د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
3 : 39

اَلَا لِلّٰهِ الدِّیْنُ الْخَالِصُ ؕ— وَالَّذِیْنَ اتَّخَذُوْا مِنْ دُوْنِهٖۤ اَوْلِیَآءَ ۘ— مَا نَعْبُدُهُمْ اِلَّا لِیُقَرِّبُوْنَاۤ اِلَی اللّٰهِ زُلْفٰی ؕ— اِنَّ اللّٰهَ یَحْكُمُ بَیْنَهُمْ فِیْ مَا هُمْ فِیْهِ یَخْتَلِفُوْنَ ؕ۬— اِنَّ اللّٰهَ لَا یَهْدِیْ مَنْ هُوَ كٰذِبٌ كَفَّارٌ ۟

३. ऐका! अल्लाहच्याचकरिता विशुद्ध (निर्भेळ) उपासना करणे आहे,१ आणि ज्या लोकांनी त्याच्याखेरीज अवलिया बनवून ठेवले आहेत (आणि असे म्हणतात) की आम्ही यांची उपासना केवळ एवढ्यासाठी करतो की हे (बुजुर्ग, थोर) आम्हाला अल्लाहच्या निकट करतील, हे लोक ज्या गोष्टीबाबत मतभेद करीत आहेत, तिचा (न्यायसंगत) फैसला अल्लाह स्वतः करील, खोट्या आणि कृतघ्न लोकांना अल्लाह मार्ग दाखवित नाही. info

(१) इथे त्याचीच उपासना निखालसपणे करण्यावर जोर दिला गेला आहे, ज्याचा आदेश या आधीच्या आयतीत आहे की उपासना व आज्ञापालन केवळ एक अल्लाहचाच अधिकार आहे. ना त्याच्या उपासनेत दुसऱ्या कोणाला भागीदार बनविणे वैध आहे, ना आज्ञा पालनाचाही त्याच्याखेरीज दुसरा कोणी हक्कदार आहे. परंतु पैगंबर सल्लल्लाहु अलेहि वसल्लम यांच्या आज्ञा पालनास स्वतः अल्लाहनेच आपले आज्ञापालन म्हटले आहे, तेव्हा पैगंबर (स.) सल्लल्लाहु अलेहि वसल्लम यांचा आज्ञाधारक अल्लाहचाच आज्ञाधारक आहे, दुसऱ्या कोणाचा नाही. तसेच उपासनेत ही गोष्ट नाही. यासाठी की उपासना अल्लाहखेरीज एखाद्या मोठ्यात मोठ्या पैगंबराचीही वैध नाही, तर सर्वसामान्य माणसाची कोठून? ज्यांना लोकांनी मनमानी करून अल्लाहच्या हक्क व अधिकारांचा मालक बनवून ठेवले आहे. ‘माअन्जुलल्लाहु बिहा मिन सुलतान.’ ‘‘अल्लाहतर्फे या संदर्भात कोणतेही प्रमाण नाही.’’

التفاسير: