د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
127 : 37

فَكَذَّبُوْهُ فَاِنَّهُمْ لَمُحْضَرُوْنَ ۟ۙ

१२७. परंतु जनसमूहाच्या लोकांनी त्यांना खोटे ठरविले, तेव्हा ते अवश्य (शिक्षा - यातनाग्रस्त अवस्थेत) हजर केले जातील. info
التفاسير:

external-link copy
128 : 37

اِلَّا عِبَادَ اللّٰهِ الْمُخْلَصِیْنَ ۟

१२८. मात्र अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज. info
التفاسير:

external-link copy
129 : 37

وَتَرَكْنَا عَلَیْهِ فِی الْاٰخِرِیْنَ ۟ۙ

१२९. आणि आम्ही (इलियासची) शुभा चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली. info
التفاسير:

external-link copy
130 : 37

سَلٰمٌ عَلٰۤی اِلْ یَاسِیْنَ ۟

१३०. इलियासवर सलाम असो. info
التفاسير:

external-link copy
131 : 37

اِنَّا كَذٰلِكَ نَجْزِی الْمُحْسِنِیْنَ ۟

१३१. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो. info
التفاسير:

external-link copy
132 : 37

اِنَّهٗ مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِیْنَ ۟

१३२. निःसंशय, तो आमच्या ईमानधारक दासांपैकी होता.१ info

(१) अंतिम आकाशिय ग्रंथ कुरआनने पैगंबरांची चर्चा करून त्यांच्या संदर्भात अधिकांश ठिकाणी हे शब्द वापरले आहेत की ते आमच्या ईमानधारक दासांपैकी होते. याचे दोन अर्थ आहेत, त्यांचे चारित्र्य आणि आचरणाची श्रेष्ठता दर्शविणे, जो ईमानचा आवश्यक भाग आहे, यासाठी की लोकांचे खंडन व्हावे, जे बहुतेक पैगंबरांविषयी नैतिक गोष सिद्ध करतात. उदा. तौरात आणि इंजीलच्या आजच्या प्रतींमध्ये अनेक पैगंबरांविषयी अशा मनोरचित कहाण्या सामील आहेत. दुसरा हेतु त्या लोकांचे खंडन, जे काही पैगंबरांसबंधी अतिशयोक्ती करून त्यांच्या अंगी ईश्वरी गुण व सत्ताधिकार असल्याचे सिद्ध करतात. अर्थात ते पैगंबर जरूर होते, परंतु शेवटी अल्लाहचे दासच होते. स्वतः अल्लाह किंवा त्याचा अंश अथवा सहभागी मुळीच नव्हते.

التفاسير:

external-link copy
133 : 37

وَاِنَّ لُوْطًا لَّمِنَ الْمُرْسَلِیْنَ ۟ؕ

१३३. निःसंशय, लूत (अलै.) पैगंबरांपैकी होते. info
التفاسير:

external-link copy
134 : 37

اِذْ نَجَّیْنٰهُ وَاَهْلَهٗۤ اَجْمَعِیْنَ ۟ۙ

१३४. आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सर्वांना मुक्ती प्रदान केली. info
التفاسير:

external-link copy
135 : 37

اِلَّا عَجُوْزًا فِی الْغٰبِرِیْنَ ۟

१३५. मात्र त्या म्हातारीखेरीज, जी मागे राहणाऱ्यांमध्ये राहिली. info
التفاسير:

external-link copy
136 : 37

ثُمَّ دَمَّرْنَا الْاٰخَرِیْنَ ۟

१३६. मग आम्ही इतर सर्वांचा सर्वनाश केला. info
التفاسير:

external-link copy
137 : 37

وَاِنَّكُمْ لَتَمُرُّوْنَ عَلَیْهِمْ مُّصْبِحِیْنَ ۟ۙ

१३७. आणि तुम्ही तर सकाळ झाल्यावर त्यांच्या वस्त्यांवरून जाता. info
التفاسير:

external-link copy
138 : 37

وَبِالَّیْلِ ؕ— اَفَلَا تَعْقِلُوْنَ ۟۠

१३८. आणि रात्री देखील, मग काय तरीही समजून घेत नाही? info
التفاسير:

external-link copy
139 : 37

وَاِنَّ یُوْنُسَ لَمِنَ الْمُرْسَلِیْنَ ۟ؕ

१३९. आणि निःसंशय, यूनुस देखील पैगंबरांपैकी होते. info
التفاسير:

external-link copy
140 : 37

اِذْ اَبَقَ اِلَی الْفُلْكِ الْمَشْحُوْنِ ۟ۙ

१४०. जेव्हा ते पळून जाऊन भरेलल्या नौकेजवळ पोहोचले. info
التفاسير:

external-link copy
141 : 37

فَسَاهَمَ فَكَانَ مِنَ الْمُدْحَضِیْنَ ۟ۚ

१४१. मग (फासा टाकून) नाव काढले गेले, तेव्हा हे पराभूत झाले. info
التفاسير:

external-link copy
142 : 37

فَالْتَقَمَهُ الْحُوْتُ وَهُوَ مُلِیْمٌ ۟

१४२. मग त्यांना माशाने गिळून टाकले आणि ते स्वतःचाच धिःक्कार करू लागले. info
التفاسير:

external-link copy
143 : 37

فَلَوْلَاۤ اَنَّهٗ كَانَ مِنَ الْمُسَبِّحِیْنَ ۟ۙ

१४३. तेव्हा जर ते तस्बीह (अल्लाहचे गुणगान) करणाऱ्यांपैकी नसते. info
التفاسير:

external-link copy
144 : 37

لَلَبِثَ فِیْ بَطْنِهٖۤ اِلٰی یَوْمِ یُبْعَثُوْنَ ۟ۚ

१४४. तर लोकांना उठविले जाण्याच्या दिवसापर्यंत माशाच्या पोटातच राहिले असते. info
التفاسير:

external-link copy
145 : 37

فَنَبَذْنٰهُ بِالْعَرَآءِ وَهُوَ سَقِیْمٌ ۟ۚ

१४५. तर आम्ही त्याला सपाट मैदानात टाकून दिले, आणि त्या वेळी तो आजारी होता. info
التفاسير:

external-link copy
146 : 37

وَاَنْۢبَتْنَا عَلَیْهِ شَجَرَةً مِّنْ یَّقْطِیْنٍ ۟ۚ

१४६. आणि त्याच्यावर सावली करणारे एक वेलीचे झाड उगविले. info
التفاسير:

external-link copy
147 : 37

وَاَرْسَلْنٰهُ اِلٰی مِائَةِ اَلْفٍ اَوْ یَزِیْدُوْنَ ۟ۚ

१४७. आणि आम्ही त्यांना एक लाख, किंबहुना त्याहून जास्त लोकांकडे पाठविले. info
التفاسير:

external-link copy
148 : 37

فَاٰمَنُوْا فَمَتَّعْنٰهُمْ اِلٰی حِیْنٍ ۟ؕ

१४८. तेव्हा त्यांनी ईमान राखले आणि आम्ही एका ठराविक मुदतपर्यंत त्यांना सुख सुविधा प्रदान केली. info
التفاسير:

external-link copy
149 : 37

فَاسْتَفْتِهِمْ اَلِرَبِّكَ الْبَنَاتُ وَلَهُمُ الْبَنُوْنَ ۟ۙ

१४९. त्यांना जरा विचारा की, काय तुमच्या पालनकर्त्याच्या तर मुली (कन्या) आहेत आणि त्यांच्यासाठी पुत्र आहेत? info
التفاسير:

external-link copy
150 : 37

اَمْ خَلَقْنَا الْمَلٰٓىِٕكَةَ اِنَاثًا وَّهُمْ شٰهِدُوْنَ ۟

१५०. किंवा हे त्या वेळी हजर होते, जेव्हा आम्ही फरिश्त्यांना स्त्रिया बनवून निर्माण केले? info
التفاسير:

external-link copy
151 : 37

اَلَاۤ اِنَّهُمْ مِّنْ اِفْكِهِمْ لَیَقُوْلُوْنَ ۟ۙ

१५१. खबरदार राहा की हे लोक आपल्या मनाने रचलेल्या गोष्टी बोलत आहेत. info
التفاسير:

external-link copy
152 : 37

وَلَدَ اللّٰهُ ۙ— وَاِنَّهُمْ لَكٰذِبُوْنَ ۟

१५२. की अल्लाहला संतान (मुले बाळे) आहेत, निःसंशय, हे अगदी खोटारडे आहेत. info
التفاسير:

external-link copy
153 : 37

اَصْطَفَی الْبَنَاتِ عَلَی الْبَنِیْنَ ۟ؕ

१५३. काय अल्लाहने स्वतःकरिता कन्यांना पुत्रांवर प्राधान्य दिले? info
التفاسير: