《古兰经》译解 - 蒙达语翻译 - 穆罕默德·舍夫尔·安萨拉。

伊斯拉仪

external-link copy
1 : 17

سُبْحٰنَ الَّذِیْۤ اَسْرٰی بِعَبْدِهٖ لَیْلًا مِّنَ الْمَسْجِدِ الْحَرَامِ اِلَی الْمَسْجِدِ الْاَقْصَا الَّذِیْ بٰرَكْنَا حَوْلَهٗ لِنُرِیَهٗ مِنْ اٰیٰتِنَا ؕ— اِنَّهٗ هُوَ السَّمِیْعُ الْبَصِیْرُ ۟

१. पवित्र आहे तो (अल्लाह), जो आपल्या दासाला एका रात्रीतून आदरणीय मस्जिदीपासून, अक्सा मस्जिदपर्यंत घेऊन गेला, जिच्या भोवती आम्ही बरकती प्रदान करून ठेवल्या आहेत. यासाठी की आम्ही त्याला आपल्या सामर्थ्याच्या काही मोठ्या निशाण्या दाखवून द्याव्यात. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाहच चांगल्या प्रकारे ऐकणारा, पाहणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
2 : 17

وَاٰتَیْنَا مُوْسَی الْكِتٰبَ وَجَعَلْنٰهُ هُدًی لِّبَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ اَلَّا تَتَّخِذُوْا مِنْ دُوْنِیْ وَكِیْلًا ۟ؕ

२. आणि आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला आणि त्याला इस्राईलच्या संततीकरिता मार्गदर्शक बनविले की तुम्ही माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही काम बनविणारा बनवू नका. info
التفاسير:

external-link copy
3 : 17

ذُرِّیَّةَ مَنْ حَمَلْنَا مَعَ نُوْحٍ ؕ— اِنَّهٗ كَانَ عَبْدًا شَكُوْرًا ۟

३. हे त्या लोकांपासून जन्मास आलेल्यांनो! ज्यांना आम्ही नूहच्या सोबत नौकेत चढविले होते. तो आमचा मोठा कृतज्ञशील दास होता. info
التفاسير:

external-link copy
4 : 17

وَقَضَیْنَاۤ اِلٰی بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ فِی الْكِتٰبِ لَتُفْسِدُنَّ فِی الْاَرْضِ مَرَّتَیْنِ وَلَتَعْلُنَّ عُلُوًّا كَبِیْرًا ۟

४. आणि आम्ही इस्राईलच्या संततीकरिता त्यांच्या ग्रंथात स्पष्टतः निर्णय दिला होता की तुम्ही धरतीवर दोन वेळा उपद्रव निर्माण कराल, आणि तुम्ही फार जास्त अत्याचार कराल. info
التفاسير:

external-link copy
5 : 17

فَاِذَا جَآءَ وَعْدُ اُوْلٰىهُمَا بَعَثْنَا عَلَیْكُمْ عِبَادًا لَّنَاۤ اُولِیْ بَاْسٍ شَدِیْدٍ فَجَاسُوْا خِلٰلَ الدِّیَارِ وَكَانَ وَعْدًا مَّفْعُوْلًا ۟

५. या दोन्ही वायद्यांपैकी पहिल्या वायद्याची वेळ येताच आम्ही तुमच्यासमोर आपल्या त्या दासांना उठवून उभे केले जे मोठे लढवय्ये होते, मग ते तुमच्या घरांमध्ये अगदी आतापर्यंत पसरले आणि अल्लाहचा वायदा पूर्ण होणारच होता. info
التفاسير:

external-link copy
6 : 17

ثُمَّ رَدَدْنَا لَكُمُ الْكَرَّةَ عَلَیْهِمْ وَاَمْدَدْنٰكُمْ بِاَمْوَالٍ وَّبَنِیْنَ وَجَعَلْنٰكُمْ اَكْثَرَ نَفِیْرًا ۟

६. मग आम्ही तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व देऊन (तुमचे दिवस) पालटले आणि विपुल धन संपत्ती आणि संततीने तुमची मदत केली आणि तुमचे समूह बळ वाढविले. info
التفاسير:

external-link copy
7 : 17

اِنْ اَحْسَنْتُمْ اَحْسَنْتُمْ لِاَنْفُسِكُمْ ۫— وَاِنْ اَسَاْتُمْ فَلَهَا ؕ— فَاِذَا جَآءَ وَعْدُ الْاٰخِرَةِ لِیَسُوْٓءٗا وُجُوْهَكُمْ وَلِیَدْخُلُوا الْمَسْجِدَ كَمَا دَخَلُوْهُ اَوَّلَ مَرَّةٍ وَّلِیُتَبِّرُوْا مَا عَلَوْا تَتْبِیْرًا ۟

७. जर तुम्ही सत्कर्म कराल तर स्वतः आपल्या फायद्याकरिता कराल आणि जर तुम्ही वाईट कर्मे कराल तर ते देखील स्वतःसाठीच. मग जेव्हा दुसऱ्या वायद्याची वेळ आली, तेव्हा (आम्ही दुसऱ्या दासांना पाठविले) यासाठी की त्यांनी तुमचा चेहरा बिघडवून टाकावा आणि पहिल्या खेपेप्रमाणे पुन्हा त्याच मस्जिदीत घुसावे आणि जी काही वस्तू ताब्यात येईल, तोडफोड करून मुळासकट उपटून टाकावी. info
التفاسير: