ترجمة معاني القرآن الكريم - الترجمة الماراتية - محمد شفيع أنصاري

external-link copy
2 : 5

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَا تُحِلُّوْا شَعَآىِٕرَ اللّٰهِ وَلَا الشَّهْرَ الْحَرَامَ وَلَا الْهَدْیَ وَلَا الْقَلَآىِٕدَ وَلَاۤ آٰمِّیْنَ الْبَیْتَ الْحَرَامَ یَبْتَغُوْنَ فَضْلًا مِّنْ رَّبِّهِمْ وَرِضْوَانًا ؕ— وَاِذَا حَلَلْتُمْ فَاصْطَادُوْا ؕ— وَلَا یَجْرِمَنَّكُمْ شَنَاٰنُ قَوْمٍ اَنْ صَدُّوْكُمْ عَنِ الْمَسْجِدِ الْحَرَامِ اَنْ تَعْتَدُوْا ۘ— وَتَعَاوَنُوْا عَلَی الْبِرِّ وَالتَّقْوٰی ۪— وَلَا تَعَاوَنُوْا عَلَی الْاِثْمِ وَالْعُدْوَانِ ۪— وَاتَّقُوا اللّٰهَ ؕ— اِنَّ اللّٰهَ شَدِیْدُ الْعِقَابِ ۟

२. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहच्या धर्म-प्रतिकांचा (शआईरचा) अवमान करू नका, ना आदरणीय महिन्यांचा, ना कुर्बानीकरिता हरम (काबागृहा) पर्यंत नेल्या जाणाऱ्या आणि गळ्यात पट्टा घातलेल्या जनावराचा, ना आदरणीय घरा (काबागृहा) कडे जाणाऱ्या लोकांचा जे अल्लाहची दया आणि प्रसन्नता शोधत आहेत. आणि जेव्हा एहराम उतरवाल तेव्हा मग शिकार करू शकतात आणि ज्यांनी तुम्हाला आदरणीय मसजिदीपासून रोखले, त्यांची शत्रूता तुम्हाला हद्द ओलांडण्यास प्रवृत्त न करावी आणि नेकी व अल्लाहचे भय राखण्यात एकमेकांची मदत करा. अपराध आणि अत्याचाराच्या कामात मदत करू नका. अल्लाहचे भय बाळगून राहा. निःसंशय अल्लाह मोठा सक्त अज़ाब (कठोर शिक्षा-यातना) देणारा आहे. info
التفاسير: