د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
111 : 16

یَوْمَ تَاْتِیْ كُلُّ نَفْسٍ تُجَادِلُ عَنْ نَّفْسِهَا وَتُوَفّٰی كُلُّ نَفْسٍ مَّا عَمِلَتْ وَهُمْ لَا یُظْلَمُوْنَ ۟

१११. ज्या दिवशी प्रत्येक मनुष्य स्वतःसाठी वादविवाद घालत येईल आणि प्रत्येकाला त्याच्या कृत कर्माचा पुरेपूर मोबदला दिला जाईल आणि लोकांवर किंचितही अत्याचार केला जाणार नाही. info
التفاسير:

external-link copy
112 : 16

وَضَرَبَ اللّٰهُ مَثَلًا قَرْیَةً كَانَتْ اٰمِنَةً مُّطْمَىِٕنَّةً یَّاْتِیْهَا رِزْقُهَا رَغَدًا مِّنْ كُلِّ مَكَانٍ فَكَفَرَتْ بِاَنْعُمِ اللّٰهِ فَاَذَاقَهَا اللّٰهُ لِبَاسَ الْجُوْعِ وَالْخَوْفِ بِمَا كَانُوْا یَصْنَعُوْنَ ۟

११२. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या वस्तीचे उदाहरण सादर करतो, जी सुख-शांतीपूर्वक होती. तिची रोजी (आजिविवका) तिच्याजवळ सुसंपन्नतेसह सर्व मार्गांनी चालून येत होती, मग त्या वस्तीने अल्लाहच्या कृपा देणग्यांचा इन्कार केला, तेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहने तिला भूक आणि भयाचा स्वाद चाखविला. हा मोबदला होता त्यांच्या वाईट कर्मांचा. info
التفاسير:

external-link copy
113 : 16

وَلَقَدْ جَآءَهُمْ رَسُوْلٌ مِّنْهُمْ فَكَذَّبُوْهُ فَاَخَذَهُمُ الْعَذَابُ وَهُمْ ظٰلِمُوْنَ ۟

११३. आणि त्यांच्याजवळ, त्यांच्यामधूनच पैगंबर येऊन पोहोचला, तरीही त्यांनी त्याला खोटे ठरविले, तेव्हा अज़ाब (शिक्षा-यातना) ने त्यांना येऊन धरले आणि ते होतेच अत्याचारी. info
التفاسير:

external-link copy
114 : 16

فَكُلُوْا مِمَّا رَزَقَكُمُ اللّٰهُ حَلٰلًا طَیِّبًا ۪— وَّاشْكُرُوْا نِعْمَتَ اللّٰهِ اِنْ كُنْتُمْ اِیَّاهُ تَعْبُدُوْنَ ۟

११४. आणि जी काही हलाल (उचित) आणि पाक रोजी (आजिविका) अल्लाहने तुम्हाला देऊन ठेवली आहे, ती खा आणि अल्लाहच्या देणगी (नेमत) बद्दल कृतज्ञता व्यक्त करा, जर तुम्ही त्याचीच उपासना करत असाल. info
التفاسير:

external-link copy
115 : 16

اِنَّمَا حَرَّمَ عَلَیْكُمُ الْمَیْتَةَ وَالدَّمَ وَلَحْمَ الْخِنْزِیْرِ وَمَاۤ اُهِلَّ لِغَیْرِ اللّٰهِ بِهٖ ۚ— فَمَنِ اضْطُرَّ غَیْرَ بَاغٍ وَّلَا عَادٍ فَاِنَّ اللّٰهَ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

११५. तुमच्याकरिता केवळ मेलेले आणि रक्त आणि डुकराचे मांस आणि ज्या वस्तूवर अल्लाहशिवाय दुसऱ्याचे नाव घेतले जाईल, हराम आहे. तरीही जर एखादा मनुष्य लाचार केला जावा आणि तो अत्याचारी नसावा आणि ना मर्यादेचे उल्लंघन करणारा असावा तर निःसंशय अल्लाह माफ करणारा आणि खूप दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
116 : 16

وَلَا تَقُوْلُوْا لِمَا تَصِفُ اَلْسِنَتُكُمُ الْكَذِبَ هٰذَا حَلٰلٌ وَّهٰذَا حَرَامٌ لِّتَفْتَرُوْا عَلَی اللّٰهِ الْكَذِبَ ؕ— اِنَّ الَّذِیْنَ یَفْتَرُوْنَ عَلَی اللّٰهِ الْكَذِبَ لَا یُفْلِحُوْنَ ۟ؕ

११६. आणि एखाद्या वस्तूला आपल्या तोंडाने खोटेच सांगत जाऊ नका की ही हलाल आहे आणि ही हराम आहे की (अशाने) अल्लाहवर खोटा आरोप लावाल. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाहवर खोटा आरोप रचणारे सफलतेपासून वंचितच राहतात. info
التفاسير:

external-link copy
117 : 16

مَتَاعٌ قَلِیْلٌ ۪— وَّلَهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۟

११७. त्यांना फार कमी लाभ प्राप्त होतो आणि त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब (शिक्ष-यातना) आहे. info
التفاسير:

external-link copy
118 : 16

وَعَلَی الَّذِیْنَ هَادُوْا حَرَّمْنَا مَا قَصَصْنَا عَلَیْكَ مِنْ قَبْلُ ۚ— وَمَا ظَلَمْنٰهُمْ وَلٰكِنْ كَانُوْۤا اَنْفُسَهُمْ یَظْلِمُوْنَ ۟

११८. आणि यहूदी लोकांवर आम्ही जे काही हराम केले होते, ते आम्ही यापूर्वीच तुम्हाला ऐकविले आहे. आम्ही त्यांच्यावर अत्याचार केला नाही किंबहुना ते स्वतःच आपल्या प्राणांवर जुलूम करीत राहिले. info
التفاسير: