د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
3 : 44

اِنَّاۤ اَنْزَلْنٰهُ فِیْ لَیْلَةٍ مُّبٰرَكَةٍ اِنَّا كُنَّا مُنْذِرِیْنَ ۟

३. निःसंशय, आम्ही या ग्रंथाला एका शुभरात्रीत१ अवतरित केले आहे. निःसंशय, आम्ही अवगत करून देणारे आहोत. info

(१) शुभरात्रीशी अभिप्रेत ‘लैलतुल कद्र’ आहे. जसे की अन्य ठिकाणी सांगितले गेले आहे ‘‘अन्ना अल्जल्ना फी लैलतुल कद्र’’ (सूरह कद्र) ‘‘आम्ही हा कुरआन कद्रच्या रत्रीत अवतरित केला.’’ ही मुबारक (शुभ) रात्र रमजान महिन्याच्या अंतिम दहा रात्रींच्या विषम तारखेच्या रात्रींपैकी एक रात्र असते. इथे कद्र (सन्मान) च्या या रात्रीला शुभरात्र म्हटले गेले आहे. हिचे शुभ असण्यात काय शंका असू शकते. एक तर या रात्रीत कुरआनाचे अवतरण झाले. दुसरे हे की या रात्री फरिश्ते आणि जिब्रील अवतरित होतात. तिसरे असे की या रात्री संपूर्ण वर्षात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टींचा फैसला केला जातो (जसे पुढे येत आहे). चौथे हे की या रात्रीची उपासना हजार महिन्यां (अर्थात ८३ वर्षे ३ महिने) च्या उपासनेपेक्षा उत्तम आहे. ‘शबे कद्र’ किंवा ‘लैल-ए-मुबारकह’मध्ये कुरआन अवतरित होण्याचा अर्थ हा की या रात्रीत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर पवित्र कुरआनचे अवतरण सुरू झाले होते. किंवा यास अभिप्रेत ‘लौहे महफूज’ (सुरक्षित पट्टिका) मधून याच रात्री ‘बैतुल इज्जत’ (सन्मानगृह) मध्ये अवतरित केला गेला, जे जगाच्या आकाशात आहे. मग तेथून गरजेनुसार २३ वर्षांपावेतो विभिन्न काळांत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अवतरित होत राहिला. काहींनी ‘लैल-ए-मुबारकह’ (शुभरात्र) शी अभिप्रेत शाबान महिन्याची पंधरावी रात्र घेतली आहे. परंतु हे उचित नाही. जेव्हा कुरआनाच्या स्पष्ट शब्दांत ‘शबे कद्र’मध्ये अवतरित होणे सिद्ध आहे तेव्हा यापासून ‘शबे बराअत’ अभिप्रेत घेणे कदापि योग्य नव्हे. याखेरीज ‘शबे बराअत’ (शाबान महिन्याची पंधरावी रात्र)विषयी जेवढी कथने आहेत, ज्यात तिची श्रेष्ठता व महत्ता सांगितले गेली आहे किंवा त्यात तिला फैसल्याची रात्र म्हटले गेले आहे, ती सर्व निवेदने प्रमाणाच्या आधारास कमकुवत आहेत. अशी कथने कुरआनाच्या स्पष्ट शब्दांचा सामना कशा प्रकारे करू शकतात?

التفاسير: