அல்குர்ஆன் மொழிபெயர்ப்பு - மராத்தி மொழிபெயர்ப்பு - முஹம்மத் ஷபீஃ அன்ஸாரீ

பக்க எண்:close

external-link copy
12 : 57

یَوْمَ تَرَی الْمُؤْمِنِیْنَ وَالْمُؤْمِنٰتِ یَسْعٰی نُوْرُهُمْ بَیْنَ اَیْدِیْهِمْ وَبِاَیْمَانِهِمْ بُشْرٰىكُمُ الْیَوْمَ جَنّٰتٌ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ خٰلِدِیْنَ فِیْهَا ؕ— ذٰلِكَ هُوَ الْفَوْزُ الْعَظِیْمُ ۟ۚ

१२. (कयामतच्या) दिवशी तुम्ही पाहाल की ईमान राखणाऱ्या पुरुषांचे आणि स्त्रियांचे तेज (नूर) त्यांच्या पुढे पुढे आणि त्यांच्या उजवीकडे धावत असेल. आज तुम्हाला त्या जन्नतींचा शुभ समाचार आहे, ज्यांच्या खाली (थंड पाण्याचे) प्रवाह वाहत आहेत, ज्यात ते नेहमी राहतील, हीच मोठी सफलता आहे. info
التفاسير:

external-link copy
13 : 57

یَوْمَ یَقُوْلُ الْمُنٰفِقُوْنَ وَالْمُنٰفِقٰتُ لِلَّذِیْنَ اٰمَنُوا انْظُرُوْنَا نَقْتَبِسْ مِنْ نُّوْرِكُمْ ۚ— قِیْلَ ارْجِعُوْا وَرَآءَكُمْ فَالْتَمِسُوْا نُوْرًا ؕ— فَضُرِبَ بَیْنَهُمْ بِسُوْرٍ لَّهٗ بَابٌ ؕ— بَاطِنُهٗ فِیْهِ الرَّحْمَةُ وَظَاهِرُهٗ مِنْ قِبَلِهِ الْعَذَابُ ۟ؕ

१३. त्या दिवशी दांभिक (मूनाफिक) पुरुष आणि दांभिक स्त्रिया ईमानधारकांना म्हणतील की आमची प्रतीक्षा तर करा की आम्हीही तुमच्या प्रकाशामधून थोडा प्रकाशा घ्यावा, उत्तर दिले जाईल की तुम्ही मागे फिरा आणि प्रकाश शोधा, मग त्यांच्या आणि यांच्या दरम्यान एक भिंत उभी केली जाईल, जिच्यात दरवाजाही असेल, त्याच्या आतल्या भागात रहमत (अल्लाहची कृपा) असेल आणि बाहेरच्या भागात अज़ाब (शिक्षा - यातना) असेल. info
التفاسير:

external-link copy
14 : 57

یُنَادُوْنَهُمْ اَلَمْ نَكُنْ مَّعَكُمْ ؕ— قَالُوْا بَلٰی وَلٰكِنَّكُمْ فَتَنْتُمْ اَنْفُسَكُمْ وَتَرَبَّصْتُمْ وَارْتَبْتُمْ وَغَرَّتْكُمُ الْاَمَانِیُّ حَتّٰی جَآءَ اَمْرُ اللّٰهِ وَغَرَّكُمْ بِاللّٰهِ الْغَرُوْرُ ۟

१४. हे ओरडून ओरडून त्यांना सांगतील की काय आम्ही तुमच्यासोबत नव्हतो? ते म्हणतील, हो, होते जरूर, परंतु तुम्ही स्वतःला मार्गभ्रष्टतेत ठेवले होते. आणि प्रतीक्षा करीत राहिले आणि शंका - संशय करीत राहिले आणि तुम्हाला तुमच्या (निरर्थक) इच्छा आकांक्षांनी धोक्यातच ठेवले येथेपर्यंत की अल्लाहचा आदेश येऊन पोहोचला आणि तुम्हाला अल्लाहच्या बाबतीत धोका देणाऱ्याने धोक्यातच ठेवले. info
التفاسير:

external-link copy
15 : 57

فَالْیَوْمَ لَا یُؤْخَذُ مِنْكُمْ فِدْیَةٌ وَّلَا مِنَ الَّذِیْنَ كَفَرُوْا ؕ— مَاْوٰىكُمُ النَّارُ ؕ— هِیَ مَوْلٰىكُمْ ؕ— وَبِئْسَ الْمَصِیْرُ ۟

१५. तेव्हा आज ना तुमच्याकडून फिदिया (आणि न बदला) स्वीकारला जाईल आणि ना काफिरांकडून. तुम्हा सर्वांचे ठिकाण जहन्नम आहे. तीच तुमची सोबती आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे. info
التفاسير:

external-link copy
16 : 57

اَلَمْ یَاْنِ لِلَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اَنْ تَخْشَعَ قُلُوْبُهُمْ لِذِكْرِ اللّٰهِ وَمَا نَزَلَ مِنَ الْحَقِّ ۙ— وَلَا یَكُوْنُوْا كَالَّذِیْنَ اُوْتُوا الْكِتٰبَ مِنْ قَبْلُ فَطَالَ عَلَیْهِمُ الْاَمَدُ فَقَسَتْ قُلُوْبُهُمْ ؕ— وَكَثِیْرٌ مِّنْهُمْ فٰسِقُوْنَ ۟

१६. काय अजूनपर्यंत ईमान राखणाऱ्यांकरिता ती वेळ नाही आली की त्यांची हृदये अल्लाहच्या स्मरणाने आणि जे सत्य अवतरित झाले आहे त्याने कोमल व्हावीत, आणि त्या लोकांसारखी न व्हावीत, ज्यांना यांच्या पूर्वी ग्रंथ प्रदान केला गेला, मग जेव्हा त्यांच्यावर एक दीर्घ मुदत लोटली, तेव्हा त्यांची हृदये कठोर झालीत आणि त्यांच्यापैकी अधिकांश दुराचारी आहेत. info
التفاسير:

external-link copy
17 : 57

اِعْلَمُوْۤا اَنَّ اللّٰهَ یُحْیِ الْاَرْضَ بَعْدَ مَوْتِهَا ؕ— قَدْ بَیَّنَّا لَكُمُ الْاٰیٰتِ لَعَلَّكُمْ تَعْقِلُوْنَ ۟

१७. विश्वास राखा की अल्लाहच धरतीला तिच्या मृत्युनंतर जिवंत करतो. आम्ही तर तुमच्यासाठी आपल्या निशाण्या स्पष्ट सांगितल्या, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे. info
التفاسير:

external-link copy
18 : 57

اِنَّ الْمُصَّدِّقِیْنَ وَالْمُصَّدِّقٰتِ وَاَقْرَضُوا اللّٰهَ قَرْضًا حَسَنًا یُّضٰعَفُ لَهُمْ وَلَهُمْ اَجْرٌ كَرِیْمٌ ۟

१८. निःसंशय, दान देणारे पुरुष आणि स्त्रिया आणि जे अल्लाहला प्रेमाने चांगले कर्ज देत आहेत त्यांच्यासाठी अनेक पटींनी वाढविले जाईल, आणि त्यांच्यासाठी उत्तम असा मोबदला आहे. info
التفاسير: