د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
41 : 40

وَیٰقَوْمِ مَا لِیْۤ اَدْعُوْكُمْ اِلَی النَّجٰوةِ وَتَدْعُوْنَنِیْۤ اِلَی النَّارِ ۟ؕ

४१. आणि हे माझ्या जमातीच्या लोकांनो! हे काय की मी तुम्हाला मुक्तीकडे बोलावित आहे आणि तुम्ही, मला जहन्नमकडे बोलावित आहात. info
التفاسير:

external-link copy
42 : 40

تَدْعُوْنَنِیْ لِاَكْفُرَ بِاللّٰهِ وَاُشْرِكَ بِهٖ مَا لَیْسَ لِیْ بِهٖ عِلْمٌ ؗ— وَّاَنَا اَدْعُوْكُمْ اِلَی الْعَزِیْزِ الْغَفَّارِ ۟

४२. तुम्ही मला या गोष्टीचे आमंत्रण देत आहात की मी अल्लाहचा इन्कार करावा आणि (दुसऱ्याला) त्याचा सहभागी करावे, ज्याचे मला कसलेही ज्ञान नाही, आणि मी तुम्हाला वर्चस्वशाली, माफ करणाऱ्या (अल्लाह) कडे बोलावित आहे. info
التفاسير:

external-link copy
43 : 40

لَا جَرَمَ اَنَّمَا تَدْعُوْنَنِیْۤ اِلَیْهِ لَیْسَ لَهٗ دَعْوَةٌ فِی الدُّنْیَا وَلَا فِی الْاٰخِرَةِ وَاَنَّ مَرَدَّنَاۤ اِلَی اللّٰهِ وَاَنَّ الْمُسْرِفِیْنَ هُمْ اَصْحٰبُ النَّارِ ۟

४३. हे अगदी निश्चित की तुम्ही मला ज्याच्याकडे बोलावित आहात, तो ना तर या जगात पुकारण्यायोग्य आहे आणि ना आखिरतमध्ये आणि हे देखील अगदी निश्चित की आम्हा सर्वांचे परतणे अल्लाहच्याकडे आहे आणि मर्यादेचे उल्लंघन करणारे निश्चितच जहन्नमी आहेत. info
التفاسير:

external-link copy
44 : 40

فَسَتَذْكُرُوْنَ مَاۤ اَقُوْلُ لَكُمْ ؕ— وَاُفَوِّضُ اَمْرِیْۤ اِلَی اللّٰهِ ؕ— اِنَّ اللّٰهَ بَصِیْرٌ بِالْعِبَادِ ۟

४४. तेव्हा भविष्यात तुम्ही माझ्या गोष्टींची (बोलण्याची) आठवण कराल, मी आपला मामला अल्लाहच्या हवाली करतो, निःसंशय, अल्लाह आपल्या दासांना पाहणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
45 : 40

فَوَقٰىهُ اللّٰهُ سَیِّاٰتِ مَا مَكَرُوْا وَحَاقَ بِاٰلِ فِرْعَوْنَ سُوْٓءُ الْعَذَابِ ۟ۚ

४५. तेव्हा अल्लाहने त्याला त्या सर्व वाईट गोष्टीपासून सुरक्षित ठेवले ज्या, त्या लोकांनी योजिल्या होत्या आणि फिरऔनच्या अनुयायींवर मोठ्या वाईट प्रकारचा अज़ाब कोसळला. info
التفاسير:

external-link copy
46 : 40

اَلنَّارُ یُعْرَضُوْنَ عَلَیْهَا غُدُوًّا وَّعَشِیًّا ۚ— وَیَوْمَ تَقُوْمُ السَّاعَةُ ۫— اَدْخِلُوْۤا اٰلَ فِرْعَوْنَ اَشَدَّ الْعَذَابِ ۟

४६. आग आहे जिच्यासमोर हे प्रत्येक सकाळ आणि संध्याकाळ आणले जातात, आणि ज्या दिवशी कयामत प्रस्थापित होईल (आदेश दिला जाईल की) फिरऔनच्या अनुयायींना अतिशय कठोर शिक्षा - यातनेत टाका. info
التفاسير:

external-link copy
47 : 40

وَاِذْ یَتَحَآجُّوْنَ فِی النَّارِ فَیَقُوْلُ الضُّعَفٰٓؤُا لِلَّذِیْنَ اسْتَكْبَرُوْۤا اِنَّا كُنَّا لَكُمْ تَبَعًا فَهَلْ اَنْتُمْ مُّغْنُوْنَ عَنَّا نَصِیْبًا مِّنَ النَّارِ ۟

४७. आणि जेव्हा ते जहन्नममध्ये एकमेकांशी भांडतील, तेव्हा कमजोर लोक, मोठ्या लोकांना (ज्यांच्या ताब्यात हे होते) म्हणतील की, आम्ही तर तुमचे अनुयायी होतो, तर काय आता तुम्ही आमच्यापासून या आगीचा एखादा हिस्सा हटवू शकता? info
التفاسير:

external-link copy
48 : 40

قَالَ الَّذِیْنَ اسْتَكْبَرُوْۤا اِنَّا كُلٌّ فِیْهَاۤ اِنَّ اللّٰهَ قَدْ حَكَمَ بَیْنَ الْعِبَادِ ۟

४८. ते मोठे लोक उत्तर देतील की आम्ही तर सर्व याच आगीत आहोत. अल्लाहने आपल्या दासांच्या दरम्यान फैसला केलेला आहे. info
التفاسير:

external-link copy
49 : 40

وَقَالَ الَّذِیْنَ فِی النَّارِ لِخَزَنَةِ جَهَنَّمَ ادْعُوْا رَبَّكُمْ یُخَفِّفْ عَنَّا یَوْمًا مِّنَ الْعَذَابِ ۟

४९. आणि सर्व जहन्नमी लोक (एकत्र होऊन) जहन्नमच्या रक्षकांना सांगतील की तुम्हीच आपल्या पालनकर्त्यास दुआ (प्रार्थना) करा की त्याने कोणा एका दिवशी आमच्या शिक्षेत कमी करावी. info
التفاسير: