د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
8 : 66

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا تُوْبُوْۤا اِلَی اللّٰهِ تَوْبَةً نَّصُوْحًا ؕ— عَسٰی رَبُّكُمْ اَنْ یُّكَفِّرَ عَنْكُمْ سَیِّاٰتِكُمْ وَیُدْخِلَكُمْ جَنّٰتٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ ۙ— یَوْمَ لَا یُخْزِی اللّٰهُ النَّبِیَّ وَالَّذِیْنَ اٰمَنُوْا مَعَهٗ ۚ— نُوْرُهُمْ یَسْعٰی بَیْنَ اَیْدِیْهِمْ وَبِاَیْمَانِهِمْ یَقُوْلُوْنَ رَبَّنَاۤ اَتْمِمْ لَنَا نُوْرَنَا وَاغْفِرْ لَنَا ۚ— اِنَّكَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟

८. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाहपुढे (खरी आणि) निखालस माफी मागा. संभवतः तुमच्या पालनकर्त्याने तुमची दुष्कर्मे मिटवावित. आणि तुम्हाला अशा जन्नतमध्ये दाखल करावे जिच्या खाली प्रवाह वाहत आहेत. ज्या दिवशी अल्लाह पैगंबराला आणि ईमान राखणाऱ्यांना, जे त्यांच्यासोबत आहेत अपमानित करणार नाही. त्यांचे दिव्य तेज (नूर) त्यांच्या पुढे आणि त्यांच्या उजवीकडे धावत असेल. हे दुआ (प्रार्थना) करत असतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला संपूर्ण तेज (नूर) प्रदान कर आणि आम्हाला क्षमा कर. निःसंशय, तू प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
9 : 66

یٰۤاَیُّهَا النَّبِیُّ جَاهِدِ الْكُفَّارَ وَالْمُنٰفِقِیْنَ وَاغْلُظْ عَلَیْهِمْ ؕ— وَمَاْوٰىهُمْ جَهَنَّمُ ؕ— وَبِئْسَ الْمَصِیْرُ ۟

९. हे पैगंबर! काफिरांशी आणि मुनाफिक (दांभिक) लोकांशी जिहाद करा आणि त्यांच्यावर सक्ती (कठोरता) करा. त्यांचे ठिकाण जहन्नम आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे. info
التفاسير:

external-link copy
10 : 66

ضَرَبَ اللّٰهُ مَثَلًا لِّلَّذِیْنَ كَفَرُوا امْرَاَتَ نُوْحٍ وَّامْرَاَتَ لُوْطٍ ؕ— كَانَتَا تَحْتَ عَبْدَیْنِ مِنْ عِبَادِنَا صَالِحَیْنِ فَخَانَتٰهُمَا فَلَمْ یُغْنِیَا عَنْهُمَا مِنَ اللّٰهِ شَیْـًٔا وَّقِیْلَ ادْخُلَا النَّارَ مَعَ الدّٰخِلِیْنَ ۟

१०. अल्लाहने काफिर लोकांकरिता नूहच्या आणि लूतच्या पत्नींचे उदाहरण दिले आहे. या दोघी आमच्या दासांपैकी दोन नेक सदाचारी दासांच्या कुटुंबात होत्या. मग त्यांनी त्यांच्याशी विश्वासघात केला, तेव्हा ते दोन्ही (दास) त्यांच्यापासून अल्लाहच्या (कोणत्याही शिक्षा - यातनेला) रोखू शकले नाहीत आणि आदेश दिला गेला की (स्त्रियांनो!) जहन्नममध्ये जाणाऱ्यांसोबत तुम्ही दोघीही जा. info
التفاسير:

external-link copy
11 : 66

وَضَرَبَ اللّٰهُ مَثَلًا لِّلَّذِیْنَ اٰمَنُوا امْرَاَتَ فِرْعَوْنَ ۘ— اِذْ قَالَتْ رَبِّ ابْنِ لِیْ عِنْدَكَ بَیْتًا فِی الْجَنَّةِ وَنَجِّنِیْ مِنْ فِرْعَوْنَ وَعَمَلِهٖ وَنَجِّنِیْ مِنَ الْقَوْمِ الظّٰلِمِیْنَ ۟ۙ

११. आणि अल्लाहने ईमान राखणाऱ्यांकरिता फिरऔनच्या पत्नीचे उदाहरण सांगितले. जेव्हा तिने दुआ (प्रार्थना) केली की हे माझ्या पालनकर्त्या! माझ्यासाठी आपल्या जवळ जहन्नतमध्ये एक घर बनव आणि मला फिरऔनपासून व त्याच्या कर्मांपासून वाचव आणि मला अत्याचारी लोकांपासून मुक्ती दे. info
التفاسير:

external-link copy
12 : 66

وَمَرْیَمَ ابْنَتَ عِمْرٰنَ الَّتِیْۤ اَحْصَنَتْ فَرْجَهَا فَنَفَخْنَا فِیْهِ مِنْ رُّوْحِنَا وَصَدَّقَتْ بِكَلِمٰتِ رَبِّهَا وَكُتُبِهٖ وَكَانَتْ مِنَ الْقٰنِتِیْنَ ۟۠

१२. आणि (उदाहरण दिले) इमरानची कन्या मरियमचे जिने आपल्या शील-अब्रूचे रक्षण केले, मग आम्ही आपल्यातर्फे तिच्यात प्राण (आत्मा) फुंकला आणि (मरियम) ने आपल्या पालनकर्त्याच्या वचनांचे आणि त्याच्या ग्रंथांचे समर्थन केले आणि ती उपासना करणारीं पैकी होती. info
التفاسير: