আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
8 : 17

عَسٰی رَبُّكُمْ اَنْ یَّرْحَمَكُمْ ۚ— وَاِنْ عُدْتُّمْ عُدْنَا ۘ— وَجَعَلْنَا جَهَنَّمَ لِلْكٰفِرِیْنَ حَصِیْرًا ۟

८. आशा आहे की तुमचा पालनकर्ता तुमच्यावर दया करील. परंतु जर तुम्ही पुन्हा तेच करू लागाल तर आम्ही देखील पुन्हा तसेच करू, आणि आम्ही इन्कार करणाऱ्यांसाठी जहन्नमला कैदखाना बनवून ठेवले आहे. info
التفاسير:

external-link copy
9 : 17

اِنَّ هٰذَا الْقُرْاٰنَ یَهْدِیْ لِلَّتِیْ هِیَ اَقْوَمُ وَیُبَشِّرُ الْمُؤْمِنِیْنَ الَّذِیْنَ یَعْمَلُوْنَ الصّٰلِحٰتِ اَنَّ لَهُمْ اَجْرًا كَبِیْرًا ۟ۙ

९. निःसंशय, हा कुरआन तो मार्ग दाखवितो, जो सर्वांत सरळ आहे, आणि सत्कर्म करणाऱ्या ईमानधारकांना ही खूशखबर देतो की त्यांच्यासाठी अतिशय चांगला मोबदला (प्रतिफळ) आहे. info
التفاسير:

external-link copy
10 : 17

وَّاَنَّ الَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ بِالْاٰخِرَةِ اَعْتَدْنَا لَهُمْ عَذَابًا اَلِیْمًا ۟۠

१०. आणि ते लोक, जे आखिरतवर विश्वास राखत नाही, त्यांच्यासाठी आम्ही दुःखदायक अज़ाब तयार करून ठेवला आहे. info
التفاسير:

external-link copy
11 : 17

وَیَدْعُ الْاِنْسَانُ بِالشَّرِّ دُعَآءَهٗ بِالْخَیْرِ ؕ— وَكَانَ الْاِنْسَانُ عَجُوْلًا ۟

११. आणि मनुष्य वाईट गोष्टींची दुआ प्रार्थना करू लागतो, अगदी त्याच्या स्वतःच्या भलाईच्या दुआ- प्रार्थनेसारखी, मनुष्य मोठा उतावळा आहे. info
التفاسير:

external-link copy
12 : 17

وَجَعَلْنَا الَّیْلَ وَالنَّهَارَ اٰیَتَیْنِ فَمَحَوْنَاۤ اٰیَةَ الَّیْلِ وَجَعَلْنَاۤ اٰیَةَ النَّهَارِ مُبْصِرَةً لِّتَبْتَغُوْا فَضْلًا مِّنْ رَّبِّكُمْ وَلِتَعْلَمُوْا عَدَدَ السِّنِیْنَ وَالْحِسَابَ ؕ— وَكُلَّ شَیْءٍ فَصَّلْنٰهُ تَفْصِیْلًا ۟

१२. आणि आम्ही रात्र आणि दिवसाला (आपल्या सामर्थ्याची) निशाणी बनविले आहे. रात्रीच्या निशाणीला आम्ही प्रकाशहीन (निस्तेज) केले आणि दिवसाच्या निशाणीला प्रकाशमान दाखविणारी बनविले आहे. यासाठी की तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेचा शोध घेऊ शकावे. आणि यासाठीही की वर्षाची गणना आणि हिशोब जाणू शकावे. आणि प्रत्येक विषयाचे आम्ही सविस्तर निवेदन केले आहे. info
التفاسير:

external-link copy
13 : 17

وَكُلَّ اِنْسَانٍ اَلْزَمْنٰهُ طٰٓىِٕرَهٗ فِیْ عُنُقِهٖ ؕ— وَنُخْرِجُ لَهٗ یَوْمَ الْقِیٰمَةِ كِتٰبًا یَّلْقٰىهُ مَنْشُوْرًا ۟

१३. आणि आम्ही माणसाचे चांगले-वाईट त्याच्या गळ्यात टाकले आहे, आणि कयामतच्या दिवशी आम्ही त्याचा कर्म-लेख बाहेर काढू, जो त्याला आपल्यावर खुला असलेला आढळेल. info
التفاسير:

external-link copy
14 : 17

اِقْرَاْ كِتٰبَكَ ؕ— كَفٰی بِنَفْسِكَ الْیَوْمَ عَلَیْكَ حَسِیْبًا ۟ؕ

१४. आता स्वतःच आपले कर्मपत्र वाचून घ्या. आज तर तू स्वतःच आपला फैसला करण्यास पुरेसा आहे. info
التفاسير:

external-link copy
15 : 17

مَنِ اهْتَدٰی فَاِنَّمَا یَهْتَدِیْ لِنَفْسِهٖ ۚ— وَمَنْ ضَلَّ فَاِنَّمَا یَضِلُّ عَلَیْهَا ؕ— وَلَا تَزِرُ وَازِرَةٌ وِّزْرَ اُخْرٰی ؕ— وَمَا كُنَّا مُعَذِّبِیْنَ حَتّٰی نَبْعَثَ رَسُوْلًا ۟

१५. जो मनुष्य मार्गदर्शन प्राप्त करतो, तो स्वतः आपल्या भल्यासाठी मार्गदर्शन प्राप्त करतो आणि जो मार्गभ्रष्ट होईल तर त्याचे ओझे त्याच्यावरच आहे. कोणीही ओझे बाळगणारा दुसऱ्या कुणाचे ओझे आपल्यावर लादून घेणार नाही आणि आमचा हा नियम नाही की पैगंबर पाठविण्यापूर्वीच अज़ाब (शिक्षा-यातना) पाठवावा. info
التفاسير:

external-link copy
16 : 17

وَاِذَاۤ اَرَدْنَاۤ اَنْ نُّهْلِكَ قَرْیَةً اَمَرْنَا مُتْرَفِیْهَا فَفَسَقُوْا فِیْهَا فَحَقَّ عَلَیْهَا الْقَوْلُ فَدَمَّرْنٰهَا تَدْمِیْرًا ۟

१६. आणि जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीचा सर्वनाश करण्याचा इरादा करून घेतो तेव्हा तिथल्या सुखवस्तू (सुसंपन्न) लोकांना काही आदेश देतो आणि ते त्या वस्तीत उघडपणे अवज्ञा करू लागतात, तेव्हा त्यांच्यावर (शिक्षा-यातनेचा) फैसला लागू होतो आणि मग आम्ही त्या वस्तीची उलथापालथ करून टाकतो. info
التفاسير:

external-link copy
17 : 17

وَكَمْ اَهْلَكْنَا مِنَ الْقُرُوْنِ مِنْ بَعْدِ نُوْحٍ ؕ— وَكَفٰی بِرَبِّكَ بِذُنُوْبِ عِبَادِهٖ خَبِیْرًا بَصِیْرًا ۟

१७. आणि आम्ही नूहनंतरही अनेक समुदाय नष्ट करून टाकले आणि तुमचा पालनकर्ता आपल्या दासांच्या अपराधांना चांगल्या प्रकारे जाणून आहे आणि चांगल्या प्रकारे पाहणारा आहे. info
التفاسير: