அல்குர்ஆன் மொழிபெயர்ப்பு - மராத்தி மொழிபெயர்ப்பு - முஹம்மத் ஷபீஃ அன்ஸாரீ

அந்நம்ல்

external-link copy
1 : 27

طٰسٓ ۫— تِلْكَ اٰیٰتُ الْقُرْاٰنِ وَكِتَابٍ مُّبِیْنٍ ۟ۙ

१. ता - सीन या आयती आहेत कुरआनच्या (अर्थात स्पष्ट) आणि दिव्य ग्रंथाच्या. info
التفاسير:

external-link copy
2 : 27

هُدًی وَّبُشْرٰی لِلْمُؤْمِنِیْنَ ۟ۙ

२. मार्गदर्शन आणि खूशखबर, ईमान राखणाऱ्यांकरिता. info
التفاسير:

external-link copy
3 : 27

الَّذِیْنَ یُقِیْمُوْنَ الصَّلٰوةَ وَیُؤْتُوْنَ الزَّكٰوةَ وَهُمْ بِالْاٰخِرَةِ هُمْ یُوْقِنُوْنَ ۟

३. जे नमाज कायम करतात आणि जकात अदा करतात आणि आखिरतवर ईमान राखतात. info
التفاسير:

external-link copy
4 : 27

اِنَّ الَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ بِالْاٰخِرَةِ زَیَّنَّا لَهُمْ اَعْمَالَهُمْ فَهُمْ یَعْمَهُوْنَ ۟ؕ

४. जे लोक कयामतवर ईमान राखत नाही, आम्ही त्यांच्यासाठी त्यांची कर्मे सुशोभित करून दाखविली आहेत, यास्तव ते भटकत फिरतात. info
التفاسير:

external-link copy
5 : 27

اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ لَهُمْ سُوْٓءُ الْعَذَابِ وَهُمْ فِی الْاٰخِرَةِ هُمُ الْاَخْسَرُوْنَ ۟

५. हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी मोठी वाईट शिक्षा- यातना आहे, आणि आखिरतमध्येही ते मोठे नुकसान उचलणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
6 : 27

وَاِنَّكَ لَتُلَقَّی الْقُرْاٰنَ مِنْ لَّدُنْ حَكِیْمٍ عَلِیْمٍ ۟

६. आणि निःसंशय तुम्हाला कुरआन शिकविला जात आहे, हिकमतशाली आणि सर्वकाही जाणणाऱ्या अल्लाहतर्फे. info
التفاسير:

external-link copy
7 : 27

اِذْ قَالَ مُوْسٰی لِاَهْلِهٖۤ اِنِّیْۤ اٰنَسْتُ نَارًا ؕ— سَاٰتِیْكُمْ مِّنْهَا بِخَبَرٍ اَوْ اٰتِیْكُمْ بِشِهَابٍ قَبَسٍ لَّعَلَّكُمْ تَصْطَلُوْنَ ۟

७. जेव्हा मूसा आपल्या कुटुंबियांना म्हणाले, मी आग पाहिली आहे. मी तेथून एक तर काही बातमी घेऊन येईन किंवा आगीचा एखादा धगधगता विस्तव घेऊन लगेच तुमच्याजवळ येईन, यासाठी की तुम्ही शेकून घ्यावे. info
التفاسير:

external-link copy
8 : 27

فَلَمَّا جَآءَهَا نُوْدِیَ اَنْ بُوْرِكَ مَنْ فِی النَّارِ وَمَنْ حَوْلَهَا ؕ— وَسُبْحٰنَ اللّٰهِ رَبِّ الْعٰلَمِیْنَ ۟

८. जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना हाक दिली गेली की शुभ आहे तो, जो त्या आगीत आहे आणि शुभ आहे तो जो तिच्याजवळ पास आहे आणि मोठा पवित्र आहे अल्लाह, सर्व विश्वांचा स्वामी व पालनकर्ता. info
التفاسير:

external-link copy
9 : 27

یٰمُوْسٰۤی اِنَّهٗۤ اَنَا اللّٰهُ الْعَزِیْزُ الْحَكِیْمُ ۟ۙ

९. मूसा (ऐका) खरी गोष्ट ही की मीच अल्लाह आहे जबरदस्त आणि हिकमत (बुद्धीकौशल्य) बाळगणारा. info
التفاسير:

external-link copy
10 : 27

وَاَلْقِ عَصَاكَ ؕ— فَلَمَّا رَاٰهَا تَهْتَزُّ كَاَنَّهَا جَآنٌّ وَّلّٰی مُدْبِرًا وَّلَمْ یُعَقِّبْ ؕ— یٰمُوْسٰی لَا تَخَفْ ۫— اِنِّیْ لَا یَخَافُ لَدَیَّ الْمُرْسَلُوْنَ ۟ۗۖ

१०. आणि तुम्ही आपली काठी खाली टाका. (हजरत मूसा यांनी) जेव्हा तिला हालचाल करताना पाहिले अशा प्रकारे की जणू साप आहे, तेव्हा तोंड फिरवून पाठ वळवून पळाले आणि मागे वळूनही पाहिले नाही. हे मूसा! भिऊ नका. माझ्यासमोर पैगंबर भित नसतात. info
التفاسير:

external-link copy
11 : 27

اِلَّا مَنْ ظَلَمَ ثُمَّ بَدَّلَ حُسْنًا بَعْدَ سُوْٓءٍ فَاِنِّیْ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

११. परंतु जे लोक अत्याचार करतील, मग त्यास नेकी (सत्कर्मा) ने बदलतील त्या दुराचारानंतर तर मी देखील माफ करणारा, दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
12 : 27

وَاَدْخِلْ یَدَكَ فِیْ جَیْبِكَ تَخْرُجْ بَیْضَآءَ مِنْ غَیْرِ سُوْٓءٍ ۫— فِیْ تِسْعِ اٰیٰتٍ اِلٰی فِرْعَوْنَ وَقَوْمِهٖ ؕ— اِنَّهُمْ كَانُوْا قَوْمًا فٰسِقِیْنَ ۟

१२. आणि आपला हात आपल्या गळपट्टीत टाका तो शुभ्र (आणि तेजस्वी) होऊन निघेल, कसल्याही व्याधीविना. (तुम्ही) नऊ निशाण्या घेऊन फिरऔन आणि त्याच्या अनुयायींजवळ (जा) निःसंशय तो दुराचारी लोकांचा समूह आहे. info
التفاسير:

external-link copy
13 : 27

فَلَمَّا جَآءَتْهُمْ اٰیٰتُنَا مُبْصِرَةً قَالُوْا هٰذَا سِحْرٌ مُّبِیْنٌ ۟ۚ

१३. यास्तव, जेव्हा त्यांच्याजवळ डोळे उघडविणारे आमचे चमत्कार (मोजिजे) पोहोचले, तेव्हा ते म्हणू लागले की ही तर उघड जादू आहे. info
التفاسير: