《古兰经》译解 - 蒙达语翻译 - 穆罕默德·舍夫尔·安萨拉。

external-link copy
19 : 24

اِنَّ الَّذِیْنَ یُحِبُّوْنَ اَنْ تَشِیْعَ الْفَاحِشَةُ فِی الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۙ— فِی الدُّنْیَا وَالْاٰخِرَةِ ؕ— وَاللّٰهُ یَعْلَمُ وَاَنْتُمْ لَا تَعْلَمُوْنَ ۟

१९. जे लोक, ईमान राखणाऱ्यांमध्ये निर्लज्जता पसरविण्याची इच्छा बाळगतात, त्यांच्यासाठी या जगात आणि आखिरतमध्ये दुःखदायक अज़ाब (शिक्षा- यातना) आहे,१ आणि अल्लाह सर्व काही जाणतो, आणि तुम्ही काहीच जाणत नाही. info

(१) ‘फाहिशत’चा अर्थ आहे निर्लज्जता आणि पवित्र कुरआनने व्यभिचार कृत्याला निर्लज्जता म्हटले आहे. (बनी इस्राईल) आणि इथे व्यभिचाराच्या एका खोट्या बातमीच्या प्रचारालाही अल्लाहने निर्लज्जता म्हटले आहे आणि यास इहलोक आणि परलोकाच्या दुःखदायक शिक्षेचे कारण सांगितले आहे. ज्याद्वारे असभ्यता (निर्लज्जता) विषयी इस्लामचा स्वभाव आणि अल्लाहच्या मर्जीचे अनुमान होते की केवळ असभ्य गोष्टीची खोटी बातमी पसरविणे अल्लाहच्या दृष्टीने किती मोठा अपराध आहे. तेव्हा जे लोक रात्रंदिवस एका इस्लामी समाजात वृत्तपत्रे, रेडिओ, टीव्ही आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाद्वारे असभ्यतेचा, निर्लज्जतेचा सर्रास प्रचार करीत आहेत आणि घरोघरी ते पोहोचवित आहेत, तर अल्लाहच्या येथे हे लोक केवढे मोठे अपराधी ठरतील?

التفاسير: