আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
32 : 24

وَاَنْكِحُوا الْاَیَامٰی مِنْكُمْ وَالصّٰلِحِیْنَ مِنْ عِبَادِكُمْ وَاِمَآىِٕكُمْ ؕ— اِنْ یَّكُوْنُوْا فُقَرَآءَ یُغْنِهِمُ اللّٰهُ مِنْ فَضْلِهٖ ؕ— وَاللّٰهُ وَاسِعٌ عَلِیْمٌ ۟

३२. आणि तुमच्यापैकी जे पुरुष-स्त्री तारुण्यास पोहोचले असतील तर त्यांचा विवाह करून द्या आणि आपल्या नेक सदाचारी दास-दासींचा देखील जर ते गरीबही असतील तर अल्लाह आपल्या दया कृपेने त्यांना धनवान बनविल. अल्लाह मोठी विशालता बाळगणारा आणि ज्ञान राखणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
33 : 24

وَلْیَسْتَعْفِفِ الَّذِیْنَ لَا یَجِدُوْنَ نِكَاحًا حَتّٰی یُغْنِیَهُمُ اللّٰهُ مِنْ فَضْلِهٖ ؕ— وَالَّذِیْنَ یَبْتَغُوْنَ الْكِتٰبَ مِمَّا مَلَكَتْ اَیْمَانُكُمْ فَكَاتِبُوْهُمْ اِنْ عَلِمْتُمْ فِیْهِمْ خَیْرًا ۖۗ— وَّاٰتُوْهُمْ مِّنْ مَّالِ اللّٰهِ الَّذِیْۤ اٰتٰىكُمْ ؕ— وَلَا تُكْرِهُوْا فَتَیٰتِكُمْ عَلَی الْبِغَآءِ اِنْ اَرَدْنَ تَحَصُّنًا لِّتَبْتَغُوْا عَرَضَ الْحَیٰوةِ الدُّنْیَا ؕ— وَمَنْ یُّكْرِهْهُّنَّ فَاِنَّ اللّٰهَ مِنْ بَعْدِ اِكْرَاهِهِنَّ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

३३. आणि त्या लोकांनी सत्शील राहिले पाहिजे, जे आपला विवाह करण्याचे सामर्थ्य बाळगत नाही. येथेपर्यंत की अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना धनवान करावे. तुमच्या दासांपैकी जो कोणी तुम्हाला (दास्यमुक्त होण्याकरिता) काही देऊन मुक्तीचा लेखी करार करू इच्छितील तर तुम्ही त्यांना तसा लेखी करार लिहून द्या. जर तुम्हाला त्यांच्यात काही भलेपणा दिसत असेल, आणि अल्लाहने जी धन-संपत्ती तुम्हाला देऊन ठेवली आहे, तिच्यातून त्यांनाही द्या. तुम्ही आपल्या त्या दासींना, ज्या सत्शील (पवित्र) राहू इच्छितात त्यांना ऐहिक जीवनाच्या फायद्यासाठी दुष्कर्म करण्यास विवश करू नका आणि जो त्यांना विवश करील तर त्यांना विवश केले गेल्यावर अल्लाह (त्यांच्यासाठी) क्षमाशील आणि दयाशील आहे. info
التفاسير:

external-link copy
34 : 24

وَلَقَدْ اَنْزَلْنَاۤ اِلَیْكُمْ اٰیٰتٍ مُّبَیِّنٰتٍ وَّمَثَلًا مِّنَ الَّذِیْنَ خَلَوْا مِنْ قَبْلِكُمْ وَمَوْعِظَةً لِّلْمُتَّقِیْنَ ۟۠

३४. आणि आम्ही तुमच्याकडे स्पष्ट आयती अवतरित केल्या आहेत आणि त्या लोकांची उदाहरणे जे तुमच्यापूर्वी होऊन गेले आहेत. आणि अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता बोध- उपदेश. info
التفاسير:

external-link copy
35 : 24

اَللّٰهُ نُوْرُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— مَثَلُ نُوْرِهٖ كَمِشْكٰوةٍ فِیْهَا مِصْبَاحٌ ؕ— اَلْمِصْبَاحُ فِیْ زُجَاجَةٍ ؕ— اَلزُّجَاجَةُ كَاَنَّهَا كَوْكَبٌ دُرِّیٌّ یُّوْقَدُ مِنْ شَجَرَةٍ مُّبٰرَكَةٍ زَیْتُوْنَةٍ لَّا شَرْقِیَّةٍ وَّلَا غَرْبِیَّةٍ ۙ— یَّكَادُ زَیْتُهَا یُضِیْٓءُ وَلَوْ لَمْ تَمْسَسْهُ نَارٌ ؕ— نُوْرٌ عَلٰی نُوْرٍ ؕ— یَهْدِی اللّٰهُ لِنُوْرِهٖ مَنْ یَّشَآءُ ؕ— وَیَضْرِبُ اللّٰهُ الْاَمْثَالَ لِلنَّاسِ ؕ— وَاللّٰهُ بِكُلِّ شَیْءٍ عَلِیْمٌ ۟ۙ

३५. अल्लाह आकाशांचा आणि जमिनीचा नूर (प्रकाश) आहे. त्याच्या नूरचे उदाहरण असे की जणू एखाद्या कोनाड्यात दिवा आहे आणि तो दिवा काचेच्या (कंदीलाच्या) आत असावा. काच चकाकताना, लख्ख चमकणाऱ्या ताऱ्यासमान असावा आणि तो दिवा पवित्र वृक्ष जैतूनच्या तेलाने प्रज्वलित केला जात असावा, जो वृक्ष ना पूर्वेकडचा आहे, ना पश्चिमेकडचा आणि ते तेल प्रकाशमान होण्याच्या बेतात असावे आगीने त्याला कधी स्पर्श केला नसला तरी. प्रकाशावर प्रकाश आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाह आपल्या नूरच्या दिशेने ज्याला इच्छितो मार्गदर्शन करतो. लोकांना समजावण्याकरिता अल्लाह हे उदाहरण देत आहे आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीची अवस्था चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
36 : 24

فِیْ بُیُوْتٍ اَذِنَ اللّٰهُ اَنْ تُرْفَعَ وَیُذْكَرَ فِیْهَا اسْمُهٗ ۙ— یُسَبِّحُ لَهٗ فِیْهَا بِالْغُدُوِّ وَالْاٰصَالِ ۟ۙ

३६. त्या घरांमध्ये, ज्यांना उंचविण्याचा आणि तिथे आपले नामःस्मरण करण्याचा अल्लाहने आदेश दिला आहे तिचे सकाळ-संध्याकाळ अल्लाहची तस्बीह (गुणगान) करीत असतात. info
التفاسير: