د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
11 : 4

یُوْصِیْكُمُ اللّٰهُ فِیْۤ اَوْلَادِكُمْ ۗ— لِلذَّكَرِ مِثْلُ حَظِّ الْاُنْثَیَیْنِ ۚ— فَاِنْ كُنَّ نِسَآءً فَوْقَ اثْنَتَیْنِ فَلَهُنَّ ثُلُثَا مَا تَرَكَ ۚ— وَاِنْ كَانَتْ وَاحِدَةً فَلَهَا النِّصْفُ ؕ— وَلِاَبَوَیْهِ لِكُلِّ وَاحِدٍ مِّنْهُمَا السُّدُسُ مِمَّا تَرَكَ اِنْ كَانَ لَهٗ وَلَدٌ ۚ— فَاِنْ لَّمْ یَكُنْ لَّهٗ وَلَدٌ وَّوَرِثَهٗۤ اَبَوٰهُ فَلِاُمِّهِ الثُّلُثُ ۚ— فَاِنْ كَانَ لَهٗۤ اِخْوَةٌ فَلِاُمِّهِ السُّدُسُ مِنْ بَعْدِ وَصِیَّةٍ یُّوْصِیْ بِهَاۤ اَوْ دَیْنٍ ؕ— اٰبَآؤُكُمْ وَاَبْنَآؤُكُمْ لَا تَدْرُوْنَ اَیُّهُمْ اَقْرَبُ لَكُمْ نَفْعًا ؕ— فَرِیْضَةً مِّنَ اللّٰهِ ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ عَلِیْمًا حَكِیْمًا ۟

११. सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला तुमच्या संततीविषयी आदेश देतो की एका मुलाचा हिस्सा दोन मुलींच्या हिश्याइतका आहे. जर फक्त मुलीच असतील आणि त्या दोनपेक्षा जास्त असतील तर त्यांना, मयताने मागे सोडलेल्या संपत्तीमधून दोन तृतियांश हिस्सा मिळेल आणि जर एकच मुलगी असेल तर तिच्यासाठी अर्धा हिस्सा आहे आणि मयताच्या आई-बापापैकी प्रत्येकाला, त्याने मागे सोडलेल्या संपत्तीचा सहावा हिस्सा आहे. मयताला संतान असेल अथवा संतान नसेल, आणि आई-बाप वारसदार असतील तर मग त्याच्या आईचा तिसरा हिस्सा आहे. तथापि मयताचे जर अनेक भाऊ असतील तर मग त्याच्या आईचा सहावा हिस्सा आहे. हा हिस्सा मयताने केलेल्या मृत्युपत्रा (वसीयत) ची पूर्तता केल्यानंतर आहे किंवा त्याचे कर्ज फेडल्यानंतर. तुमचा पिता असेल किंवा तुमची मुले, पण तुम्ही नाही जाणत की त्यांच्यापैकी कोण तुम्हाला लाभ पोहचविण्यात जास्त जवळचा आहे. हे सर्व हिस्से अल्लाहतर्फे निर्धारीत केलेले आहेत. निःसंशय अल्लाह सर्व काही जाणणारा हिकमतशाली आहे. info
التفاسير: