《古兰经》译解 - 蒙达语翻译 - 穆罕默德·舍夫尔·安萨拉。

页码:close

external-link copy
31 : 29

وَلَمَّا جَآءَتْ رُسُلُنَاۤ اِبْرٰهِیْمَ بِالْبُشْرٰی ۙ— قَالُوْۤا اِنَّا مُهْلِكُوْۤا اَهْلِ هٰذِهِ الْقَرْیَةِ ۚ— اِنَّ اَهْلَهَا كَانُوْا ظٰلِمِیْنَ ۟ۚۖ

३१. आणि जेव्हा आम्ही पाठविलेले फरिश्ते (हजरत) इब्राहीम (अलै.) जवळ शुभ समाचार घेऊन पोहोचले तेव्हा म्हणाले, आम्ही या वस्तीच्या लोकांचा नाश करणार आहोत. निःसंशय इथले रहिवाशी मोठे अत्याचारी आहेत. info
التفاسير:

external-link copy
32 : 29

قَالَ اِنَّ فِیْهَا لُوْطًا ؕ— قَالُوْا نَحْنُ اَعْلَمُ بِمَنْ فِیْهَا ؗ— لَنُنَجِّیَنَّهٗ وَاَهْلَهٗۤ اِلَّا امْرَاَتَهٗ ؗ— كَانَتْ مِنَ الْغٰبِرِیْنَ ۟

३२. (हजरत) इब्राहीम) म्हणाले, त्या वस्तीत तर लूत (अलै.) आहेत. फरिश्ते म्हणाले, इथे जे आहेत, त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो लूत आणि त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या पत्नीखेरीज, आम्ही वाचवू. निःसंशय ती स्त्री मागे राहणाऱ्यांपैकी आहे. info
التفاسير:

external-link copy
33 : 29

وَلَمَّاۤ اَنْ جَآءَتْ رُسُلُنَا لُوْطًا سِیْٓءَ بِهِمْ وَضَاقَ بِهِمْ ذَرْعًا وَّقَالُوْا لَا تَخَفْ وَلَا تَحْزَنْ ۫— اِنَّا مُنَجُّوْكَ وَاَهْلَكَ اِلَّا امْرَاَتَكَ كَانَتْ مِنَ الْغٰبِرِیْنَ ۟

३३. आणि मग जेव्हा आम्ही पाठविलेले फरिश्ते लूत (अलै.) जवळ पोहोचले, तेव्हा ते त्यांच्यामुळे दुःखी कष्टी झाले आणि मनातल्या मनात शोकाकुल झाले. संदेशवाहक म्हणाले, तुम्ही भिऊ नका आणि दुःखी होऊ नका, आम्ही तुम्हाला तुमच्या कुटुंबासहित सुरक्षित ठेवू तुमच्या पत्‌ीला सोडून, कारण ती अज़ाब (शिक्षे) साठी बाकी राहणाऱ्यांपैकी असेल. info
التفاسير:

external-link copy
34 : 29

اِنَّا مُنْزِلُوْنَ عَلٰۤی اَهْلِ هٰذِهِ الْقَرْیَةِ رِجْزًا مِّنَ السَّمَآءِ بِمَا كَانُوْا یَفْسُقُوْنَ ۟

३४. आम्ही या वस्तीच्या लोकांवर आकाशातून अज़ाब उतरविणार आहोत, या कारणास्तव की हे दुराचारी होत आहेत. info
التفاسير:

external-link copy
35 : 29

وَلَقَدْ تَّرَكْنَا مِنْهَاۤ اٰیَةً بَیِّنَةً لِّقَوْمٍ یَّعْقِلُوْنَ ۟

३५. आणि आम्ही या वस्तीला स्पष्ट बोध ग्रहण करण्यासाठी चिन्ह बनविले त्या लोकांकरिता जे बुद्धी बाळगतात. info
التفاسير:

external-link copy
36 : 29

وَاِلٰی مَدْیَنَ اَخَاهُمْ شُعَیْبًا ۙ— فَقَالَ یٰقَوْمِ اعْبُدُوا اللّٰهَ وَارْجُوا الْیَوْمَ الْاٰخِرَ وَلَا تَعْثَوْا فِی الْاَرْضِ مُفْسِدِیْنَ ۟

३६. आणि मदयनकडे (आम्ही) त्यांचे भाऊ शुऐब (अलै.) यांना पाठविले. ते म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करा, कयामतच्या दिवसाची आशा बाळगा आणि जमिनीवर उत्पात (फसाद) पसरवित फिरू नका. info
التفاسير:

external-link copy
37 : 29

فَكَذَّبُوْهُ فَاَخَذَتْهُمُ الرَّجْفَةُ فَاَصْبَحُوْا فِیْ دَارِهِمْ جٰثِمِیْنَ ۟ؗ

३७. तरीही त्या लोकांनी त्यांना खोटे ठरविले, शेवटी भूकंपाने त्यांना धरले आणि ते आपल्या घरांमध्ये बसल्या बसल्या मृत झाले. info
التفاسير:

external-link copy
38 : 29

وَعَادًا وَّثَمُوْدَاۡ وَقَدْ تَّبَیَّنَ لَكُمْ مِّنْ مَّسٰكِنِهِمْ ۫— وَزَیَّنَ لَهُمُ الشَّیْطٰنُ اَعْمَالَهُمْ فَصَدَّهُمْ عَنِ السَّبِیْلِ وَكَانُوْا مُسْتَبْصِرِیْنَ ۟ۙ

३८. आणि आम्ही ‘आद’ आणि ‘समूद’ (जनसमूहा) च्या लोकांनाही (नष्ट केले) ज्यांचे काही भग्न अवशेष तुमच्यासमोर हजर आहेत. आणि सैतानाने त्यांच्या दुष्कर्माला सुशोभित करून दाखविले होते आणि त्यांना सन्मार्गापासून रोखले होते. यानंतर की हे डोळे राखणारे आणि चलाख होते. info
التفاسير: