د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
68 : 39

وَنُفِخَ فِی الصُّوْرِ فَصَعِقَ مَنْ فِی السَّمٰوٰتِ وَمَنْ فِی الْاَرْضِ اِلَّا مَنْ شَآءَ اللّٰهُ ؕ— ثُمَّ نُفِخَ فِیْهِ اُخْرٰی فَاِذَا هُمْ قِیَامٌ یَّنْظُرُوْنَ ۟

६८. आणि सूर (कयामतचा आरंभ दर्शविणारा शंख) फुंकला जाईल, तेव्हा आकाशांमध्ये आणि धरतीत अस्तित्वात असणारे सर्व बेशुद्ध होऊन कोसळतील तथापि ज्याला अल्लाह इच्छिल (तो सलामत राहील), मग दुसऱ्यांदा सूर फुंकला जाईल तेव्हा ते अचानक उभे राहून पाहू लागतील. info
التفاسير:

external-link copy
69 : 39

وَاَشْرَقَتِ الْاَرْضُ بِنُوْرِ رَبِّهَا وَوُضِعَ الْكِتٰبُ وَجِایْٓءَ بِالنَّبِیّٖنَ وَالشُّهَدَآءِ وَقُضِیَ بَیْنَهُمْ بِالْحَقِّ وَهُمْ لَا یُظْلَمُوْنَ ۟

६९. आणि धरती आपल्या पालनकर्त्याच्या दिव्य तेजाने लख्ख चकाकेल. कर्म-लेख सादर केले जातील. पैगंबरांना आणि साक्षींना आणले जाईल आणि लोकांच्या दरम्यान न्यायपूर्वक फैसले केले जातील आणि त्यांच्यावर अत्याचार केला जाणार नाही. info
التفاسير:

external-link copy
70 : 39

وَوُفِّیَتْ كُلُّ نَفْسٍ مَّا عَمِلَتْ وَهُوَ اَعْلَمُ بِمَا یَفْعَلُوْنَ ۟۠

७०. आणि ज्या माणसाने जे काही केले आहे ते त्याला पूर्णपणे दिले जाईल आणि लोक जे काही करीत आहेत ते तो चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
71 : 39

وَسِیْقَ الَّذِیْنَ كَفَرُوْۤا اِلٰی جَهَنَّمَ زُمَرًا ؕ— حَتّٰۤی اِذَا جَآءُوْهَا فُتِحَتْ اَبْوَابُهَا وَقَالَ لَهُمْ خَزَنَتُهَاۤ اَلَمْ یَاْتِكُمْ رُسُلٌ مِّنْكُمْ یَتْلُوْنَ عَلَیْكُمْ اٰیٰتِ رَبِّكُمْ وَیُنْذِرُوْنَكُمْ لِقَآءَ یَوْمِكُمْ هٰذَا ؕ— قَالُوْا بَلٰی وَلٰكِنْ حَقَّتْ كَلِمَةُ الْعَذَابِ عَلَی الْكٰفِرِیْنَ ۟

७१. आणि काफिरांचे झुंडच्या झुंड जहन्नमकडे हाकत नेले जातील जेव्हा ते तिच्याजवळ पोहचतील, तिचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले जातील आणि तिथले रक्षक त्यांना विचारतील की काय तुमच्या जवळ तुमच्याचमधून रसूल (संदेशवाहक) आले नव्हते? जे तुम्हाला तुमच्या पालनकर्त्यांच्या आयती वाचून ऐकवित होते आणि तुम्हाला या दिवसाच्या भेटीबाबत सावध करीत होते. हे उत्तर देतील की होय! का नाही? परंतु अज़ाब (शिक्षा यातने) चे फर्मान काफिरांना (शेवटी) लागू झाले. info
التفاسير:

external-link copy
72 : 39

قِیْلَ ادْخُلُوْۤا اَبْوَابَ جَهَنَّمَ خٰلِدِیْنَ فِیْهَا ۚ— فَبِئْسَ مَثْوَی الْمُتَكَبِّرِیْنَ ۟

७२. फर्माविले जाईल, आता जहन्नमच्या दरवाज्यांमध्ये दाखल व्हा जिथे ते नेहमी राहतील, तेव्हा अवज्ञाकारी लोकांचे ठिकाण मोठे वाईट आहे. info
التفاسير:

external-link copy
73 : 39

وَسِیْقَ الَّذِیْنَ اتَّقَوْا رَبَّهُمْ اِلَی الْجَنَّةِ زُمَرًا ؕ— حَتّٰۤی اِذَا جَآءُوْهَا وَفُتِحَتْ اَبْوَابُهَا وَقَالَ لَهُمْ خَزَنَتُهَا سَلٰمٌ عَلَیْكُمْ طِبْتُمْ فَادْخُلُوْهَا خٰلِدِیْنَ ۟

७३. आणि जे लोक आपल्या पालनकर्त्याचे भय राखत होते, त्यांचे समूहच्या समूह जन्नतकडे पाठविले जातील, येथेपर्यर्ंत की जेव्हा ते जन्नतजवळ पोहोचतील आणि दरवाजे उघडले जातील,१ आणि तिथले रक्षक त्यांना म्हणतील की तुमच्यावर सलाम असो, तुम्ही खूश राहा. तर तुम्ही यांच्यात सदैवकाळाकरिता या. info

(१) हदीस वचनातील उल्लेखानुसार जन्नतचे आठ दरवाजे आहेत. त्यापैकी एकाचे नाव ‘रय्यान’ आहे, ज्यातून केवळ रोजा (व्रत) राखणारेच दाखल होतील. (सहीह बुखारी नं. २२५७, मुस्लिम नं. ८०८) त्याच प्रकारे इतर दरवाज्यांचीही नावे असतील. उदा. नमाजचा दरवाजा, जकातचा दरवाजा, जिहाद (धर्मयुद्धा) चा दरवाजा वगैरे. (सहीह बुखारी किताबुस सेयाम, मुस्लिम-किताबुज जकात) प्रत्येक दरवाज्याची रुंदी चाळीस वर्षांच्या अंतराएवढी असेल, तरीही ते भरगच्च असतील. (सहीह मुस्लिम किताबुज जोहद) सर्वांत प्रथम जन्नतचा दरवाजा ठोठावणारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असतील. (मुस्लिम किताबुल ईमान)

التفاسير:

external-link copy
74 : 39

وَقَالُوا الْحَمْدُ لِلّٰهِ الَّذِیْ صَدَقَنَا وَعْدَهٗ وَاَوْرَثَنَا الْاَرْضَ نَتَبَوَّاُ مِنَ الْجَنَّةِ حَیْثُ نَشَآءُ ۚ— فَنِعْمَ اَجْرُ الْعٰمِلِیْنَ ۟

७४. आणि हे म्हणतील की, आभारी आहोत अल्लाहचे, ज्याने आपला वायदा पूर्ण केला, आणि आम्हाला या धरतीचा वारस बनविले की जन्नतमध्ये वाटेल तिथे राहावे. तेव्हा सत्कर्म करणाऱ्यांचा किती चांगला मोबदला आहे! info
التفاسير: