పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

external-link copy
49 : 3

وَرَسُوْلًا اِلٰی بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ ۙ۬— اَنِّیْ قَدْ جِئْتُكُمْ بِاٰیَةٍ مِّنْ رَّبِّكُمْ ۙۚ— اَنِّیْۤ اَخْلُقُ لَكُمْ مِّنَ الطِّیْنِ كَهَیْـَٔةِ الطَّیْرِ فَاَنْفُخُ فِیْهِ فَیَكُوْنُ طَیْرًا بِاِذْنِ اللّٰهِ ۚ— وَاُبْرِئُ الْاَكْمَهَ وَالْاَبْرَصَ وَاُحْیِ الْمَوْتٰی بِاِذْنِ اللّٰهِ ۚ— وَاُنَبِّئُكُمْ بِمَا تَاْكُلُوْنَ وَمَا تَدَّخِرُوْنَ ۙ— فِیْ بُیُوْتِكُمْ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیَةً لَّكُمْ اِنْ كُنْتُمْ مُّؤْمِنِیْنَ ۟ۚ

४९. आणि तो इस्राईलच्या संततीचा रसूल (पैगंबर) असेल की मी तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्याची निशाणी आणली आहे, मी तुमच्यासाठी पक्ष्याच्या रूपासारखीच मातीची एक चिमणी बनवितो, मग तिच्यात फुंकर मारतो तर ती अल्लाहच्या हुकुमाने (जिवंत) पक्षी बनते आणि मी अल्लाहच्या हुकुमाने जन्मजात आंधळ्याला आणि कोढी इसमाला चांगले करतो, आणि मेलेल्याला जिवंत करतो आणि जे काही तुम्ही खाऊन येता आणि जे काही तुम्ही आपल्या घरांमध्ये जमा करता मी ते तुम्हाला सांगतो. यात तुमच्यासाठी मोठी निशाणी आहे, जर तुम्ही ईमान राखणारे असाल! info
التفاسير: