ترجمة معاني القرآن الكريم - الترجمة الماراتية - محمد شفيع أنصاري

external-link copy
270 : 2

وَمَاۤ اَنْفَقْتُمْ مِّنْ نَّفَقَةٍ اَوْ نَذَرْتُمْ مِّنْ نَّذْرٍ فَاِنَّ اللّٰهَ یَعْلَمُهٗ ؕ— وَمَا لِلظّٰلِمِیْنَ مِنْ اَنْصَارٍ ۟

२७०. तुम्ही वाटेल तेवढा खर्च करा (किंवा दान-पुण्य करा) आणि जो काही नवस माना१ अल्लाह ते जाणतो. आणि अत्याचारींचा कोणी सहायक नाही. info

(१) मूळ शब्द ‘नज़र’ अर्थात नवस मानणे की माझे अमुक एक काम झाले किंवा दुःख दूर झाले तर मी अल्लाहच्या मार्गात एवढे दान करीन. असा नवस पूर्ण करणे आवश्यक आहे. जर एखाद्या अवज्ञा आणि अनुचित कामाचा नवस मानला असेल, तर तो पूर्ण करणे जरूरी नाही. नवसदेखील नमाज-रोजासारखी उपासना आहे. यास्तव अल्लाहशिवाय दुसऱ्याचा नवस मानणे शिर्क आहे. जसे आजच्या काळात प्रसिद्ध मजारींवर नवस आणि भेट-नजराने चढविण्याचे काम चालू आहे. अल्लाह आम्हाला या शिर्कपासून वाचवो.

التفاسير: