د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
157 : 4

وَّقَوْلِهِمْ اِنَّا قَتَلْنَا الْمَسِیْحَ عِیْسَی ابْنَ مَرْیَمَ رَسُوْلَ اللّٰهِ ۚ— وَمَا قَتَلُوْهُ وَمَا صَلَبُوْهُ وَلٰكِنْ شُبِّهَ لَهُمْ ؕ— وَاِنَّ الَّذِیْنَ اخْتَلَفُوْا فِیْهِ لَفِیْ شَكٍّ مِّنْهُ ؕ— مَا لَهُمْ بِهٖ مِنْ عِلْمٍ اِلَّا اتِّبَاعَ الظَّنِّ ۚ— وَمَا قَتَلُوْهُ یَقِیْنًا ۟ۙ

१५७. आणि त्यांच्या या कथनामुळे की आम्ही मरियमचे पुत्र ईसा मसीहची हत्या करून टाकली, जे अल्लाहचे पैगंबर होते, वास्तविक ना तर त्यांनी हत्या केली, ना त्यांना सूळावर चढविले, परंतु त्यांच्यासाठी ईसाची छबी बनविली गेली१ निश्चितच ईसा यांच्याविषयी मतभेद करणारे संशयात पडले आहेत. केवळ अटकळीच्या गोष्टीवर चालण्याखेरीज त्यांना कसलेही ज्ञान नाही. एवढे निश्चित की त्यांचा वध केला गेला नाही. info

(१) अर्थात जेव्हा हजरत ईसा यांना यहूद्यांच्या कटाची बातमी कळाली तेव्हा त्यांनी आपल्या अनुयायींना, ज्यांची संख्या १२ किंवा १७ होती, जमा केले आणि फर्माविले की तुमच्यापैकी कोण माझ्या जागी बलिदान देण्यास तयार आहे? यासाठी की अल्लाहने त्याचे स्वरूप अगदी माझ्यासारखे बनवावे. एक तरुण यासाठी तयार झाला, म्हणून हजरत ईसा यांना तेथून आकाशात उचलले गेले, त्यानंतर यहूदी आले आणि त्यांनी या तरुणाला सूळावर चढविले, ज्याला ईसासारखे बनविले गेले होते. यहूदी हेच समजत राहिले की आम्ही हजरत ईसा यांना सूळावर चढविले. वास्तविक हजरत ईसा त्याच क्षणी तिथे हजर नव्हतेच. त्यांना तर जिवंत अवस्थेत सशरीर आकाशात उचलले गेले होते. (इब्ने कसीर आणि फतहुल कदीर)

التفاسير: