د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
137 : 2

فَاِنْ اٰمَنُوْا بِمِثْلِ مَاۤ اٰمَنْتُمْ بِهٖ فَقَدِ اهْتَدَوْا ۚ— وَاِنْ تَوَلَّوْا فَاِنَّمَا هُمْ فِیْ شِقَاقٍ ۚ— فَسَیَكْفِیْكَهُمُ اللّٰهُ ۚ— وَهُوَ السَّمِیْعُ الْعَلِیْمُ ۟ؕ

१३७. जर ते तुमच्यासारखे ईमान राखतील तर मार्गदर्शन प्राप्त करतील आणि जर तोंड फिरवतील तर विरोधात आहेत. अल्लाह त्या सर्वांच्या विरोधात भविष्यात तुमची मदत करील. अल्लाह चांगल्या प्रकारे ऐकणारा आणि जाणणारा आहे. info

(१) या आयतीत पुन्हा लाभ आणि आचरणाची श्रेष्ठता विशद करून थोर बुजुर्ग आणि महात्मा वगैरेंशी नाते किंवा त्यांच्यावर भरोसा व्यर्थ सांगितला गेला आहे. कारण, (‘‘ज्याला त्याच्या कर्माने मागे सोडले, त्याचा वंश त्याला पुढे नेणार नाही.’’) (सहीह मुस्लिम) अर्थात थोर बुजुर्गांच्या चांगल्या कामाने तुम्हाला काही फायदा आणि त्यांच्या वाईट कर्मांविषयी तुम्हाला काही विचारले जाणार नाही, किंबहुना त्यांच्या कर्मांविषयी तुम्हाला किंवा तुमच्या आचरणाबाबत त्यांना विचारणा केली जाणार नाही.
“कोणीही कोणाचे ओझे उचलणार नाही.’’ (सूरह फातिर-१८)
“माणसाकरिता तेच काही आहे, ज्याच्यासाठी त्याने प्रयत्न केला.’’ (सूरह अल नजम-३९)

التفاسير: