د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
16 : 42

وَالَّذِیْنَ یُحَآجُّوْنَ فِی اللّٰهِ مِنْ بَعْدِ مَا اسْتُجِیْبَ لَهٗ حُجَّتُهُمْ دَاحِضَةٌ عِنْدَ رَبِّهِمْ وَعَلَیْهِمْ غَضَبٌ وَّلَهُمْ عَذَابٌ شَدِیْدٌ ۟

१६. आणि जे लोक अल्लाहच्या संदर्भात वाद निर्माण करतात, या उपरांत की (सृष्टीने) ते मान्य केले आहे, त्यांचा विवाद अल्लाहच्या निकट खोटा आहे आणि त्यांच्यावर ईश-प्रकोप आहे आणि त्यांच्यासाठी सक्त अज़ाब (शिक्षा - यातना) आहे. info
التفاسير:

external-link copy
17 : 42

اَللّٰهُ الَّذِیْۤ اَنْزَلَ الْكِتٰبَ بِالْحَقِّ وَالْمِیْزَانَ ؕ— وَمَا یُدْرِیْكَ لَعَلَّ السَّاعَةَ قَرِیْبٌ ۟

१७. अल्लाहने सत्यासह ग्रंथ अवतरित केला आहे आणि तराजू देखील (अवतरित केला आहे) आणि तुम्हाला काय माहीत की कदाचित कयामत जवळच येऊन ठेपली असेल. info
التفاسير:

external-link copy
18 : 42

یَسْتَعْجِلُ بِهَا الَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ بِهَا ۚ— وَالَّذِیْنَ اٰمَنُوْا مُشْفِقُوْنَ مِنْهَا ۙ— وَیَعْلَمُوْنَ اَنَّهَا الْحَقُّ ؕ— اَلَاۤ اِنَّ الَّذِیْنَ یُمَارُوْنَ فِی السَّاعَةِ لَفِیْ ضَلٰلٍۢ بَعِیْدٍ ۟

१८. याची घाई त्यांनाच पडली आहे, जे त्यावर ईमान राखत नाहीत आणि जे त्यावर ईमान राखतात, ते त्याचे भय बाळगतात आणि त्यांना ते सत्य असण्याचे पूर्ण ज्ञान आहे. लक्षात ठेवा, जे लोक कयामतविषयी वाद-विवाद करीत आहेत, ते दूरच्या मार्गभ्रष्टतेत जाऊन पडले आहेत. info
التفاسير:

external-link copy
19 : 42

اَللّٰهُ لَطِیْفٌ بِعِبَادِهٖ یَرْزُقُ مَنْ یَّشَآءُ ۚ— وَهُوَ الْقَوِیُّ الْعَزِیْزُ ۟۠

१९. अल्लाह आपल्या दासांवर मोठा कृपा करणारा आहे, ज्याला इच्छितो अधिक आजिविका (रोजी) प्रदान करतो आणि तो मोठा शक्तिशाली मोठा वर्चस्वशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
20 : 42

مَنْ كَانَ یُرِیْدُ حَرْثَ الْاٰخِرَةِ نَزِدْ لَهٗ فِیْ حَرْثِهٖ ۚ— وَمَنْ كَانَ یُرِیْدُ حَرْثَ الدُّنْیَا نُؤْتِهٖ مِنْهَا ۙ— وَمَا لَهٗ فِی الْاٰخِرَةِ مِنْ نَّصِیْبٍ ۟

२०. ज्याचा संकल्प आखिरतच्या शेतीचा असेल तर आम्ही त्याच्या शेतीत आणखी जास्त वाढकरू आणि जो ऐहिक शेतीची इच्छा बाळगत असेल तर आम्ही त्याला त्यातून काही देऊन टाकू, मात्र अशा माणसाचा आखिरतमध्ये कसलाही हिस्सा नाही. info
التفاسير:

external-link copy
21 : 42

اَمْ لَهُمْ شُرَكٰٓؤُا شَرَعُوْا لَهُمْ مِّنَ الدِّیْنِ مَا لَمْ یَاْذَنْ بِهِ اللّٰهُ ؕ— وَلَوْلَا كَلِمَةُ الْفَصْلِ لَقُضِیَ بَیْنَهُمْ ؕ— وَاِنَّ الظّٰلِمِیْنَ لَهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۟

२१. काय त्या लोकांनी (अल्लाहचे) असे सहभागी (निर्धारित केले) आहेत, ज्यांनी असे धार्मिक आदेश निश्चित केले आहेत, जे अल्लाहने फर्माविलेले नाहीत. जर फैसल्याच्या दिवसाचा वायदा नसता तर (याच क्षणी) त्यांचा फैसला केला गेला असता. निःसंशय, त्या अत्याचारींकरिताच दुःखदायक शिक्षा - यातना आहे. info
التفاسير:

external-link copy
22 : 42

تَرَی الظّٰلِمِیْنَ مُشْفِقِیْنَ مِمَّا كَسَبُوْا وَهُوَ وَاقِعٌ بِهِمْ ؕ— وَالَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ فِیْ رَوْضٰتِ الْجَنّٰتِ ۚ— لَهُمْ مَّا یَشَآءُوْنَ عِنْدَ رَبِّهِمْ ؕ— ذٰلِكَ هُوَ الْفَضْلُ الْكَبِیْرُ ۟

२२. तुम्ही पाहाल की हे अत्याचारी आपल्या दुष्कर्मां (च्या दुष्परिणती) चे भय बाळगत असतील, जे निश्चितच त्यांच्यावर घडून येणार आहे, आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि जे सत्कर्मही करीत राहिले तर ते जे काही इच्छितील, त्यांना आपल्या पालनकर्त्याजवळ लाभेल हाच आहे मोठा अनुग्रह. info
التفاسير: