د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
51 : 68

وَاِنْ یَّكَادُ الَّذِیْنَ كَفَرُوْا لَیُزْلِقُوْنَكَ بِاَبْصَارِهِمْ لَمَّا سَمِعُوا الذِّكْرَ وَیَقُوْلُوْنَ اِنَّهٗ لَمَجْنُوْنٌ ۟ۘ

५१. आणि निकट आहे की (या) काफिरांनी आपल्या (तीक्ष्ण) नजरेने तुम्हाला घसरून टाकले.१ हे जेव्हा जेव्हा कुरआन ऐकतात आणि म्हणतात की हा तर खात्रीने वेडा आहे! info

(१) जर तुम्हाला अल्लाहची मदत आणि संरक्षण लाभले नसते तर या काफिर लोकांच्या मत्सरपूर्ण नजरेला तुम्ही वाईटरित्या बळी पडला असता अर्थात त्यांची वाईट नजर तुम्हाला लागली असती. इमाम इब्ने कसीर यांनी याचा हाच अर्थ सांगितला आहे. पुढे ते लिहितात की हे या गोष्टीचे प्रमाण आहे की दृष्ट लागणे आणि अल्लाहच्या अनुमतीने त्याचा दुसऱ्यांवर वाईट प्रभाव पडणे सत्य आहे. जसे की अनेक हदीस वचनांनी हे सिद्ध आहे आणि हदीस वचनांमध्ये त्यापासून सुरक्षित राहण्याकरिता दुआ (प्रार्थना) सांगितल्या आहेत आणि हेही सांगितले आहे की तुम्हाला जर एखादी वस्तू चांगली वाटली तर ‘माशा अल्लाह’ किंवा ‘बारकल्लाह’ म्हणत जा, यासाठी की त्यास दृष्ट न लागावी. तसेच जर कोणाला दृष्टी लागली जर फर्माविले की त्याला आंघोळ घालून त्याचे पाणी त्यावर टाकले जावे, ज्याची दृष्ट त्याला लागली आहे. (विवरणाकरिता पाहा तफसीर इब्ने कसीर आणि हदीसचे ग्रंथ) काहींनी याचा अर्थ असा केला आहे की यांनी तुम्हाला धर्माचा प्रचार करण्यापासून परावृत्त केले असते.

التفاسير: