاسير:

external-link copy
10 : 29

وَمِنَ النَّاسِ مَنْ یَّقُوْلُ اٰمَنَّا بِاللّٰهِ فَاِذَاۤ اُوْذِیَ فِی اللّٰهِ جَعَلَ فِتْنَةَ النَّاسِ كَعَذَابِ اللّٰهِ ؕ— وَلَىِٕنْ جَآءَ نَصْرٌ مِّنْ رَّبِّكَ لَیَقُوْلُنَّ اِنَّا كُنَّا مَعَكُمْ ؕ— اَوَلَیْسَ اللّٰهُ بِاَعْلَمَ بِمَا فِیْ صُدُوْرِ الْعٰلَمِیْنَ ۟

१०. आणि काही लोक असेही आहेत, जे तोंडाने म्हणतात की आम्ही ईमान राखले आहे. परंतु जेव्हा अल्लाहच्या मार्गात एखाद्या दुःखाचा सामना होतो, तेव्हा लोकांकडून दिला जाणाऱ्या कष्ट- यातनेला अल्लाहच्या शिक्षा- यातनेसमान ठरवितात, परंतु जर अल्लाहची मदत येऊन पोहचली तर तेव्हा म्हणू लागतात की आम्ही तर तुमच्याच साथीला आहोत, काय समस्त विश्वा (माणसांच्या) मनात जे काही आहे, ते अल्लाह जाणत नाही? info
التفاسير:

external-link copy
11 : 29

وَلَیَعْلَمَنَّ اللّٰهُ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَلَیَعْلَمَنَّ الْمُنٰفِقِیْنَ ۟

११. आणि ज्या लोकांनी ईमान राखले, अल्लाह त्यांनाही जाणून घेतल्याविना राहणार नाही आणि ईमानधारक असण्याचे ढोंग रचणाऱ्यांनाही जाणून घेतल्याविना राहणार नाही. info
التفاسير:

external-link copy
12 : 29

وَقَالَ الَّذِیْنَ كَفَرُوْا لِلَّذِیْنَ اٰمَنُوا اتَّبِعُوْا سَبِیْلَنَا وَلْنَحْمِلْ خَطٰیٰكُمْ ؕ— وَمَا هُمْ بِحٰمِلِیْنَ مِنْ خَطٰیٰهُمْ مِّنْ شَیْءٍ ؕ— اِنَّهُمْ لَكٰذِبُوْنَ ۟

१२. आणि काफिर (सत्य विरोधक) ईमान राखणाऱ्यांना म्हणाले, तुम्ही आमच्या मार्गाचे अनुसरण करा, तुमचे अपराध आम्ही आपल्या (शिरा) वर घेऊ, वास्तविक ते त्यांच्या अपराधांपैकी काही एक आपल्यावर घेणार नाहीत. ते तर अगदी खोटारडे आहेत. info
التفاسير:

external-link copy
13 : 29

وَلَیَحْمِلُنَّ اَثْقَالَهُمْ وَاَثْقَالًا مَّعَ اَثْقَالِهِمْ ؗ— وَلَیُسْـَٔلُنَّ یَوْمَ الْقِیٰمَةِ عَمَّا كَانُوْا یَفْتَرُوْنَ ۟۠

१३. (एवढे निश्चित की) हे आपले ओझे उचलतील आणि आपल्या ओझ्यांसोबत इतर ओझे देखील, आणि ते जे काही असत्य रचत आहेत त्या सर्वांबाबत त्यांना विचारणा केली जाईल. info
التفاسير:

external-link copy
14 : 29

وَلَقَدْ اَرْسَلْنَا نُوْحًا اِلٰی قَوْمِهٖ فَلَبِثَ فِیْهِمْ اَلْفَ سَنَةٍ اِلَّا خَمْسِیْنَ عَامًا ؕ— فَاَخَذَهُمُ الطُّوْفَانُ وَهُمْ ظٰلِمُوْنَ ۟

१४. आणि आम्ही नूह (अलै.) ला त्यांच्या जनसमूहाकडे पाठविले, ते त्यांच्या दरम्यान साडे नऊशे वर्षांपर्यंत राहिले, मग त्यांना वादळाने येऊन धरले आणि ते होतेच मोठे अत्याचारी. info
التفاسير: