《古兰经》译解 - 蒙达语翻译 - 穆罕默德·舍夫尔·安萨拉。

external-link copy
65 : 27

قُلْ لَّا یَعْلَمُ مَنْ فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ الْغَیْبَ اِلَّا اللّٰهُ ؕ— وَمَا یَشْعُرُوْنَ اَیَّانَ یُبْعَثُوْنَ ۟

६५. सांगा की आकाशवाल्यांपैकी आणि धरतीवाल्यांपैकी, अल्लाहखेरीज कोणीही परोक्ष ज्ञान बाळगत नाही१ ते तर हे देखील जाणत नाहीत की त्यांना दुसऱ्यांदा केव्हा जिवंत केले जाईल? info

(१) अर्थात, ज्या प्रकारे उपरोक्त बाबींमध्ये अल्लाह अद्वितीय आहे, त्याचा कोणीही सहभागी नाही, तद्‌वतच परोक्ष - ज्ञानाबाबतही तो अद्वितीय आहे. त्याच्याखेरीज कोणालाही गैबी (अपरोक्ष) गोष्टींचे ज्ञान नाही. पैगंबरांना देखील तेवढेच ज्ञान असते जेवढे अल्लाह वहयी आणि आपल्या प्रेरणेद्वारे त्यांना देतो, आणि जे ज्ञान दुसऱ्याच्या सांगण्याने प्राप्त होत असेल तर ते जाणणाऱ्याला परोक्ष - ज्ञाता म्हटले जाऊ शकत नाही. परोक्षाचे ज्ञान तर ते होय, जे कसल्याही माध्यमाविना, स्वतःलाच असावे. ज्ञाता प्रत्येक गोष्टीस स्वतः जाणणारा असावा. सूक्ष्मातिसूक्ष्म व लपलेली गोष्टही त्याच्या ज्ञानकक्षेबाहेर नसावी. हे वैशिष्ट्य केवळ अल्लाहचेच आहे यास्तव तोच परोक्षज्ञाता आहे. त्याच्याखेरीज साऱ्या जगात परोक्ष ज्ञान राखणारा कोणीही नाही. हजरत आयशा (रजि.) फर्मावितात की जो मनुष्य असे समजतो की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भविष्यात होणाऱ्या घटनांचे ज्ञान राखतात, त्याने अल्लाहवर फार मोठे कुभांड रचले, यासाठी की तो (अल्लाह) फर्मावितो की ‘‘आकाश व धरतीत गैबचे ज्ञान अल्लाहलाच आहे.’’ (सहीह बुखारी नं. ४८५५, सहीह मुस्लिम नं. २८७, आणि अल तिर्मिजी नं. ३०६८)

التفاسير: