د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
28 : 18

وَاصْبِرْ نَفْسَكَ مَعَ الَّذِیْنَ یَدْعُوْنَ رَبَّهُمْ بِالْغَدٰوةِ وَالْعَشِیِّ یُرِیْدُوْنَ وَجْهَهٗ وَلَا تَعْدُ عَیْنٰكَ عَنْهُمْ ۚ— تُرِیْدُ زِیْنَةَ الْحَیٰوةِ الدُّنْیَا ۚ— وَلَا تُطِعْ مَنْ اَغْفَلْنَا قَلْبَهٗ عَنْ ذِكْرِنَا وَاتَّبَعَ هَوٰىهُ وَكَانَ اَمْرُهٗ فُرُطًا ۟

२८. आणि स्वतःला अशाच लोकांच्या सोबत राखत जा, जे आपल्या पालनकर्त्याला सकाळ संध्याकाळ पुकारतात आणि त्याच्याच मुखा (अनुग्रहा) ची अभिलाषा करतात. खबरदार! तुमची दृष्टी त्यांच्यावरून हटता कामा नये की ऐहिक जीवनाच्या शोभा-सजावटीच्या प्रयत्नात मग्न व्हावे (पाहा) त्याचे म्हणणे मान्य करू नका, ज्याच्या हृदयाला आम्ही आपल्या आठवणीपासून गाफील ठेवले आहे आणि जो इच्छा-आकांक्षांच्या मागे धावत आहे आणि ज्याच्या कर्माने मर्यादा पार केली आहे. info
التفاسير:

external-link copy
29 : 18

وَقُلِ الْحَقُّ مِنْ رَّبِّكُمْ ۫— فَمَنْ شَآءَ فَلْیُؤْمِنْ وَّمَنْ شَآءَ فَلْیَكْفُرْ ۚ— اِنَّاۤ اَعْتَدْنَا لِلظّٰلِمِیْنَ نَارًا اَحَاطَ بِهِمْ سُرَادِقُهَا ؕ— وَاِنْ یَّسْتَغِیْثُوْا یُغَاثُوْا بِمَآءٍ كَالْمُهْلِ یَشْوِی الْوُجُوْهَ ؕ— بِئْسَ الشَّرَابُ ؕ— وَسَآءَتْ مُرْتَفَقًا ۟

२९. आणि ऐलान करा की हे परिपूर्ण सत्य (कुरआन) तुमच्या पालनकर्त्यातर्फे आहे. आता ज्याची इच्छा होईल त्याने ईमान राखावे आणि ज्याची इच्छा होईल त्याने इन्कार करावा. अत्याचारी लोकांकरिता आम्ही ती आग तयार करून ठेवली आहे, जिच्या (आगीच्या) कनाती त्यांना घेरून टाकतील. जर ते गाऱ्हाणे मांडतील तर त्यांची मदत त्या पाण्याने केली जाईल, जे तेलाच्या गाळासारखे असेल, जे चेहरा भाजून टाकील मोठे वाईट पाणी आहे आणि मोठे वाईट विश्रांतीस्थान (जहन्नम) आहे. info
التفاسير:

external-link copy
30 : 18

اِنَّ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ اِنَّا لَا نُضِیْعُ اَجْرَ مَنْ اَحْسَنَ عَمَلًا ۟ۚ

३०. निःसंशय ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले तर आम्ही एखाद्या सर्त्म करणाऱ्याचा मोबदला वाया जाऊ देत नाही. info
التفاسير:

external-link copy
31 : 18

اُولٰٓىِٕكَ لَهُمْ جَنّٰتُ عَدْنٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهِمُ الْاَنْهٰرُ یُحَلَّوْنَ فِیْهَا مِنْ اَسَاوِرَ مِنْ ذَهَبٍ وَّیَلْبَسُوْنَ ثِیَابًا خُضْرًا مِّنْ سُنْدُسٍ وَّاِسْتَبْرَقٍ مُّتَّكِـِٕیْنَ فِیْهَا عَلَی الْاَرَآىِٕكِ ؕ— نِعْمَ الثَّوَابُ ؕ— وَحَسُنَتْ مُرْتَفَقًا ۟۠

३१. त्यांच्यासाठी नेहमी नेहमी असणारी जन्नत आहे. तिच्याखाली नद्या वाहत असतील. तिथे यांना सुवर्ण कांकण घातले जाईल. आणि हिरव्या रंगाचे तलम व जाड रेशमाचे कपडे घालतील त्या ठिकाणी सिंहासनावर तक्के लावून बसतील. किती चांगला मोबदला आहे आणि किती चांगले आराम करण्याचे घर आहे. info
التفاسير:

external-link copy
32 : 18

وَاضْرِبْ لَهُمْ مَّثَلًا رَّجُلَیْنِ جَعَلْنَا لِاَحَدِهِمَا جَنَّتَیْنِ مِنْ اَعْنَابٍ وَّحَفَفْنٰهُمَا بِنَخْلٍ وَّجَعَلْنَا بَیْنَهُمَا زَرْعًا ۟ؕ

३२. आणि त्यांना त्या दोन माणसांचे उदाहरणही ऐकवा ज्यांच्यापैकी एकाला आम्ही द्राक्षांच्या दोन बागा देऊन ठेवल्या होत्या, ज्यांना खजुरीच्या वृक्षांनी आम्ही घेरून ठेवले होते आणि दोघांच्या दरम्यान शेती निर्माण केली होती. info
التفاسير:

external-link copy
33 : 18

كِلْتَا الْجَنَّتَیْنِ اٰتَتْ اُكُلَهَا وَلَمْ تَظْلِمْ مِّنْهُ شَیْـًٔا ۙ— وَّفَجَّرْنَا خِلٰلَهُمَا نَهَرًا ۟ۙ

३३. दोन्ही बागांनी आपली फळे भरपूर दिलीत आणि त्या काहीच कमतरता केली नाही आणि आम्ही त्या बागांच्या दरम्यान प्रवाह जारी केला होता. info
التفاسير:

external-link copy
34 : 18

وَّكَانَ لَهٗ ثَمَرٌ ۚ— فَقَالَ لِصَاحِبِهٖ وَهُوَ یُحَاوِرُهٗۤ اَنَا اَكْثَرُ مِنْكَ مَالًا وَّاَعَزُّ نَفَرًا ۟

३४. आणि (अशा प्रकारे) त्याच्याजवळ फळे होती. एक दिवस बोलता बोलता तो आपल्या साथीदाराला म्हणाला की मी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे आणि जत्थ्यातही अधिक प्रतिष्ठीत आहे. info
التفاسير: