அல்குர்ஆன் மொழிபெயர்ப்பு - மராத்தி மொழிபெயர்ப்பு - முஹம்மத் ஷபீஃ அன்ஸாரீ

பக்க எண்:close

external-link copy
5 : 63

وَاِذَا قِیْلَ لَهُمْ تَعَالَوْا یَسْتَغْفِرْ لَكُمْ رَسُوْلُ اللّٰهِ لَوَّوْا رُءُوْسَهُمْ وَرَاَیْتَهُمْ یَصُدُّوْنَ وَهُمْ مُّسْتَكْبِرُوْنَ ۟

५. आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की, या, अल्लाहच्या पैगंबराने तुमच्यासाठी क्षमा याचनेची प्रार्थना करावी, तेव्हा आपल्या माना फिरवतात आणि तुम्ही त्यांना पाहाल की ते गर्व (घमेंड) करीत थांबतात. info
التفاسير:

external-link copy
6 : 63

سَوَآءٌ عَلَیْهِمْ اَسْتَغْفَرْتَ لَهُمْ اَمْ لَمْ تَسْتَغْفِرْ لَهُمْ ؕ— لَنْ یَّغْفِرَ اللّٰهُ لَهُمْ ؕ— اِنَّ اللّٰهَ لَا یَهْدِی الْقَوْمَ الْفٰسِقِیْنَ ۟

६. तुम्ही त्यांच्याकरिता माफीची प्रार्थना करणे आणि न करणे सारखेच आहे. अल्लाहच्यांना कधीही माफ करणार नाही. निःसंशय, अल्लाह अशा दुराचारी लोकांना मार्ग दाखवित नाही. info
التفاسير:

external-link copy
7 : 63

هُمُ الَّذِیْنَ یَقُوْلُوْنَ لَا تُنْفِقُوْا عَلٰی مَنْ عِنْدَ رَسُوْلِ اللّٰهِ حَتّٰی یَنْفَضُّوْا ؕ— وَلِلّٰهِ خَزَآىِٕنُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ وَلٰكِنَّ الْمُنٰفِقِیْنَ لَا یَفْقَهُوْنَ ۟

७. हेच ते लोक होत जे म्हणतात की जे लोक अल्लाहच्या पैगंबरासोबत आहेत, त्यांच्यावर काही खर्च करू नका, येथे पर्यंत की ते इतस्ततः व्हावेत वस्तुतः आकाशांचे आणि जमिनीचे सर्व खजिने अल्लाहच्याच मालकीचे आहेत, परंतु या दांभिकांना हे समजत नाही. info
التفاسير:

external-link copy
8 : 63

یَقُوْلُوْنَ لَىِٕنْ رَّجَعْنَاۤ اِلَی الْمَدِیْنَةِ لَیُخْرِجَنَّ الْاَعَزُّ مِنْهَا الْاَذَلَّ ؕ— وَلِلّٰهِ الْعِزَّةُ وَلِرَسُوْلِهٖ وَلِلْمُؤْمِنِیْنَ وَلٰكِنَّ الْمُنٰفِقِیْنَ لَا یَعْلَمُوْنَ ۟۠

८. हे म्हणतात की जर आम्ही आता परतून मदीना येथे गेलो तर प्रतिष्ठा बाळगणारा, अपमानितास तेथून बाहेर काढील. (ऐका) मान-प्रतिष्ठा तर केवळ अल्लाहकरिता आणि त्याच्या पैगंबराकरिता व ईमान राखणाऱ्यांकरिता आहे, तथापि हे दांभिक (मुनाफिक) जाणत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
9 : 63

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَا تُلْهِكُمْ اَمْوَالُكُمْ وَلَاۤ اَوْلَادُكُمْ عَنْ ذِكْرِ اللّٰهِ ۚ— وَمَنْ یَّفْعَلْ ذٰلِكَ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْخٰسِرُوْنَ ۟

९. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्या धनसंपत्ती व संततीने तुम्हाला अल्लाहच्या स्मरणापासून गाफील न करावे१ आणि जे असे करतील, तेच लोक नुकसान उचलणारे (तोट्यात राहणारे) आहेत. info

(१) अर्थात धन-संपत्ती आणि संततीचे प्रेम तुमच्यावर इतके प्रभावी न व्हावे की तुम्ही अल्लाहने फर्माविलेल्या आदेशांपासून व कर्तव्यांपासून निर्धास्त व्हावे आणि अल्लाहने निर्धारित केलेल्या हलाल (वैध) आणि हराम (अवैध) च्या मर्यादांची काळजी न घ्यावी. मुनाफिक लोकांचा उल्लेख केल्यानंतर त्वरित ही ताकिद करण्याचा हेतू हा आहे की ही मुनाफिक लोकांची पद्धती आहे, जी माणसाला हानिग्रस्त करणारी आहे. ईमान राखणाऱ्यांचे वर्तन याच्या अगदी उलट असते आणि ते असे की ते प्रत्येक क्षणी अल्लाहचे स्मरण राखतात, अर्थात त्याच्या आदेशांचे अनिवार्य केलेल्या गोष्टींचे पालन करतात आणि हलाल व हराममध्ये फरक राखतात.

التفاسير:

external-link copy
10 : 63

وَاَنْفِقُوْا مِنْ مَّا رَزَقْنٰكُمْ مِّنْ قَبْلِ اَنْ یَّاْتِیَ اَحَدَكُمُ الْمَوْتُ فَیَقُوْلَ رَبِّ لَوْلَاۤ اَخَّرْتَنِیْۤ اِلٰۤی اَجَلٍ قَرِیْبٍ ۙ— فَاَصَّدَّقَ وَاَكُنْ مِّنَ الصّٰلِحِیْنَ ۟

१०. आणि आम्ही जे काही तुम्हाला प्रदान केले आहे, त्याच्यातून (आमच्या मार्गात) खर्च करा, यापूर्वी की तुमच्यापैकी एखाद्याला मरण यावे, तेव्हा म्हणू लागले की, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला थोड्या उशिराची सवड का नाही देत? की मी दान-पुण्य करावे आणि नेक व सदाचारी लोकांपैकी व्हावे. info
التفاسير:

external-link copy
11 : 63

وَلَنْ یُّؤَخِّرَ اللّٰهُ نَفْسًا اِذَا جَآءَ اَجَلُهَا ؕ— وَاللّٰهُ خَبِیْرٌ بِمَا تَعْمَلُوْنَ ۟۠

११. आणि जेव्हा एखाद्याची निर्धारित वेळ येऊन पोहोचते, मग अल्लाह त्याला काहीच सवड देत नाही आणि तुम्ही जे काही करता अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير: