(१) अपराधाशी अभिप्रेत अल्लाहची अवज्ञा करणे, त्याच्या आदेशाविरूद्ध वागणे. एका हदीसनुसार, पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, गुन्हा तो होय, जो तुझ्या छातीत (मनात) खटकेल आणि लोकांना हे माहीत झाल्यावर तुला वाईट वाटावे. (सहीह मुस्लिम- किताबुल बिर्र) काही लोकांच्या मते गुन्हा तो आहे, ज्याचा प्रभाव करणाऱ्यापर्यंत सीमित असावा आणि बग़य(अरबी शब्द) तो आहे, ज्याचा परिणाम इतरांपर्यंतही पोहचावा. इथे बग़य सोबत नाहकचा अर्थ, अकारण अत्याचार, अतिरेक. उदा. लोकांचा हक्क हडप करणे, एखाद्याचे धन हिसकावून घेणे, अकारण मारणे, झोडणे आणि कारण नसताना बरे-वाईट व सक्त शब्द वापरून एखाद्याला अपमानित करणे वगैरे.