《古兰经》译解 - 蒙达语翻译 - 穆罕默德·舍夫尔·安萨拉。

页码:close

external-link copy
59 : 24

وَاِذَا بَلَغَ الْاَطْفَالُ مِنْكُمُ الْحُلُمَ فَلْیَسْتَاْذِنُوْا كَمَا اسْتَاْذَنَ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ ؕ— كَذٰلِكَ یُبَیِّنُ اللّٰهُ لَكُمْ اٰیٰتِهٖ ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌ حَكِیْمٌ ۟

५९. आणि तुमच्यापैकी जी मुले तरुण (जाणत्या) वयास पोहचतील तर ज्याप्रमाणे त्यांच्या पूर्वीचे (मोठे) लोक अनुमती मागतात, त्यांनी देखील अनुमती घेऊन आले पाहिजे. अल्लाह अशा प्रकारे तुम्हाला आपल्या आयती स्पष्टतः सांगतो. अल्लाहच जाणणारा आणि हिकमत बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
60 : 24

وَالْقَوَاعِدُ مِنَ النِّسَآءِ الّٰتِیْ لَا یَرْجُوْنَ نِكَاحًا فَلَیْسَ عَلَیْهِنَّ جُنَاحٌ اَنْ یَّضَعْنَ ثِیَابَهُنَّ غَیْرَ مُتَبَرِّجٰتٍ بِزِیْنَةٍ ؕ— وَاَنْ یَّسْتَعْفِفْنَ خَیْرٌ لَّهُنَّ ؕ— وَاللّٰهُ سَمِیْعٌ عَلِیْمٌ ۟

६०. आणि मोठ्या म्हाताऱ्या स्त्रिया, ज्यांना आपल्या विवाहाची आशा (आणि इच्छा) च राहिली नसावी, त्या जर आपले कपडे (पडद्यासाठी वापरलेले) उतरवून ठेवतील तर त्यांच्यावर काही दोष नाही (मात्र या अटीवर) की त्या आपली शोभा- सजावट दाखविणाऱ्या नसाव्यात. तथापि त्यांच्यासाठी हेच अधिक चांगले आहे की त्यांनी यापासून अलिप्त राहावे. आणि अल्लाह सर्व काही ऐकणारा व जाणणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
61 : 24

لَیْسَ عَلَی الْاَعْمٰی حَرَجٌ وَّلَا عَلَی الْاَعْرَجِ حَرَجٌ وَّلَا عَلَی الْمَرِیْضِ حَرَجٌ وَّلَا عَلٰۤی اَنْفُسِكُمْ اَنْ تَاْكُلُوْا مِنْ بُیُوْتِكُمْ اَوْ بُیُوْتِ اٰبَآىِٕكُمْ اَوْ بُیُوْتِ اُمَّهٰتِكُمْ اَوْ بُیُوْتِ اِخْوَانِكُمْ اَوْ بُیُوْتِ اَخَوٰتِكُمْ اَوْ بُیُوْتِ اَعْمَامِكُمْ اَوْ بُیُوْتِ عَمّٰتِكُمْ اَوْ بُیُوْتِ اَخْوَالِكُمْ اَوْ بُیُوْتِ خٰلٰتِكُمْ اَوْ مَا مَلَكْتُمْ مَّفَاتِحَهٗۤ اَوْ صَدِیْقِكُمْ ؕ— لَیْسَ عَلَیْكُمْ جُنَاحٌ اَنْ تَاْكُلُوْا جَمِیْعًا اَوْ اَشْتَاتًا ؕ— فَاِذَا دَخَلْتُمْ بُیُوْتًا فَسَلِّمُوْا عَلٰۤی اَنْفُسِكُمْ تَحِیَّةً مِّنْ عِنْدِ اللّٰهِ مُبٰرَكَةً طَیِّبَةً ؕ— كَذٰلِكَ یُبَیِّنُ اللّٰهُ لَكُمُ الْاٰیٰتِ لَعَلَّكُمْ تَعْقِلُوْنَ ۟۠

६१. आंधळ्याला, पांगळ्याला, रोग्याला आणि स्वतः तुम्हाला कधीही कसलीही हरकत नाही की तुम्ही आपल्या घरी, मावशा किंवा आपल्या पित्याच्या घरी किंवा आपल्या मातांच्या घरी किंवा आपल्या भावांच्या घरी किंवा आपल्या बहीणींच्या घरी किंवा आपल्या चुलत्यांच्या घरी किंवा आपल्या आत्यांच्या घरी किंवा आपल्या मामांच्या घरी किंवा आपल्या मावशींच्या घरी किंवा त्या घरांमध्ये, ज्यांच्या किल्ल्या तुमच्या मालकीच्या असाव्यात किंवा आपल्या मित्रांच्या घरी, तुमच्यावर यातही काही गुन्हा नाही की तुम्ही सर्व एकत्र बसून जेवण घ्यावे किंवा वेगवेगळे बसून परंतु जेव्हा तुम्ही घरांमध्ये प्रवेश करू लागाल तेव्हा आपल्या घरच्या लोकांना सलाम करीत जा. शुभ कामना आहे, जी मंगलप्रद आणि पवित्र अल्लाहतर्फे अवतरित आहे. अशा प्रकारे अल्लाह, आपले आदेश तुम्हाला स्पष्ट करून सांगत आहे, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे. info
التفاسير: