د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
14 : 61

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا كُوْنُوْۤا اَنْصَارَ اللّٰهِ كَمَا قَالَ عِیْسَی ابْنُ مَرْیَمَ لِلْحَوَارِیّٖنَ مَنْ اَنْصَارِیْۤ اِلَی اللّٰهِ ؕ— قَالَ الْحَوَارِیُّوْنَ نَحْنُ اَنْصَارُ اللّٰهِ فَاٰمَنَتْ طَّآىِٕفَةٌ مِّنْ بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ وَكَفَرَتْ طَّآىِٕفَةٌ ۚ— فَاَیَّدْنَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا عَلٰی عَدُوِّهِمْ فَاَصْبَحُوْا ظٰهِرِیْنَ ۟۠

१४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाहचे सहाय्यक बना,१ ज्याप्रमाणे (हजरत) मरियमचे पुत्र (हजरत) ईसा यांनी हवारींना (मित्रांना) सांगितले, कोण आहे जो अल्लाहच्या मार्गात माझा मदतनीस बनेल? (त्यांचे) मित्र म्हणाले की, आम्ही अल्लाहच्या मार्गात मदतनीस आहोत. तेव्हा इस्राईलच्या संततीपैकी एका गटाने तर ईमान राखले आणि एका गटाने कुप्र (इन्कार) केला,२ तर आम्ही ईमान राखणाऱ्यांना त्यांच्या शत्रूंच्या info

(१) सर्व परिस्थितीत आपल्या वचनांद्वारे आणि आचरणाद्वारे तसेच धन आणि प्राणाद्वारेही, जेव्हा आणि ज्या वेळी देखील आणि ज्या अवस्थेतही अल्लाह आणि त्याचा पैगंबर आपल्या धर्माच्या मदतीसाठी हाक मारील, तुम्ही त्वरित त्यांच्या हाकेला होकार देऊन म्हणाल, आम्ही हजर आहोत, ज्याप्रमाणे हजारोंनी हजरत ईसा यांच्या आवाहनावर म्हटले होते. (२) हे यहूदी होते, ज्यांनी ईसा (अलै.) यांच्या प्रेषितत्वाचा केवळ इन्कारच केला नाही किंबहुना त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर लांझनही लावले. काहींच्या मते हा मतभेद आणि अलगाव त्या वेळी झाला जेव्हा हजरत ईसाला आकाशात उचलून घेतले गेले. एक म्हणाला की ईसा यांच्या रूपात अल्लाह (ईश्वर) च धरतीवर प्रकट झाला होता. (असे सनातन धर्मात ईशदूतांना अवतार मानले गेले आहे.) आता तो पुन्हा आकाशात चालला गेला. हा पंथ ‘याकूबिया’ संबोधिला जातो. ‘नस्तुरिया’ पंथाचे लोक म्हणाले की ते (हजरत ईसा) अल्लाहचे पुत्र होते. पित्याने पुत्राला आकाशात बोलावून घेतले. तिसरा असे म्हणाला की ते अल्लाहचे उपासक आणि त्याचे पैगंबर (संदेशवाहक) होते. अर्थात हे सांगणारा संप्रदायच खरा व उचित होता.

التفاسير: