د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
74 : 43

اِنَّ الْمُجْرِمِیْنَ فِیْ عَذَابِ جَهَنَّمَ خٰلِدُوْنَ ۟ۚ

७४. निःसंशय, अपराधी लोक जहन्नमच्या शिक्षा-यातनेत सदैव राहतील. info
التفاسير:

external-link copy
75 : 43

لَا یُفَتَّرُ عَنْهُمْ وَهُمْ فِیْهِ مُبْلِسُوْنَ ۟ۚ

७५. ही (शिक्षा-यातना) कधीही त्यांच्यावरून सौम्य केली जाणार नाही आणि ते तिच्यातच नैराश्यग्रस्त पडून राहतील. info
التفاسير:

external-link copy
76 : 43

وَمَا ظَلَمْنٰهُمْ وَلٰكِنْ كَانُوْا هُمُ الظّٰلِمِیْنَ ۟

७६. आणि आम्ही त्यांच्यावर अत्याचार नाही केला, उलट ते स्वतःच अत्याचारी होते. info
التفاسير:

external-link copy
77 : 43

وَنَادَوْا یٰمٰلِكُ لِیَقْضِ عَلَیْنَا رَبُّكَ ؕ— قَالَ اِنَّكُمْ مّٰكِثُوْنَ ۟

७७. ते हाक मारून म्हणतील की हे मालक! तुमचा पालनकर्ता तर आमचा पुरता नायनाट करून टाकील! तो म्हणेल, तुम्हाला तर (याच अवस्थेत नेहमी) राहावयाचे आहे. info
التفاسير:

external-link copy
78 : 43

لَقَدْ جِئْنٰكُمْ بِالْحَقِّ وَلٰكِنَّ اَكْثَرَكُمْ لِلْحَقِّ كٰرِهُوْنَ ۟

७८. आम्ही तर तुमच्याजवळ सत्य घेऊन आलो, परंतु तुमच्यापैकी बहुतेक लोक सत्याशी तिरस्कार करणारे होते. info
التفاسير:

external-link copy
79 : 43

اَمْ اَبْرَمُوْۤا اَمْرًا فَاِنَّا مُبْرِمُوْنَ ۟ۚ

७९. काय त्यांनी एखाद्या कामाचा मजबूत इरादा करून घेतला आहे? तर मग खात्री बाळगा की आम्हीही मजबूत काम करणारे आहोत. info
التفاسير:

external-link copy
80 : 43

اَمْ یَحْسَبُوْنَ اَنَّا لَا نَسْمَعُ سِرَّهُمْ وَنَجْوٰىهُمْ ؕ— بَلٰی وَرُسُلُنَا لَدَیْهِمْ یَكْتُبُوْنَ ۟

८०. काय त्यांनी असे गृहित धरले आहे की आम्ही त्यांच्या गुप्त गोष्टींना आणि त्यांच्या कानगोष्टींना ऐकत नाहीत? (निःसंशय आम्ही सर्व काही ऐकतो) किंबहुना आम्ही पाठविलेले (फरिश्ते) त्यांच्याजवळच लिहित आहेत. info
التفاسير:

external-link copy
81 : 43

قُلْ اِنْ كَانَ لِلرَّحْمٰنِ وَلَدٌ ۖۗ— فَاَنَا اَوَّلُ الْعٰبِدِیْنَ ۟

८१. (तुम्ही) सांगा की, जर समजा रहमान (दयावान अल्लाह) ची एखादी संतती असती तर मी सर्वांत प्रथम उपासना करणारा राहिले असतो. info
التفاسير:

external-link copy
82 : 43

سُبْحٰنَ رَبِّ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ رَبِّ الْعَرْشِ عَمَّا یَصِفُوْنَ ۟

८२. आकाशांचा आणि धरती व अर्श (ईश-सिंहासना) चा स्वामी, त्या गोष्टींपासून पवित्र (व्यंग-दोष विरहित) आहे. ज्या (हे) सांगतात. info
التفاسير:

external-link copy
83 : 43

فَذَرْهُمْ یَخُوْضُوْا وَیَلْعَبُوْا حَتّٰی یُلٰقُوْا یَوْمَهُمُ الَّذِیْ یُوْعَدُوْنَ ۟

८३. आता तुम्ही त्यांना याच वाद-विवादात आणि खेळण्या-बागडण्यात सोडून द्या. येथेपर्यंत की त्यांची त्या दिवसाशी गाठ पडावी, ज्याचा यांना वायदा दिला जात आहे. info
التفاسير:

external-link copy
84 : 43

وَهُوَ الَّذِیْ فِی السَّمَآءِ اِلٰهٌ وَّفِی الْاَرْضِ اِلٰهٌ ؕ— وَهُوَ الْحَكِیْمُ الْعَلِیْمُ ۟

८४. आणि तोच आकाशांमध्येही पूज्य (उपासनीय) आहे आणि धरतीवरही तोच उपासना करण्यायोग्य आहे आणि तो मोठा बुद्धिकौशल्य बाळगणारा आणि संपूर्ण ज्ञान राखणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
85 : 43

وَتَبٰرَكَ الَّذِیْ لَهٗ مُلْكُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ وَمَا بَیْنَهُمَا ۚ— وَعِنْدَهٗ عِلْمُ السَّاعَةِ ۚ— وَاِلَیْهِ تُرْجَعُوْنَ ۟

८५. आणि तो मोठा शुभ-कल्याणकारी आहे, ज्याच्या हाती आकाशांचे आणि धरतीचे आणि या दोघांच्या दरम्यानचे राज्य आहे आणि कयामतचे ज्ञान देखील त्याच्याचजवळ आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही सर्व परतविले जाल. info
التفاسير:

external-link copy
86 : 43

وَلَا یَمْلِكُ الَّذِیْنَ یَدْعُوْنَ مِنْ دُوْنِهِ الشَّفَاعَةَ اِلَّا مَنْ شَهِدَ بِالْحَقِّ وَهُمْ یَعْلَمُوْنَ ۟

८६. आणि ज्यांना हे लोक अल्लाहखेरीज पुकारतात, ते शिफारस करण्याचा अधिकार बाळगत नाही, तथापि (शिफारसीचा हक्क ते बाळगतात) जे सत्य गोष्टींचा स्वीकार करतील आणि त्यांना ज्ञानही असावे. info
التفاسير:

external-link copy
87 : 43

وَلَىِٕنْ سَاَلْتَهُمْ مَّنْ خَلَقَهُمْ لَیَقُوْلُنَّ اللّٰهُ فَاَنّٰی یُؤْفَكُوْنَ ۟ۙ

८७. जर तुम्ही त्यांना विचाराल की त्यांना कोणी निर्माण केले तर हे अवश्य उत्तर देतील की अल्लाहने, मग हे कोठे उलट जात आहेत? info
التفاسير:

external-link copy
88 : 43

وَقِیْلِهٖ یٰرَبِّ اِنَّ هٰۤؤُلَآءِ قَوْمٌ لَّا یُؤْمِنُوْنَ ۟ۘ

८८. आणि त्यांचे (पैगंबरांचे अधिकांश) हे म्हणणे की हे माझ्या पालनकर्त्या! निःसंशय, हे असे लोक आहेत, जे ईमान राखत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
89 : 43

فَاصْفَحْ عَنْهُمْ وَقُلْ سَلٰمٌ ؕ— فَسَوْفَ یَعْلَمُوْنَ ۟۠

८९. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवून घ्या आणि (निरोपाचा) सलाम सांगा. त्यांना (स्वतःलाच) माहीत पडेल. info
التفاسير: