அல்குர்ஆன் மொழிபெயர்ப்பு - மராத்தி மொழிபெயர்ப்பு - முஹம்மத் ஷபீஃ அன்ஸாரீ

பக்க எண்:close

external-link copy
38 : 12

وَاتَّبَعْتُ مِلَّةَ اٰبَآءِیْۤ اِبْرٰهِیْمَ وَاِسْحٰقَ وَیَعْقُوْبَ ؕ— مَا كَانَ لَنَاۤ اَنْ نُّشْرِكَ بِاللّٰهِ مِنْ شَیْءٍ ؕ— ذٰلِكَ مِنْ فَضْلِ اللّٰهِ عَلَیْنَا وَعَلَی النَّاسِ وَلٰكِنَّ اَكْثَرَ النَّاسِ لَا یَشْكُرُوْنَ ۟

३८. मी आपल्या पित्या आणि पूर्वजांच्या (धर्मा) चा अनुयायी आहे. अर्थात इसहाक आणि याकूब (च्या दीन) चा. आम्हाला हे कधीही मान्य नाही की आम्ही अल्लाहसोबत अन्य एखाद्याला सहभागी ठरवावे. आमच्यावर आणि इतर सर्व लोकांवर अल्लाहची ही विशेष कृपा आहे. परंतु अधिकांश लोक कृतघ्न असतात. info
التفاسير:

external-link copy
39 : 12

یٰصَاحِبَیِ السِّجْنِ ءَاَرْبَابٌ مُّتَفَرِّقُوْنَ خَیْرٌ اَمِ اللّٰهُ الْوَاحِدُ الْقَهَّارُ ۟ؕ

३९. हे माझ्या कारागृहातील साथीदारांनो! काय अनेक प्रकारची अनेक उपास्ये चांगली आहेत की एक जबरदस्त शक्तिशाली अल्लाह चांगला? info
التفاسير:

external-link copy
40 : 12

مَا تَعْبُدُوْنَ مِنْ دُوْنِهٖۤ اِلَّاۤ اَسْمَآءً سَمَّیْتُمُوْهَاۤ اَنْتُمْ وَاٰبَآؤُكُمْ مَّاۤ اَنْزَلَ اللّٰهُ بِهَا مِنْ سُلْطٰنٍ ؕ— اِنِ الْحُكْمُ اِلَّا لِلّٰهِ ؕ— اَمَرَ اَلَّا تَعْبُدُوْۤا اِلَّاۤ اِیَّاهُ ؕ— ذٰلِكَ الدِّیْنُ الْقَیِّمُ وَلٰكِنَّ اَكْثَرَ النَّاسِ لَا یَعْلَمُوْنَ ۟

४०. त्याच्याखेरीज ज्यांची उपासना तुम्ही करीत आहात ते सर्व नावापुरतेच आहेत, ज्यांना तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांनी मनाने रचून घेतले आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाहने यांचा कोणताही पुरावा अवतरित केला नाही. फैसला देणे अल्लाहचेच काम आहे. त्याचा आदेश आहे की तुम्ही सर्व त्याच्याशिवाय कोणाचीही भक्ती- उपासना करू नका. हाच सत्य धर्म आहे, परंतु अधिकांश लोक जाणत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
41 : 12

یٰصَاحِبَیِ السِّجْنِ اَمَّاۤ اَحَدُكُمَا فَیَسْقِیْ رَبَّهٗ خَمْرًا ۚ— وَاَمَّا الْاٰخَرُ فَیُصْلَبُ فَتَاْكُلُ الطَّیْرُ مِنْ رَّاْسِهٖ ؕ— قُضِیَ الْاَمْرُ الَّذِیْ فِیْهِ تَسْتَفْتِیٰنِ ۟ؕ

४१. हे कारागृहातील माझ्या साथीदारांनो! तुम्हा दोघांपैकी एक तर आपल्या स्वामीला मद्य पाजण्यासाठी नियुक्त केला जाईल, परंतु दुसऱ्याला फासावर लटकविले जाईल आणि पक्षी त्याचे डोके टोच मारून मारून खातील. तुम्ही दोघे ज्याविषयी विचारत होते त्याचा फैसला झाला. info
التفاسير:

external-link copy
42 : 12

وَقَالَ لِلَّذِیْ ظَنَّ اَنَّهٗ نَاجٍ مِّنْهُمَا اذْكُرْنِیْ عِنْدَ رَبِّكَ ؗ— فَاَنْسٰىهُ الشَّیْطٰنُ ذِكْرَ رَبِّهٖ فَلَبِثَ فِی السِّجْنِ بِضْعَ سِنِیْنَ ۟۠

४२. आणि ज्याच्याविषयी यूसुफची कल्पना होती की दोघांपैकी ज्याला सुटका मिळेल, त्याला म्हणाले, आपल्या राजाजवळ माझीही चर्चा कर. मग सैतानाने त्याला राजाजवळ बोलण्याचा विसर पाडला आणि यूसुफला अनेक वर्षे कारागृहात राहावे लागले. info
التفاسير:

external-link copy
43 : 12

وَقَالَ الْمَلِكُ اِنِّیْۤ اَرٰی سَبْعَ بَقَرٰتٍ سِمَانٍ یَّاْكُلُهُنَّ سَبْعٌ عِجَافٌ وَّسَبْعَ سُنْۢبُلٰتٍ خُضْرٍ وَّاُخَرَ یٰبِسٰتٍ ؕ— یٰۤاَیُّهَا الْمَلَاُ اَفْتُوْنِیْ فِیْ رُءْیَایَ اِنْ كُنْتُمْ لِلرُّءْیَا تَعْبُرُوْنَ ۟

४३. आणि राजाने सांगितले, मी स्वप्न पाहिले की सात धष्टपुष्ट गायी आहेत, ज्यांना सात दुबळ्या गायी खात आहेत आणि सात हिरवी कणसे आहेत तर दुसरी सात कणसे अगदी सुकलेली. हे दरबारी लोकांनो! माझ्या या स्वप्नाचा खुलासा सांगा, जर तुम्ही स्वप्नफल सांगू शकत असाल. info
التفاسير: