আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
54 : 24

قُلْ اَطِیْعُوا اللّٰهَ وَاَطِیْعُوا الرَّسُوْلَ ۚ— فَاِنْ تَوَلَّوْا فَاِنَّمَا عَلَیْهِ مَا حُمِّلَ وَعَلَیْكُمْ مَّا حُمِّلْتُمْ ؕ— وَاِنْ تُطِیْعُوْهُ تَهْتَدُوْا ؕ— وَمَا عَلَی الرَّسُوْلِ اِلَّا الْبَلٰغُ الْمُبِیْنُ ۟

५४. सांगा, अल्लाहच्या आदेशाचे पालन करा, पैगंबरांचे आज्ञापालन करा, तरीही जर तुम्ही तोंड फिरविले तर पैगंबराचे कर्तव्य तर तेच आहे, जे त्याच्यावर अनिवार्य केले गेले आहे आणि तुमच्यावर त्या गोष्टीची जबाबदारी आहे, जी तुमच्यावर टाकली गेली आहे. मार्गदर्शन तर तुम्हाला त्याच वेळी लाभेल, जेव्हा पैगंबरांचे आज्ञापालन स्वीकार कराल. (ऐका) पैगंबराचे कर्तव्य केवळ स्पष्टतः पोहचविणे आहे. info
التفاسير:

external-link copy
55 : 24

وَعَدَ اللّٰهُ الَّذِیْنَ اٰمَنُوْا مِنْكُمْ وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ لَیَسْتَخْلِفَنَّهُمْ فِی الْاَرْضِ كَمَا اسْتَخْلَفَ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ ۪— وَلَیُمَكِّنَنَّ لَهُمْ دِیْنَهُمُ الَّذِی ارْتَضٰی لَهُمْ وَلَیُبَدِّلَنَّهُمْ مِّنْ بَعْدِ خَوْفِهِمْ اَمْنًا ؕ— یَعْبُدُوْنَنِیْ لَا یُشْرِكُوْنَ بِیْ شَیْـًٔا ؕ— وَمَنْ كَفَرَ بَعْدَ ذٰلِكَ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْفٰسِقُوْنَ ۟

५५. तुमच्यापैकी ज्या लोकांनी ईमान राखले आहे आणि सत्कर्म केले आहे, अल्लाहने त्यांच्याशी वायदा केलेला आहे की तो त्यांना धरतीवर सत्ताधिकार प्रदान करील, ज्या प्रकारे त्या लोकांना प्रदान केला होता, जे यांच्यापूर्वी होऊन गेले आणि निःसंशय त्यांच्यासाठी त्यांच्या या धर्माला दृढतापूर्वक कायम करील ज्यास त्याने त्यांच्यासाठी पसंत केले आहे आणि त्यांच्या भय- दहशतीला, शांती सुबत्तेत बदलून टाकील. ते माझी उपासना करतील, माझ्यासोबत दुसऱ्या कोणाला सहभागी करणार नाहीत. त्यानंतरही जे लोक कृतघ्न बनतील आणि कुप्र (इन्कार) करतील तर निश्चित ते अवज्ञाकारी आहेत. info
التفاسير:

external-link copy
56 : 24

وَاَقِیْمُوا الصَّلٰوةَ وَاٰتُوا الزَّكٰوةَ وَاَطِیْعُوا الرَّسُوْلَ لَعَلَّكُمْ تُرْحَمُوْنَ ۟

५६. आणि नमाज कायम करा, जकात अदा करा आणि अल्लाहच्या पैगंबराचे आज्ञापालन करीत राहा, यासाठी की तुमच्यावर दया केली जावी. info
التفاسير:

external-link copy
57 : 24

لَا تَحْسَبَنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا مُعْجِزِیْنَ فِی الْاَرْضِ ۚ— وَمَاْوٰىهُمُ النَّارُ ؕ— وَلَبِئْسَ الْمَصِیْرُ ۟۠

५७. तुम्ही असे कधीही समजू नका की काफिर (इन्कारी) लोक धरतीवर (सर्वत्र पसरून) आम्हाला पराभूत करतील. त्यांचे मूळ ठिकाण तर जहन्नम आहे जे निःसंशय मोठे वाईट ठिकाण आहे. info
التفاسير:

external-link copy
58 : 24

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا لِیَسْتَاْذِنْكُمُ الَّذِیْنَ مَلَكَتْ اَیْمَانُكُمْ وَالَّذِیْنَ لَمْ یَبْلُغُوا الْحُلُمَ مِنْكُمْ ثَلٰثَ مَرّٰتٍ ؕ— مِنْ قَبْلِ صَلٰوةِ الْفَجْرِ وَحِیْنَ تَضَعُوْنَ ثِیَابَكُمْ مِّنَ الظَّهِیْرَةِ وَمِنْ بَعْدِ صَلٰوةِ الْعِشَآءِ ۫ؕ— ثَلٰثُ عَوْرٰتٍ لَّكُمْ ؕ— لَیْسَ عَلَیْكُمْ وَلَا عَلَیْهِمْ جُنَاحٌ بَعْدَهُنَّ ؕ— طَوّٰفُوْنَ عَلَیْكُمْ بَعْضُكُمْ عَلٰی بَعْضٍ ؕ— كَذٰلِكَ یُبَیِّنُ اللّٰهُ لَكُمُ الْاٰیٰتِ ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌ حَكِیْمٌ ۟

५८. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्या ताब्यात असलेल्या दासांनी आणि त्यांनीही जे तुमच्यापैकी पूर्ण वयास पोहोचले नसतील (आपल्या येण्याच्या) तीन वेळांमध्ये तुमच्याकडून अनुमती घेणे आवष्यक आहे. फज्र (प्रातःकालीन) च्या नमाजपूर्वी आणि जोहर (मध्यान्ह) च्या वेळी जेव्हा तुम्ही आपले कपडे उतरवून ठेवता आणि ईशा (रात्री) च्या नमाजनंतर, या तिन्ही वेळा तुमच्या (एकांत) आणि पडद्याच्या आहेत. या वेळांखेरीज, ना तुमच्यावर काही दोष आहे, ना त्यांच्यावर. तुम्ही सर्व आपसात जास्त करून एकमेकांच्या जवळ येणे-जाणे करणारे आहेत. अशा प्रकारे अल्लाह आपले आदेश अगदी स्पष्ट करून सांगत आहे आणि अल्लाह जाणणारा आणि हिकमत बाळगणारा आहे. info
التفاسير: