ترجمة معاني القرآن الكريم - الترجمة الماراتية - محمد شفيع أنصاري

external-link copy
255 : 2

اَللّٰهُ لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ۚ— اَلْحَیُّ الْقَیُّوْمُ ۚ۬— لَا تَاْخُذُهٗ سِنَةٌ وَّلَا نَوْمٌ ؕ— لَهٗ مَا فِی السَّمٰوٰتِ وَمَا فِی الْاَرْضِ ؕ— مَنْ ذَا الَّذِیْ یَشْفَعُ عِنْدَهٗۤ اِلَّا بِاِذْنِهٖ ؕ— یَعْلَمُ مَا بَیْنَ اَیْدِیْهِمْ وَمَا خَلْفَهُمْ ۚ— وَلَا یُحِیْطُوْنَ بِشَیْءٍ مِّنْ عِلْمِهٖۤ اِلَّا بِمَا شَآءَ ۚ— وَسِعَ كُرْسِیُّهُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ ۚ— وَلَا یَـُٔوْدُهٗ حِفْظُهُمَا ۚ— وَهُوَ الْعَلِیُّ الْعَظِیْمُ ۟

२५५. अल्लाहच सच्चा माबूद (उपासना करण्यायोग्य) आहे, ज्याच्याशिवाय दुसरा कोणीही माबूद नाही, जो जिवंत आहे आणि नेहमी कायम राहणारा आहे, ज्याला ना डुलकी (गुंगी) येते ना झोप. त्याच्या स्वामीत्वात जमीन व आकाशाच्या समस्त चीज वस्तू आहेत. असा कोण आहे, जो त्याच्या आदेशाविना, त्याच्यासमोर शिफारस करू शकेल. तो जाणतो जे काही निर्मितीच्या समोर आहे व जे काही त्यांच्या मागे आहे आणि ते त्याच्या ज्ञानापैकी कोणत्याही गोष्टीला आपल्या अधिकारकक्षेत घेऊ शकत नाही, परंतु जेवढे तो इच्छिल १ त्याच्या सत्ताकेंद्रा (कुर्सी) च्या व्यापकतेने समस्त जमीन व आकाशाला आपल्या अधिकारकक्षेत राखले आहे. या सर्वांचे रक्षण करण्यात तो थकतही नाही, आणि कंटाळतही नाही. तो मोठा आलीशान व मोठा महिमावान आहे. info

(१) ही ‘आयतुल कुर्सी’ होय. सहीह हदीस वचनामध्ये याचे मोठे महत्त्व सांगितले गेले आहे. उदा. ही कुरआनातील सर्वांत महान आयत आहे. रात्री हिचे पठण केल्याने माणूस सैतानापासून सुरक्षित राहतो. प्रत्येक नमाजनंतर हिचे पठण केले पाहिजे. (इब्ने कसीर)

التفاسير: