పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

external-link copy
190 : 2

وَقَاتِلُوْا فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ الَّذِیْنَ یُقَاتِلُوْنَكُمْ وَلَا تَعْتَدُوْا ؕ— اِنَّ اللّٰهَ لَا یُحِبُّ الْمُعْتَدِیْنَ ۟

१९०. आणि लढा अल्लाहच्या मार्गात त्यांच्याशी, जे तुमच्याशी लढतात आणि अत्याचार करू नका.१ निःसंशय, अल्लाह अत्याचारीला पसंत करीत नाही. info

(१) या आयतीत पहिल्यांदा त्या लोकांशी लढण्याचा आदेश दिला गेला आहे, जो नेहमी मुसलमानांना ठार मारण्याचा इरादा राखतात, तरीही अतिरेक करण्यापासून रोखले गेले आहे. याचा अर्थ असा की लढताना अतिरेकाची सीमा गाठू नका, अमानवीय अत्याचार करू नका. स्त्रिया, लहान मुले, वृद्ध वगैरे ज्यांचा लढाईत सहभाग नाही त्यांना ठार करू नका. झाडे, घरेदारे, मुकी जनावरे यांना मारून टाकणे किंवा जाळणे वगैरे आततायी गोष्टी आहेत. हा अतिरेक करण्यापासून दूर राहा. (इब्ने कसीर)

التفاسير: