د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

طلاق

external-link copy
1 : 65

یٰۤاَیُّهَا النَّبِیُّ اِذَا طَلَّقْتُمُ النِّسَآءَ فَطَلِّقُوْهُنَّ لِعِدَّتِهِنَّ وَاَحْصُوا الْعِدَّةَ ۚ— وَاتَّقُوا اللّٰهَ رَبَّكُمْ ۚ— لَا تُخْرِجُوْهُنَّ مِنْ بُیُوْتِهِنَّ وَلَا یَخْرُجْنَ اِلَّاۤ اَنْ یَّاْتِیْنَ بِفَاحِشَةٍ مُّبَیِّنَةٍ ؕ— وَتِلْكَ حُدُوْدُ اللّٰهِ ؕ— وَمَنْ یَّتَعَدَّ حُدُوْدَ اللّٰهِ فَقَدْ ظَلَمَ نَفْسَهٗ ؕ— لَا تَدْرِیْ لَعَلَّ اللّٰهَ یُحْدِثُ بَعْدَ ذٰلِكَ اَمْرًا ۟

१. हे पैगंबर! (आपल्या जनसमुदायाच्या लोकांना सांगा) जेव्हा तुम्ही आपल्या पत्न्यांना तलाक देऊ इच्छित असाल तर त्यांच्या इद्दत (ची मुदत सुरू होत) असताना तलाक द्या आणि इद्दतची गणना करा, आणि अल्लाहचे, जो तुमचा पालनकर्ता आहे. भय बाळगत राहा, ना तुम्ही त्यांना त्यांच्या घरांमधून बाहेर काढावे आणि ना त्यांनी (स्वतः) निघावे, मात्र ही गोष्ट वेगळी की त्यांनी उघडपणे दुष्कर्म करून बसावे. या अल्लाहने निर्धारित केलेल्या सीमा (मर्यादा) आहेत, आणि जो मनुष्य अल्लाहच्या मर्यादांचे उल्लंघन करील त्याने खात्रीने आपल्या स्वतःवर अत्याचार केला, तुम्ही नाही जाणत की कदाचित त्यानंतर अल्लाहने एखादी नवी गोष्ट (स्थिती) निर्माण करावी.१ info

(१) अर्थात पतीच्या मनात, घटस्फोटित स्त्रीविषयी ओढनिर्माण करील आणि तो तिला पुन्हा ठेवण्यास तयार होईल, जसे की पहिल्या व दुसऱ्या तलाकनंतर पतीला इद्दत (अवधी) च्या आत पुन्हा ठेवण्याचा अधिकार आहे. या सर्व काही भाष्यकारांच्या मते अल्लाहने या आयतीत फक्त एक तलाक देण्याची शिकवण दिली आहे आणि एकाच वेळी तीन तलाक देण्यापासून रोखले आहे. कारण जर त्याने एकाच वेळी तीन तलाक देऊन टाकल्यास (आणि शरीअत नियमाने ते उचितही ठरल्यास) मग हे म्हणणे व्यर्थ आहे की कदाचित अल्लाह एखादी नवीन स्थिती निर्माण करील. (फतहुल कदीर)

التفاسير:

external-link copy
2 : 65

فَاِذَا بَلَغْنَ اَجَلَهُنَّ فَاَمْسِكُوْهُنَّ بِمَعْرُوْفٍ اَوْ فَارِقُوْهُنَّ بِمَعْرُوْفٍ وَّاَشْهِدُوْا ذَوَیْ عَدْلٍ مِّنْكُمْ وَاَقِیْمُوا الشَّهَادَةَ لِلّٰهِ ؕ— ذٰلِكُمْ یُوْعَظُ بِهٖ مَنْ كَانَ یُؤْمِنُ بِاللّٰهِ وَالْیَوْمِ الْاٰخِرِ ؕ۬— وَمَنْ یَّتَّقِ اللّٰهَ یَجْعَلْ لَّهٗ مَخْرَجًا ۟ۙ

२. तर जेव्हा या (स्त्रिया) आपला अवधी पूर्ण करण्याप्रत पोहचतील तेव्हा त्यांना रीतसर आपल्या विवाहबंधनात राहू द्या किंवा नियमानुसार त्यांना विभक्त करा, १ आणि आपसात दोन न्याय करणाऱ्या माणसांना साक्षी बनवून घ्या, आणि अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी यथायोग्य साक्ष द्या, हेच ते, ज्याची शिकवण त्यांना दिली जात आहे, जे अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखत असतील, आणि जो मनुष्य अल्लाहचे भय बाळगतो अल्लाह त्याच्यासाठी सुटकेचा मार्ग काढतो. info

(१) अर्थात ज्या स्त्रीशी पतीने सहवास केला असेल आणि तिला तलाक दिला तर तिची इद्दत तीन मासिक पाळीइतकी आहे. जर तिला परत ठेवण्याचा इरादा असेल तर इद्दत पूर्ण होण्याआधीच रुजू करून घ्या, अन्यथा नियमानुसार आपल्यापासून वेगळे करा.

التفاسير:

external-link copy
3 : 65

وَّیَرْزُقْهُ مِنْ حَیْثُ لَا یَحْتَسِبُ ؕ— وَمَنْ یَّتَوَكَّلْ عَلَی اللّٰهِ فَهُوَ حَسْبُهٗ ؕ— اِنَّ اللّٰهَ بَالِغُ اَمْرِهٖ ؕ— قَدْ جَعَلَ اللّٰهُ لِكُلِّ شَیْءٍ قَدْرًا ۟

३. आणि त्याला अशा ठिकाणाहून रोजी (आजिविका) उपलब्ध करून देतो ज्याची त्याला कल्पनाही नसेल आणि जो मनुष्य अल्लाहवर भरवसा करील, अल्लाह त्याच्यासाठी पुरेसा असेल. अल्लाह आपले कार्य पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अल्लाहने प्रत्येक गोष्टीचे एक अनुमान निर्धारित केलेले आहे. info
التفاسير:

external-link copy
4 : 65

وَا یَىِٕسْنَ مِنَ الْمَحِیْضِ مِنْ نِّسَآىِٕكُمْ اِنِ ارْتَبْتُمْ فَعِدَّتُهُنَّ ثَلٰثَةُ اَشْهُرٍ وَّا لَمْ یَحِضْنَ ؕ— وَاُولَاتُ الْاَحْمَالِ اَجَلُهُنَّ اَنْ یَّضَعْنَ حَمْلَهُنَّ ؕ— وَمَنْ یَّتَّقِ اللّٰهَ یَجْعَلْ لَّهٗ مِنْ اَمْرِهٖ یُسْرًا ۟

४. तुमच्या स्त्रियांपैकी ज्या स्त्रिया मासिक पाळीबाबत निराश झाल्या असतील, जर तुम्हाला शंका असेल तर त्यांची इद्दत तीन महीने आहे, आणि त्यांचीदेखील, ज्यांना अजून मासिक पाळी सुरू झालेली नसेल, आणि गर्भवती स्त्रियांची इद्दत त्यांची प्रस्तुती होणे आहे आणि जो मनुष्य अल्लाहचे भय बाळगेल, अल्लाह त्याच्या प्रत्येक कामात सहजता निर्माण करील. info
التفاسير:

external-link copy
5 : 65

ذٰلِكَ اَمْرُ اللّٰهِ اَنْزَلَهٗۤ اِلَیْكُمْ ؕ— وَمَنْ یَّتَّقِ اللّٰهَ یُكَفِّرْ عَنْهُ سَیِّاٰتِهٖ وَیُعْظِمْ لَهٗۤ اَجْرًا ۟

५. हा अल्लाहचा आदेश आहे, जो त्याने तुमच्याकडे अवतरित केला आहे, आणि जो मनुष्य अल्लाहचे भय बाळगेल, अल्लाह त्याचे अपराध मिटविल आणि त्याला फार महान मोबदला प्रदान करील. info
التفاسير: