அல்குர்ஆன் மொழிபெயர்ப்பு - மராத்தி மொழிபெயர்ப்பு - முஹம்மத் ஷபீஃ அன்ஸாரீ

பக்க எண்:close

external-link copy
32 : 42

وَمِنْ اٰیٰتِهِ الْجَوَارِ فِی الْبَحْرِ كَالْاَعْلَامِ ۟ؕ

३२. आणि समुद्रात चालणाऱ्या पर्वतांसमान नौका, त्याच्या निशाण्यांपैकी आहेत. info
التفاسير:

external-link copy
33 : 42

اِنْ یَّشَاْ یُسْكِنِ الرِّیْحَ فَیَظْلَلْنَ رَوَاكِدَ عَلٰی ظَهْرِهٖ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّكُلِّ صَبَّارٍ شَكُوْرٍ ۟ۙ

३३. जर त्याने इच्छिले तर हवा बंद करील आणि या नौका समुद्रात स्थिर थांबतील. निःसंशय, यात प्रत्येक सहनशील, कृतज्ञशील माणसाकरिता निशाण्या आहेत. info
التفاسير:

external-link copy
34 : 42

اَوْ یُوْبِقْهُنَّ بِمَا كَسَبُوْا وَیَعْفُ عَنْ كَثِیْرٍ ۟ۙ

३४. किंवा त्यांना त्यांच्या दुष्कृत्यांपायी नष्ट करून टाकील. तो तर बहुतेक चूका माफ करतो. info
التفاسير:

external-link copy
35 : 42

وَّیَعْلَمَ الَّذِیْنَ یُجَادِلُوْنَ فِیْۤ اٰیٰتِنَا ؕ— مَا لَهُمْ مِّنْ مَّحِیْصٍ ۟

३५. आणि यासाठी की जे लोक आमच्या निशाण्यांबाबत वाद घालतात, त्यांनी जाणून घ्यावे की त्यांच्याकरिता कशाही प्रकारे सुटका नाही. info
التفاسير:

external-link copy
36 : 42

فَمَاۤ اُوْتِیْتُمْ مِّنْ شَیْءٍ فَمَتَاعُ الْحَیٰوةِ الدُّنْیَا ۚ— وَمَا عِنْدَ اللّٰهِ خَیْرٌ وَّاَبْقٰی لِلَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَلٰی رَبِّهِمْ یَتَوَكَّلُوْنَ ۟ۚ

३६. तेव्हा तुम्हाला जे काही दिले गेले आहे ते ऐहिक जीवनाची अल्पशी साधन-सामुग्री आहे आणि अल्लाहजवळ जे आहे ते त्यापेक्षा अनेक पटींनी चांगले व बाकी राहणारे आहे. ते त्या लोकांकरिता आहे ज्यांनी ईमान राखले आणि जे केवळ आपल्या पालकनर्त्यावरच भरवसा राखतात. info
التفاسير:

external-link copy
37 : 42

وَالَّذِیْنَ یَجْتَنِبُوْنَ كَبٰٓىِٕرَ الْاِثْمِ وَالْفَوَاحِشَ وَاِذَا مَا غَضِبُوْا هُمْ یَغْفِرُوْنَ ۟ۚ

३७. आणि ते मोठ्या अपराधांपासून आणि निर्लज्जतेच्या कामांपासून अलिप्त राहतात आणि क्रोधाच्या वेळीही माफ करतात. info
التفاسير:

external-link copy
38 : 42

وَالَّذِیْنَ اسْتَجَابُوْا لِرَبِّهِمْ وَاَقَامُوا الصَّلٰوةَ ۪— وَاَمْرُهُمْ شُوْرٰی بَیْنَهُمْ ۪— وَمِمَّا رَزَقْنٰهُمْ یُنْفِقُوْنَ ۟ۚ

३८. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश स्वीकारतात आणि नमाजला नियमितपणे कायम करतात आणि त्यांचे प्रत्येक काम आपसातील सल्लामसलतीने पार पडते. आणि आम्ही जे काही त्यांना देऊन ठेवले आहे, त्यातून (आमच्या नावाने) देत असतात. info
التفاسير:

external-link copy
39 : 42

وَالَّذِیْنَ اِذَاۤ اَصَابَهُمُ الْبَغْیُ هُمْ یَنْتَصِرُوْنَ ۟

३९. आणि जेव्हा त्यांच्यावर अत्याचार (व क्रूरता) होते तेव्हा ते केवळ प्रतिशोध घेतात. info
التفاسير:

external-link copy
40 : 42

وَجَزٰٓؤُا سَیِّئَةٍ سَیِّئَةٌ مِّثْلُهَا ۚ— فَمَنْ عَفَا وَاَصْلَحَ فَاَجْرُهٗ عَلَی اللّٰهِ ؕ— اِنَّهٗ لَا یُحِبُّ الظّٰلِمِیْنَ ۟

४०. आणि दुचाराचा मोबदला त्याच प्रकारचा दुराचार आहे आणि जो कोणी माफ करील आणि (आपल्या आचरणात) सुधारणा करून घेईल तर त्याचा मोबदला अल्लाहच्या जबाबदारीवर आहे, वस्तुतः अल्लाह अत्याचारींशी प्रेम राखत नाही. info
التفاسير:

external-link copy
41 : 42

وَلَمَنِ انْتَصَرَ بَعْدَ ظُلْمِهٖ فَاُولٰٓىِٕكَ مَا عَلَیْهِمْ مِّنْ سَبِیْلٍ ۟ؕ

४१. आणि जो मनुष्य आपल्यावर अत्याचार झाल्यानंतर सूड घेईल तर अशा माणसावर दोषारोप ठेवण्याचा मार्ग नाही. info
التفاسير:

external-link copy
42 : 42

اِنَّمَا السَّبِیْلُ عَلَی الَّذِیْنَ یَظْلِمُوْنَ النَّاسَ وَیَبْغُوْنَ فِی الْاَرْضِ بِغَیْرِ الْحَقِّ ؕ— اُولٰٓىِٕكَ لَهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۟

४२. (दोषारोपाचा) मार्ग तर अशा लोकांवर आहे, जे स्वतः दुसऱ्यांवर जुलूम अत्याचार करतात आणि धरतीवर नाहक उत्पात (फसाद) माजवित फिरतात. अशाच लोकांकरिता दुःखदायक शिक्षा-यातना (अज़ाब) आहे. info
التفاسير:

external-link copy
43 : 42

وَلَمَنْ صَبَرَ وَغَفَرَ اِنَّ ذٰلِكَ لَمِنْ عَزْمِ الْاُمُوْرِ ۟۠

४३. आणि जो मनुष्य सहनशीलता राखेल आणि माफ करेल तर निःसंशय हे मोठ्या हिंमतीच्या कामांपैकी (एक काम) आहे. info
التفاسير:

external-link copy
44 : 42

وَمَنْ یُّضْلِلِ اللّٰهُ فَمَا لَهٗ مِنْ وَّلِیٍّ مِّنْ بَعْدِهٖ ؕ— وَتَرَی الظّٰلِمِیْنَ لَمَّا رَاَوُا الْعَذَابَ یَقُوْلُوْنَ هَلْ اِلٰی مَرَدٍّ مِّنْ سَبِیْلٍ ۟ۚ

४४. आणि ज्याला अल्लाह पथभ्रष्ट करील, त्यानंतर त्याचा कोणी मित्र व संरक्षक नाही, आणि तुम्ही पाहाल की अत्याचारी लोक शिक्षा-यातनांना पाहून म्हणत असतील की, परतीचा एखादा मार्ग आहे काय? info
التفاسير: