আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
67 : 17

وَاِذَا مَسَّكُمُ الضُّرُّ فِی الْبَحْرِ ضَلَّ مَنْ تَدْعُوْنَ اِلَّاۤ اِیَّاهُ ۚ— فَلَمَّا نَجّٰىكُمْ اِلَی الْبَرِّ اَعْرَضْتُمْ ؕ— وَكَانَ الْاِنْسَانُ كَفُوْرًا ۟

६७. आणि समुद्रात संकट कोसळताच, ज्यांना तुम्ही दुआ-प्रार्थना करीत होते, ते सर्व विसरतात, केवळ तोच (अल्लाह) बाकी राहतो, मग जेव्हा तो तुम्हाला खुश्कीकडे सुरक्षित घेऊन येतो, तेव्हा तुम्ही तोंड फिरवून घेता. मनुष्य मोठा कृतघ्न आहे. info
التفاسير:

external-link copy
68 : 17

اَفَاَمِنْتُمْ اَنْ یَّخْسِفَ بِكُمْ جَانِبَ الْبَرِّ اَوْ یُرْسِلَ عَلَیْكُمْ حَاصِبًا ثُمَّ لَا تَجِدُوْا لَكُمْ وَكِیْلًا ۟ۙ

६८. तर काय तुम्ही या गोष्टीपासून निर्धास्त झालात की तुम्हाला खुश्कीच्या एखाद्या भूभागात (नेऊन जमिनीत) धसवून टाकावे किंवा तुमच्यावर दगडांचा वर्षाव करणारे भयंकर वादळ पाठवावे, मग स्वतःसाठी तुम्हाला कोणी मित्र व सहाय्यकर्ता आढळणार नाही. info
التفاسير:

external-link copy
69 : 17

اَمْ اَمِنْتُمْ اَنْ یُّعِیْدَكُمْ فِیْهِ تَارَةً اُخْرٰی فَیُرْسِلَ عَلَیْكُمْ قَاصِفًا مِّنَ الرِّیْحِ فَیُغْرِقَكُمْ بِمَا كَفَرْتُمْ ۙ— ثُمَّ لَا تَجِدُوْا لَكُمْ عَلَیْنَا بِهٖ تَبِیْعًا ۟

६९. काय तुम्ही या गोष्टीपासून निर्भय झाला आहात की (अल्लाहने) दुसऱ्यांदा तुम्हाला नदीच्या प्रवासात आणावे आणि तुमच्यावर वेगवान वादळवारे पाठवावेत आणि तुमच्या इन्कारापायी तुम्हाला बुडवावे, मग तुम्हाला स्वतःकरिता, आमच्यावर त्याचा दावा (पाठलाग) करणारा कोणीही आढळणार नाही. info
التفاسير:

external-link copy
70 : 17

وَلَقَدْ كَرَّمْنَا بَنِیْۤ اٰدَمَ وَحَمَلْنٰهُمْ فِی الْبَرِّ وَالْبَحْرِ وَرَزَقْنٰهُمْ مِّنَ الطَّیِّبٰتِ وَفَضَّلْنٰهُمْ عَلٰی كَثِیْرٍ مِّمَّنْ خَلَقْنَا تَفْضِیْلًا ۟۠

७०. आणि निःसंशय, आम्ही आदमच्या संततीला मोठी प्रतिष्ठा दिली आणि त्यांना खुश्की आणि पाण्यावर चालणारी वाहने दिली आणि त्यांना पाक साफ वस्तूंपासून आजिविका (अन्न-सामुग्री) प्रदान केली आणि आपल्या बहुतेक निर्मितीवर त्यांना श्रेष्ठता प्रदान केली. info
التفاسير:

external-link copy
71 : 17

یَوْمَ نَدْعُوْا كُلَّ اُنَاسٍ بِاِمَامِهِمْ ۚ— فَمَنْ اُوْتِیَ كِتٰبَهٗ بِیَمِیْنِهٖ فَاُولٰٓىِٕكَ یَقْرَءُوْنَ كِتٰبَهُمْ وَلَا یُظْلَمُوْنَ فَتِیْلًا ۟

७१. ज्या दिवशी आम्ही प्रत्येक उम्मत (समुदाया) ला त्याच्या पेशव्यांसह बोलावू, मग ज्यांना त्यांचा कर्मलेख उजव्या हातात दिला जाईल ते मोठ्या आनंदाने आपला कर्मलेख वाचू लागतील आणि धाग्याइतका (तीळमात्र) ही अत्याचार त्यांच्यावर केला जाणार नाही. info
التفاسير:

external-link copy
72 : 17

وَمَنْ كَانَ فِیْ هٰذِهٖۤ اَعْمٰی فَهُوَ فِی الْاٰخِرَةِ اَعْمٰی وَاَضَلُّ سَبِیْلًا ۟

७२. आणि जो कोणी या जगात आंधळा राहिला तो आखिरतमध्येही आंधळा आणि सरळ मार्गापासून दूर भटकलेला राहील. info
التفاسير:

external-link copy
73 : 17

وَاِنْ كَادُوْا لَیَفْتِنُوْنَكَ عَنِ الَّذِیْۤ اَوْحَیْنَاۤ اِلَیْكَ لِتَفْتَرِیَ عَلَیْنَا غَیْرَهٗ ۖۗ— وَاِذًا لَّاتَّخَذُوْكَ خَلِیْلًا ۟

७३. आणि हे लोक तुम्हाला त्या वहयी (प्रकाशना) पासून, जी आम्ही तुमच्यावर अवतरित केली आहे, हटवू इच्छित होते की तुम्ही तिच्याखेरीज काही इतर गोष्टी आमच्या नावाने रचून घ्याव्यात, मग तर यांनी तुम्हाला आपला दोस्त बनविले असते. info
التفاسير:

external-link copy
74 : 17

وَلَوْلَاۤ اَنْ ثَبَّتْنٰكَ لَقَدْ كِدْتَّ تَرْكَنُ اِلَیْهِمْ شَیْـًٔا قَلِیْلًا ۟ۗۙ

७४. आणि जर आम्ही तुम्हाला अटळ राखले नसते तर फार शक्य होते की तुम्ही त्यांच्याकडे काही न काही (प्रमाणात) झुकलेच असते. info
التفاسير:

external-link copy
75 : 17

اِذًا لَّاَذَقْنٰكَ ضِعْفَ الْحَیٰوةِ وَضِعْفَ الْمَمَاتِ ثُمَّ لَا تَجِدُ لَكَ عَلَیْنَا نَصِیْرًا ۟

७५. मग तर आम्हीही तुम्हाला या जगात दुहेरी सजा दिली असती. आणि दुहेरी मृत्युचीही, या स्थितीत तुम्हाला स्वतःसाठी आमच्या विरोधात कोणताही मदत करणारा आढळला नसता. info
التفاسير: