د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
23 : 33

مِنَ الْمُؤْمِنِیْنَ رِجَالٌ صَدَقُوْا مَا عَاهَدُوا اللّٰهَ عَلَیْهِ ۚ— فَمِنْهُمْ مَّنْ قَضٰی نَحْبَهٗ وَمِنْهُمْ مَّنْ یَّنْتَظِرُ ۖؗ— وَمَا بَدَّلُوْا تَبْدِیْلًا ۟ۙ

२३. ईमान राखणाऱ्यांमध्ये (असे) लोकही आहेत, ज्यांनी अल्लाहशी जो वायदा केला होता तो खरा करून दाखविला.१ काहींनी तर आपला वायदा पूर्ण केला आणि काही (संधीची) प्रतीक्षा करीत आहेत. आणि त्यांनी कसलाही बदल केला नाही. info

(२) ही आयत त्या सहाबांविषयी अवतरली आहे, ज्यांनी याप्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देण्याचे आश्चर्यजनक कारनामे दाखविले होते आणि त्यांच्यात ते सहबादेखील होते जे बद्रच्या लढाईत सामील होऊ शकले नव्हते, परंतु त्यांनी ही प्रतिज्ञा केली होती पुन्हा जर एखादी संधी लाभली तर जिहाद (धर्मयुद्धा) मध्ये भरपूर भाग घेतील. उदा. नज़र बिन अनस वगैरे जे शेवटी लढता लढता ओहदच्या युद्धात शहीद झाले. त्यांच्या शरीरावर तलवार, भाले आणि बाणांचे ऐंशीच्या वर घाव होते. शहादतनंतर त्यांच्या बहिणीने त्यांना, त्यांच्या बोटावरून ओळखले. (मुसनद अहमद, हिस्सा ४, पृ. १९३)

التفاسير:

external-link copy
24 : 33

لِّیَجْزِیَ اللّٰهُ الصّٰدِقِیْنَ بِصِدْقِهِمْ وَیُعَذِّبَ الْمُنٰفِقِیْنَ اِنْ شَآءَ اَوْ یَتُوْبَ عَلَیْهِمْ ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ غَفُوْرًا رَّحِیْمًا ۟ۚ

२४. यासाठी की अल्लाहने सच्चा लोकांना त्यांच्या खरेपणाचा मोबदला प्रदान करावा आणि इच्छिल्यास मुनाफिक (दांभिक) लोकांना शिक्षा-यातना द्यावी किंवा त्यांचीही क्षमा- याचना कबूल करावी. अल्लाह मोठा क्षमाशील आणि मोठा दयावान आहे. info
التفاسير:

external-link copy
25 : 33

وَرَدَّ اللّٰهُ الَّذِیْنَ كَفَرُوْا بِغَیْظِهِمْ لَمْ یَنَالُوْا خَیْرًا ؕ— وَكَفَی اللّٰهُ الْمُؤْمِنِیْنَ الْقِتَالَ ؕ— وَكَانَ اللّٰهُ قَوِیًّا عَزِیْزًا ۟ۚ

२५. आणि अल्लाहने काफिरांना क्रोधाने भारावलेल्या अवस्थेतच (असफल) परतविले, ज्यामुळे त्यांची कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही आणि त्या युद्धात अल्लाह स्वतःच ईमान राखणाऱ्यांसाठी पुरेसा ठरला. अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
26 : 33

وَاَنْزَلَ الَّذِیْنَ ظَاهَرُوْهُمْ مِّنْ اَهْلِ الْكِتٰبِ مِنْ صَیَاصِیْهِمْ وَقَذَفَ فِیْ قُلُوْبِهِمُ الرُّعْبَ فَرِیْقًا تَقْتُلُوْنَ وَتَاْسِرُوْنَ فَرِیْقًا ۟ۚ

२६. आणि ज्या ग्रंथधारकांनी, त्यांच्याशी लागेबांधे जुळवून घेतले होते त्यांनाही अल्लाहने त्यांच्या किल्ल्यांमधून बाहेर काढले आणि त्यांच्या मनात असा धाक बसविला की तुम्ही एका समूहास ठार करीत राहिले आणि एका समूहाला कैदी बनवित राहिले. info
التفاسير:

external-link copy
27 : 33

وَاَوْرَثَكُمْ اَرْضَهُمْ وَدِیَارَهُمْ وَاَمْوَالَهُمْ وَاَرْضًا لَّمْ تَطَـُٔوْهَا ؕ— وَكَانَ اللّٰهُ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرًا ۟۠

२७. आणि त्याने तुम्हाला त्यांच्या जमिनीचे आणि त्याच्या घरांचे आणि धन-संपत्तीचे मालक बनविले आणि त्या जमिनीचेही जिच्यावर तुम्ही अद्याप पाऊलही ठेवले नाही. अल्लाह सर्व काही करण्याचे सामर्थ्य राखतो. info
التفاسير:

external-link copy
28 : 33

یٰۤاَیُّهَا النَّبِیُّ قُلْ لِّاَزْوَاجِكَ اِنْ كُنْتُنَّ تُرِدْنَ الْحَیٰوةَ الدُّنْیَا وَزِیْنَتَهَا فَتَعَالَیْنَ اُمَتِّعْكُنَّ وَاُسَرِّحْكُنَّ سَرَاحًا جَمِیْلًا ۟

२८. हे पैगंबर! आपल्या पत्नींना सांगा की ऐहिक जीवनाची आणि ऐहिक शोभा सजावटीची इच्छा बाळगत असाल तर या मी तुम्हाला काही देऊन सवरून चांगल्या रितीने सोडून द्यावे. info
التفاسير:

external-link copy
29 : 33

وَاِنْ كُنْتُنَّ تُرِدْنَ اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ وَالدَّارَ الْاٰخِرَةَ فَاِنَّ اللّٰهَ اَعَدَّ لِلْمُحْسِنٰتِ مِنْكُنَّ اَجْرًا عَظِیْمًا ۟

२९. आणि जर तुमची इच्छा अल्लाह आणि त्याचा रसूल (पैगंबर) आणि आखिरतचे घर आहे तर (विश्वास ठेवा की) तुमच्यापैकी सत्कर्म करणारींकरिता अल्लाहने फार चांगला मोबदला तयार करून ठेवला आहे. info
التفاسير:

external-link copy
30 : 33

یٰنِسَآءَ النَّبِیِّ مَنْ یَّاْتِ مِنْكُنَّ بِفَاحِشَةٍ مُّبَیِّنَةٍ یُّضٰعَفْ لَهَا الْعَذَابُ ضِعْفَیْنِ ؕ— وَكَانَ ذٰلِكَ عَلَی اللّٰهِ یَسِیْرًا ۟

३०. हे पैगंबरांच्या पत्नींनो! तुमच्यापैकी जी (पत्नी) देखील उघडपणे निर्लज्जतेचे कृत्य करील तर तिला दुप्पट अज़ाब दिला जाईल. अल्लाहकरिता ही फार सोपी गोष्ट आहे. info
التفاسير: