ترجمة معاني القرآن الكريم - الترجمة الماراتية - محمد شفيع أنصاري

external-link copy
88 : 28

وَلَا تَدْعُ مَعَ اللّٰهِ اِلٰهًا اٰخَرَ ۘ— لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ۫— كُلُّ شَیْءٍ هَالِكٌ اِلَّا وَجْهَهٗ ؕ— لَهُ الْحُكْمُ وَاِلَیْهِ تُرْجَعُوْنَ ۟۠

८८. आणि अल्लाहच्या सोबत दुसऱ्या एखाद्या दैवताला पुकारू नका.१ अल्लाहखेरीज दुसरा कोणीही उपासना करण्या योग्य नाही. प्रत्येक वस्तू नाश पावणार आहे, परंतु त्याचे मुख,२ त्याचेच शासन आहे आणि तुम्ही त्याच्याचकडे परतविले जाल. info

(१) अर्थात अन्य कोणाचीही भक्ती- आराधना करू नका. ना दुअ- प्रार्थनेद्वारे ना भोग- प्रसाद- नवस- नजराण्याने, ना कुर्बानीद्वारे, कारण हे सर्व उपासना प्रकार आहेत, जे केवळ एक अल्लाहकरिता खास आहे. पवित्र कुरआनात अनेक ठिकाणी अल्लाहखेरीज दुसऱ्या कोणाच्या उपासनेला ‘पुकारणे’ म्हटले गेले आहे, ज्याचा उद्देश याच गोष्टीला स्पष्ट करणे आहे की अल्लाहखेरीज दुसऱ्या कोणाला माध्यमांच्या पलीकडे मानून पुकारणे त्यांच्याकडे मदत मागणे, गाऱ्हाणे मांडणे, आर्जव आणि दुआ- प्रार्थना करणे हे सर्व त्यांची उपासना करणेच होय, ज्याद्वारे मनुष्य अनेकेश्वरवादी बनतो. (२) ‘त्याचे मुख’शी अभिप्रेत अल्लाह होय. अंश सांगून समग्र अभिप्रेत आहे. अर्थात अल्लाहखेरीज प्रत्येक वस्तू नाश पावणार आहे (सजीव असो की निर्जीव) ‘कुल्लु मन्‌ अलैहा फ़ानिव्‌ व यब्क़ा वज्हु रब्बि-क जुल्जलालि वल-इक्राम.’ ‘‘धरतीवर जेवढे म्हणून आहेत, सर्व नाश पावणार आहेत. केवळ तुझ्या पालनकर्त्याचे मुख, जो मोठी महानता आणि प्रतिष्ठा बाळगणारा आहे, तोच बाकी राहील.’’ (सूरह रहमान-२६,२७)

التفاسير: