పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

పేజీ నెంబరు:close

external-link copy
47 : 22

وَیَسْتَعْجِلُوْنَكَ بِالْعَذَابِ وَلَنْ یُّخْلِفَ اللّٰهُ وَعْدَهٗ ؕ— وَاِنَّ یَوْمًا عِنْدَ رَبِّكَ كَاَلْفِ سَنَةٍ مِّمَّا تَعُدُّوْنَ ۟

४७. आणि ते तुमच्याजवळ अल्लाहच्या शिक्षा- यातनेची घाई करीत आहेत. अल्लाह आपले वचन कदापि टाळणार नाही. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याजवळ एक दिवस, तुमच्या (काल) गणनेनुसार एक हजार वर्षांचा आहे. info
التفاسير:

external-link copy
48 : 22

وَكَاَیِّنْ مِّنْ قَرْیَةٍ اَمْلَیْتُ لَهَا وَهِیَ ظَالِمَةٌ ثُمَّ اَخَذْتُهَا ۚ— وَاِلَیَّ الْمَصِیْرُ ۟۠

४८. आणि कित्येक अत्याचारी वस्तींना आम्ही ढील (सूट) दिली मग शेवटी त्यांना पकडीत घेतले आणि माझ्याचकडे परतून यायचे आहे. info
التفاسير:

external-link copy
49 : 22

قُلْ یٰۤاَیُّهَا النَّاسُ اِنَّمَاۤ اَنَا لَكُمْ نَذِیْرٌ مُّبِیْنٌ ۟ۚ

४९. ऐलान करा की, लोक हो! मी तुम्हाला उघडरित्या सावधान करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
50 : 22

فَالَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ لَهُمْ مَّغْفِرَةٌ وَّرِزْقٌ كَرِیْمٌ ۟

५०. तेव्हा ज्या लोकांनी ई्‌मान राखले आहे आणि सत्कर्मे केली आहेत त्यांच्यासाठी मोक्षप्राप्ती आहे आणि मान-सन्मानपूर्ण आजिविका. info
التفاسير:

external-link copy
51 : 22

وَالَّذِیْنَ سَعَوْا فِیْۤ اٰیٰتِنَا مُعٰجِزِیْنَ اُولٰٓىِٕكَ اَصْحٰبُ الْجَحِیْمِ ۟

५१. आणि जे लोक आमच्या आयतींचा अवमान करण्यामागे लागेले आहेत, तेच जहन्नमी आहेत. info
التفاسير:

external-link copy
52 : 22

وَمَاۤ اَرْسَلْنَا مِنْ قَبْلِكَ مِنْ رَّسُوْلٍ وَّلَا نَبِیٍّ اِلَّاۤ اِذَا تَمَنّٰۤی اَلْقَی الشَّیْطٰنُ فِیْۤ اُمْنِیَّتِهٖ ۚ— فَیَنْسَخُ اللّٰهُ مَا یُلْقِی الشَّیْطٰنُ ثُمَّ یُحْكِمُ اللّٰهُ اٰیٰتِهٖ ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌ حَكِیْمٌ ۟ۙ

५२. आणि आम्ही तुमच्यापूर्वी जो रसूल आणि नबी पाठविला (त्याच्यासोबत हे हमखास घडले की) जेव्हा तो आपल्या मनात एखादी इच्छा धरू लागला, सैतानाने त्याच्या मनोकामनेत काही मिसळून दिले तेव्हा सैतानाच्या भेसळीला अल्लाह दूर करतो, मग आपल्या वचनांना मजबूत करतो. सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही जाणणारा, किमत बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
53 : 22

لِّیَجْعَلَ مَا یُلْقِی الشَّیْطٰنُ فِتْنَةً لِّلَّذِیْنَ فِیْ قُلُوْبِهِمْ مَّرَضٌ وَّالْقَاسِیَةِ قُلُوْبُهُمْ ؕ— وَاِنَّ الظّٰلِمِیْنَ لَفِیْ شِقَاقٍ بَعِیْدٍ ۟ۙ

५३. हे यासाठी की सैतानाच्या भेसळीला अल्लाहने त्या लोकांच्या कसोटीची सामुग्री बनवावे, ज्यांच्या मनात रोग आहे आणि ज्यांची मने कठोर आहेत. निःसंशय अत्याचारी लोक सक्त विरोधात आहेत. info
التفاسير:

external-link copy
54 : 22

وَّلِیَعْلَمَ الَّذِیْنَ اُوْتُوا الْعِلْمَ اَنَّهُ الْحَقُّ مِنْ رَّبِّكَ فَیُؤْمِنُوْا بِهٖ فَتُخْبِتَ لَهٗ قُلُوْبُهُمْ ؕ— وَاِنَّ اللّٰهَ لَهَادِ الَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اِلٰی صِرَاطٍ مُّسْتَقِیْمٍ ۟

५४. आणि यासाठीही की ज्यांना ज्ञान प्रदान केले गेले आहे, त्यांनी विश्वास करून घ्यावा की हे तुमच्या पालनकर्त्याच्याच तर्फे पूर्ण सत्य आहे, मग त्यांनी त्यावर ईमान राखावे आणि त्यांची हृदये त्याकडे झुकावित. निःसंशय अल्लाह ईमान राखणाऱ्यांना सत्य मार्गाकडे मार्गदर्शन करणारच आहे. info
التفاسير:

external-link copy
55 : 22

وَلَا یَزَالُ الَّذِیْنَ كَفَرُوْا فِیْ مِرْیَةٍ مِّنْهُ حَتّٰی تَاْتِیَهُمُ السَّاعَةُ بَغْتَةً اَوْ یَاْتِیَهُمْ عَذَابُ یَوْمٍ عَقِیْمٍ ۟

५५. आणि इन्कारी (काफिर) लोक अल्लाहच्या वहयीबाबत नेहमी संशयग्रस्तच राहतील, येथपर्यंत की अचानक त्यांच्या डोक्यावर कयामत येऊन पोहचावी किंवा त्यांच्याजवळ त्या दिवसाची शिक्षा- यातना येऊन पोहचावी, ज्यात किंचितही भलाई नाही. info
التفاسير: