३९. ज्या (मुसलमानां) शी (काफिर) लढाई करीत आहेत त्यांना देखील लढण्याची अनुमती दिली कारण ते अत्याचारपीडित आहेत. निःसंशय त्यांच्या मदतीकरिता अल्लाह परिपूर्ण सामर्थ्य राखतो.
४०. हे असे लोक आहेत, ज्यांना विनाकारण आपल्या घराबाहेर काढले गेले केवळ त्यांच्या या बोलण्यावर की आमचा स्वामी व पालनकर्ता अल्लाह आहे. जर अल्लाह लोकांना आपसात एकमेकांद्वारे हटवित राहिला नसता तर उपासनास्थळ आणि चर्च आणि मशीदी, आणि यहूदी लोकांची प्रार्थनास्थळे आणि त्या मशीदी देखील केव्हाच पाडल्या गेल्या असत्या जिथे फार मोठ्या प्रमाणात अल्लाहचे नामःस्मरण केले जाते. जो अल्लाहची मदत करेल अल्लाह देखील त्याची मदत अवश्य करेल. िंनिःसंशय अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे.
४१. हे लोक आहेत की जर आम्ही यांचे पाय जमिनीवर मजबूत केले (अर्थात चांगले स्थैर्य प्रदान केले) तर हे नित्यनेमाने नमाज अदा करतील आणि जकात देतील आणि चांगल्या कामांचा आदेश देतील आणि वाईट कामांची मनाई करतील आणि सर्व कामांचा परिणाम अल्लाहच्या अधिकारकक्षेत आहे.
४४. आणि मदयनच्या लोकांनीही आपल्या आपल्या पैगंबरांना खोटे ठरविले आहे. मूसा यांनाही खोटे ठरविले गेले आहे, तेव्हा मी इन्कारी लोकांना थोडी संधी दिली, मग त्यांना पकडले. मग पाहा कशी होती माझी शिक्षा- यातना!
४५. अशा अनेक वस्त्या आहेत, ज्यांना आम्ही नष्ट करून टाकले यासाठी की त्या अत्याचारी होत्या, तेव्हा त्या आपल्या छतांसह पालथ्या पडल्या आहेत आणि बहुतेक आबाद विहीरी निकामी पडल्या आहेत आणि कितीतरी पक्के उंच किल्ले ओसाड पडले आहेत.
४६. काय त्यांनी धरतीवर हिंडून फिरून पाहिले नाही की त्यांच्या हृदयांनी या गोष्टी समजून घेतल्या असत्या किंवा कानांनी या (घटना) ऐकल्या असत्या. खरी गोष्ट अशी की केवळ डोळेच आंधळे नसतात किंबहुना ती हृदये (सुद्धा) आंधळी असतात, जी उरात आहेत.