《古兰经》译解 - 蒙达语翻译 - 穆罕默德·舍夫尔·安萨拉。

external-link copy
121 : 2

اَلَّذِیْنَ اٰتَیْنٰهُمُ الْكِتٰبَ یَتْلُوْنَهٗ حَقَّ تِلَاوَتِهٖ ؕ— اُولٰٓىِٕكَ یُؤْمِنُوْنَ بِهٖ ؕ— وَمَنْ یَّكْفُرْ بِهٖ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْخٰسِرُوْنَ ۟۠

१२१. ज्यांना आम्ही ग्रंथ प्रदान केला आणि ते त्याला अशा प्रकारे वाचतात, जसा त्याच्या वाचनाचा हक्क आहे.१ ते या ग्रंथावरही ईमान राखतात आणि जे यावर ईमान राखत नाहीत ते स्वतः आपला तोटा करून घेतात. info

(१) ‘‘ते अशा प्रकारे वाचतात, जसा त्याच्या वाचनाचा हक्क आहे.’’ याचे अनेक अर्थ सांगितले गेले आहेत. उदा. १. ‘‘अगदी लक्षपूर्वक वाचतात’’, जन्नतचे वर्णन आल्यावर जन्नतची अभिलाषा धरतात, तसेच जहन्नमचे वर्णन आल्यावर तिच्यापासून बचाव व्हावा अशी दुआ करतात. २. यात सांगितलेल्या हलाल (वैध) ला हलाल आणि हरामला हराम समजतात आणि अल्लाहच्या ग्रंथात फेरबदल करीत नाही, जसे इतर ग्रंथधारक करीत. ३. त्यात जे काही लिहिले आहे, ते लोकांना सांगतात, त्यातली एकही गोष्ट लपवीत नाही. ४. यातल्या स्पष्ट गोष्टींच्या अनुसार आचरण करतात, अस्पष्ट (संदिग्ध) गोष्टींवर ईमान राखतात आणि ज्या गोष्टींचे आकलन होत नाही, त्या धर्मज्ञानींकडून समजून घेतात.५. त्यातल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करतात.

التفاسير: