அல்குர்ஆன் மொழிபெயர்ப்பு - மராத்தி மொழிபெயர்ப்பு - முஹம்மத் ஷபீஃ அன்ஸாரீ

அல்ஹஷ்ர்

external-link copy
1 : 59

سَبَّحَ لِلّٰهِ مَا فِی السَّمٰوٰتِ وَمَا فِی الْاَرْضِ ۚ— وَهُوَ الْعَزِیْزُ الْحَكِیْمُ ۟

१. आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू अल्लाहच्या पवित्रतेसह गुणगान करते आणि तो मोठा वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
2 : 59

هُوَ الَّذِیْۤ اَخْرَجَ الَّذِیْنَ كَفَرُوْا مِنْ اَهْلِ الْكِتٰبِ مِنْ دِیَارِهِمْ لِاَوَّلِ الْحَشْرِ ؔؕ— مَا ظَنَنْتُمْ اَنْ یَّخْرُجُوْا وَظَنُّوْۤا اَنَّهُمْ مَّا نِعَتُهُمْ حُصُوْنُهُمْ مِّنَ اللّٰهِ فَاَتٰىهُمُ اللّٰهُ مِنْ حَیْثُ لَمْ یَحْتَسِبُوْا وَقَذَفَ فِیْ قُلُوْبِهِمُ الرُّعْبَ یُخْرِبُوْنَ بُیُوْتَهُمْ بِاَیْدِیْهِمْ وَاَیْدِی الْمُؤْمِنِیْنَ ۗ— فَاعْتَبِرُوْا یٰۤاُولِی الْاَبْصَارِ ۟

२. तोच आहे ज्याने ग्रंथधारकांमधल्या काफिरांना त्यांच्या घरातून पहिल्या हश्र (एकत्र होण्याचा) वेळी काढले. तुम्हाला कल्पनाही नव्हती की ते निघतील आणि ते स्वतः समजत होते की त्याचे मजबूत किल्ले त्यांना अल्लाहच्या शिक्षा यातनेपासून वाचवून घेतील. तेव्हा त्यांच्यावर अल्लाह (चा प्रकोप) अशा ठिकाणाहून येऊन कोसळला की त्यांना त्याचे अनुमानही नव्हती आणि त्यांच्या मनात अल्लाहने भय टाकले, ते आपल्या घरांना आपल्याच हातांनी ओसाड करीत होते आणि ईमान राखणाऱ्यांच्या हातून (नष्ट करीत होते) तेव्हा, हे डोळे राखणाऱ्यांनो! बोध ग्रहण करा. info
التفاسير:

external-link copy
3 : 59

وَلَوْلَاۤ اَنْ كَتَبَ اللّٰهُ عَلَیْهِمُ الْجَلَآءَ لَعَذَّبَهُمْ فِی الدُّنْیَا ؕ— وَلَهُمْ فِی الْاٰخِرَةِ عَذَابُ النَّارِ ۟

३. आणि जर अल्लाहने त्यांच्यासाठी हद्दपारी लिहिली नसती तर निश्चितच त्यांना या जगातच शिक्षा यातना दिली असती आणि आखिरतमध्ये (तर) त्यांच्यासाठी आगीची शिक्षा आहेच. info
التفاسير: