१११. निःसंशय, अल्लाहने ईमानधारकांकडून त्यांच्या प्राणांना व धनांना जन्नतच्या मोबदल्यात खरेदी केले आहे. ते अल्लाहच्या मार्गात लढतात ज्यात ते ठार करतात आणि ठार केले जातात, याबाबत सच्चा वायदा आहे तौरात, इंजील आणि कुरआनामध्ये आणि अल्लाहपेक्षा जास्त आपल्या वायद्याचे पालन कोण करू शकतो? यास्तव तुम्ही आपल्या या विकण्यावर, जो (सौदा) तुम्ही करून घेतलात, आनंदित व्हा आणि ही फार मोठी सफलता आहे.