《古兰经》译解 - 蒙达语翻译 - 穆罕默德·舍夫尔·安萨拉。

页码:close

external-link copy
69 : 6

وَمَا عَلَی الَّذِیْنَ یَتَّقُوْنَ مِنْ حِسَابِهِمْ مِّنْ شَیْءٍ وَّلٰكِنْ ذِكْرٰی لَعَلَّهُمْ یَتَّقُوْنَ ۟

६९. आणि जे लोक अल्लाहचे भय राखून वागतात, त्यांच्यावर त्यांच्या पकडीचा काहीच परिणाम होणार नाही. मात्र त्यांना शिकवण देत राहाणे (चांगले आहे) कदाचित तेदेखील अल्लाहचे भय राखून दुष्कर्मापासून दूर राहू लागतील. info
التفاسير:

external-link copy
70 : 6

وَذَرِ الَّذِیْنَ اتَّخَذُوْا دِیْنَهُمْ لَعِبًا وَّلَهْوًا وَّغَرَّتْهُمُ الْحَیٰوةُ الدُّنْیَا وَذَكِّرْ بِهٖۤ اَنْ تُبْسَلَ نَفْسٌ بِمَا كَسَبَتْ ۖۗ— لَیْسَ لَهَا مِنْ دُوْنِ اللّٰهِ وَلِیٌّ وَّلَا شَفِیْعٌ ۚ— وَاِنْ تَعْدِلْ كُلَّ عَدْلٍ لَّا یُؤْخَذْ مِنْهَا ؕ— اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ اُبْسِلُوْا بِمَا كَسَبُوْا ۚ— لَهُمْ شَرَابٌ مِّنْ حَمِیْمٍ وَّعَذَابٌ اَلِیْمٌ بِمَا كَانُوْا یَكْفُرُوْنَ ۟۠

७०. आणि अशा लोकांशी कधीही नाते ठेवू नका, ज्यांनी आपल्या दीन (धर्मा) ला खेळ-तमाशा बनवून ठेवले आहे आणि ऐहिक जीवनाने त्यांना धोक्यात टाकले आहे. आणि या कुरआनाद्वारे उपदेश जरूर करीत राहा, यासाठी की एखादा मनुष्य आपल्या कर्मांमुळे अशा प्रकारे न फसावा की कोणी अल्लाहशिवाय त्याची मदत करणारा नसावा आणि ना शिफारस करणारा आणि अवस्था अशी व्हावी की जर सारे जग भरून मोबदल्यात देऊन टाकील, तरीही त्याच्याकडून घेतले न जावे. ते असेच लोक आहेत की आपल्या कर्मांमुळे अडकून पडले. त्यांच्यासाठी खूप गरम पाणी पिण्याचे असेल आणि त्यांच्या कुप्र (इन्कारा) मुळे मोठी दुःदायक शिक्षा-यातना असेल. info
التفاسير:

external-link copy
71 : 6

قُلْ اَنَدْعُوْا مِنْ دُوْنِ اللّٰهِ مَا لَا یَنْفَعُنَا وَلَا یَضُرُّنَا وَنُرَدُّ عَلٰۤی اَعْقَابِنَا بَعْدَ اِذْ هَدٰىنَا اللّٰهُ كَالَّذِی اسْتَهْوَتْهُ الشَّیٰطِیْنُ فِی الْاَرْضِ حَیْرَانَ ۪— لَهٗۤ اَصْحٰبٌ یَّدْعُوْنَهٗۤ اِلَی الْهُدَی ائْتِنَا ؕ— قُلْ اِنَّ هُدَی اللّٰهِ هُوَ الْهُدٰی ؕ— وَاُمِرْنَا لِنُسْلِمَ لِرَبِّ الْعٰلَمِیْنَ ۟ۙ

७१. तुम्ही सांगा, काय आम्ही अल्लाहशिवाय त्याला पुकारावे जो आमचे भले-बुरे काहीच करू शकत नसावा, आणि अल्लाहचे मार्गदर्शन लाभल्यानंतर त्या माणसासारखे टाचा रगडत परत फिरविले जावे, जणू सैतानाने बहकविले असावे आणि तो धरतीवर भटकत फिरत असावा. त्याचे साथीदार त्याला सरळ मार्गाकडे बोलावित असावेत की आमच्या जवळ ये. तुम्ही सांगा, अल्लाहचे मार्गदर्शनच खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आहे. आणि आम्हाला हा आदेश दिला गेला आहे की समस्त जगाच्या स्वामीसाठी स्वतःला त्याच्या हवाली करावे. info
التفاسير:

external-link copy
72 : 6

وَاَنْ اَقِیْمُوا الصَّلٰوةَ وَاتَّقُوْهُ ؕ— وَهُوَ الَّذِیْۤ اِلَیْهِ تُحْشَرُوْنَ ۟

७२. आणि नमाज कायम करा आणि त्या (अल्लाह) चे भय राखा, तो, तोच आहे, ज्याच्याकडे तुम्ही एकत्रित केले जाल. info
التفاسير:

external-link copy
73 : 6

وَهُوَ الَّذِیْ خَلَقَ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ بِالْحَقِّ ؕ— وَیَوْمَ یَقُوْلُ كُنْ فَیَكُوْنُ ؕ۬— قَوْلُهُ الْحَقُّ ؕ— وَلَهُ الْمُلْكُ یَوْمَ یُنْفَخُ فِی الصُّوْرِ ؕ— عٰلِمُ الْغَیْبِ وَالشَّهَادَةِ ؕ— وَهُوَ الْحَكِیْمُ الْخَبِیْرُ ۟

७३. त्यानेच आकाशआंना व जमिनीला सत्यासह निर्माण केले, आणि ज्या दिवशी तो फर्माविल, होऊन जा तर होऊन जाईल. त्याचे वचन अगदी सत्य आहे, आणि ज्या दिवशी शंख फुंकला जाईल, राज्य सत्ता त्याचीच असेल. तो जाणणारा आहे परोक्ष आणि अस्तित्वाचा आणितो हिकमतशाली व खबर राखणारा आहे. info
التفاسير: