د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
46 : 29

وَلَا تُجَادِلُوْۤا اَهْلَ الْكِتٰبِ اِلَّا بِالَّتِیْ هِیَ اَحْسَنُ ؗ— اِلَّا الَّذِیْنَ ظَلَمُوْا مِنْهُمْ وَقُوْلُوْۤا اٰمَنَّا بِالَّذِیْۤ اُنْزِلَ اِلَیْنَا وَاُنْزِلَ اِلَیْكُمْ وَاِلٰهُنَا وَاِلٰهُكُمْ وَاحِدٌ وَّنَحْنُ لَهٗ مُسْلِمُوْنَ ۟

४६. आणि ग्रंथधारकांशी खूप चांगल्या रितीने वादविवाद करा, अशा लोकांखेरीज, जे त्यांच्यात अत्याचारी आहेत. आणि स्पष्ट ऐलान करा की आम्ही तर त्या ग्रंथावरही ईमान राखतो, जो आमच्यावर अवतरित केला गेला आहे आणि त्यावरही, जो तुमच्यावर अवतरित केला गेला. आमचा आणि तुमचा पालनकर्ता एकच आहे. आम्ही सर्व त्याचेच आज्ञाधारक आहोत. info
التفاسير:

external-link copy
47 : 29

وَكَذٰلِكَ اَنْزَلْنَاۤ اِلَیْكَ الْكِتٰبَ ؕ— فَالَّذِیْنَ اٰتَیْنٰهُمُ الْكِتٰبَ یُؤْمِنُوْنَ بِهٖ ۚ— وَمِنْ هٰۤؤُلَآءِ مَنْ یُّؤْمِنُ بِهٖ ؕ— وَمَا یَجْحَدُ بِاٰیٰتِنَاۤ اِلَّا الْكٰفِرُوْنَ ۟

४७. आणि आम्ही त्याच प्रकारे तुमच्याकडे आपला ग्रंथ अवतरित केला आहे, यास्तव ज्यांना आम्ही ग्रंथ प्रदान केला आहे, ते त्यावर ईमान राखतात आणि त्यांच्यापैकी काही त्यावर ईमान राखतात आणि आमच्या आयतींचा इन्कार केवळ काफिरच करतात. info
التفاسير:

external-link copy
48 : 29

وَمَا كُنْتَ تَتْلُوْا مِنْ قَبْلِهٖ مِنْ كِتٰبٍ وَّلَا تَخُطُّهٗ بِیَمِیْنِكَ اِذًا لَّارْتَابَ الْمُبْطِلُوْنَ ۟

४८. आणि यापूर्वी तर तुम्ही एखादा ग्रंथ वाचत होते आणि ना एखादा ग्रंथ आपल्या हाताने लिहित होते की (ज्यामुळे) असत्याचे पुजारी शंका संशयात पडले असते. info
التفاسير:

external-link copy
49 : 29

بَلْ هُوَ اٰیٰتٌۢ بَیِّنٰتٌ فِیْ صُدُوْرِ الَّذِیْنَ اُوْتُوا الْعِلْمَ ؕ— وَمَا یَجْحَدُ بِاٰیٰتِنَاۤ اِلَّا الظّٰلِمُوْنَ ۟

४९. वास्तविक या (कुरआनाच्या) दिव्य (स्पष्ट) आयती आहेत, ज्या विद्वानांच्या हृदयात सुरक्षित आहेत. आमच्या आयतींचा इन्कार करणारा, अत्याचारीखेरीज दुसरा कोणी नाही. info
التفاسير:

external-link copy
50 : 29

وَقَالُوْا لَوْلَاۤ اُنْزِلَ عَلَیْهِ اٰیٰتٌ مِّنْ رَّبِّهٖ ؕ— قُلْ اِنَّمَا الْاٰیٰتُ عِنْدَ اللّٰهِ ؕ— وَاِنَّمَاۤ اَنَا نَذِیْرٌ مُّبِیْنٌ ۟

५०. आणि ते म्हणाले, याच्यावर काही निशाण्या याच्या पालनकर्त्यातर्फे का नाही अवतरित केल्या गेल्या? (तुम्ही) सांगा, निशाण्या तर सर्व अल्लाहजवळ आहेत. माझी योग्यता तर केवळ स्पष्टतः खबरदार (सावध) करणाऱ्याची आहे. info
التفاسير:

external-link copy
51 : 29

اَوَلَمْ یَكْفِهِمْ اَنَّاۤ اَنْزَلْنَا عَلَیْكَ الْكِتٰبَ یُتْلٰی عَلَیْهِمْ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَرَحْمَةً وَّذِكْرٰی لِقَوْمٍ یُّؤْمِنُوْنَ ۟۠

५१. काय त्यांच्यासाठी हे निशाण पुरेसे नाही की आम्ही तुमच्यावर आपला ग्रंथ अवतरित केला, जो त्यांना वाचून ऐकविला जात आहे. यात (अल्लाहची) दया-कृपाही आहे आणि बोध उपदेशही, त्या लोकांसाठी जे ईमान राखणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
52 : 29

قُلْ كَفٰی بِاللّٰهِ بَیْنِیْ وَبَیْنَكُمْ شَهِیْدًا ۚ— یَعْلَمُ مَا فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— وَالَّذِیْنَ اٰمَنُوْا بِالْبَاطِلِ وَكَفَرُوْا بِاللّٰهِ ۙ— اُولٰٓىِٕكَ هُمُ الْخٰسِرُوْنَ ۟

५२. त्यांना सांगा, माझ्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाहचे साक्षी असणे पुरेसे आहे. तो तर आकाश आणि जमिनीच्या प्रत्येक वस्तूला जाणणारा आहे. जे लोक असत्याला मानणारे आहेत आणि अल्लाहशी कुप्र (इन्कार) करणारे आहेत, ते फार मोठ्या नुकसानात आहेत. info
التفاسير: