د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
16 : 15

وَلَقَدْ جَعَلْنَا فِی السَّمَآءِ بُرُوْجًا وَّزَیَّنّٰهَا لِلنّٰظِرِیْنَ ۟ۙ

१६. आणि निःसंशय, आम्ही आकाशात बुरुज (राशी) बनविले आहेत आणि पाहणाऱ्यांकरिता याला सुशोभित केले आहे. info
التفاسير:

external-link copy
17 : 15

وَحَفِظْنٰهَا مِنْ كُلِّ شَیْطٰنٍ رَّجِیْمٍ ۟ۙ

१७. आणि धिःक्कारलेल्या प्रत्येक सैतानापासून याला सुरक्षित ठेवले आहे. info
التفاسير:

external-link copy
18 : 15

اِلَّا مَنِ اسْتَرَقَ السَّمْعَ فَاَتْبَعَهٗ شِهَابٌ مُّبِیْنٌ ۟

१८. तथापि, जो लपून छपून ऐकण्याचा प्रयत्न करतो, भडकत्या आगीचा निखारा त्याच्या पाठीशी लागतो. info
التفاسير:

external-link copy
19 : 15

وَالْاَرْضَ مَدَدْنٰهَا وَاَلْقَیْنَا فِیْهَا رَوَاسِیَ وَاَنْۢبَتْنَا فِیْهَا مِنْ كُلِّ شَیْءٍ مَّوْزُوْنٍ ۟

१९. आणि जमिनीला आम्ही पसरवून दिले आहे आणि तिच्यावर पर्वत ठेवले आहेत आणि तिच्यात प्रत्येक वस्तू आम्ही निश्चित प्रमाणात उगविली आहे. info
التفاسير:

external-link copy
20 : 15

وَجَعَلْنَا لَكُمْ فِیْهَا مَعَایِشَ وَمَنْ لَّسْتُمْ لَهٗ بِرٰزِقِیْنَ ۟

२०. आणि तिच्यातच आम्ही तुमच्या अन्न सामुग्रीची व्यवस्था केली आहे आणि (त्यांच्यासाठीही) ज्यांना रोजी देणारे तुम्ही नाहीत. info
التفاسير:

external-link copy
21 : 15

وَاِنْ مِّنْ شَیْءٍ اِلَّا عِنْدَنَا خَزَآىِٕنُهٗ ؗ— وَمَا نُنَزِّلُهٗۤ اِلَّا بِقَدَرٍ مَّعْلُوْمٍ ۟

२१. आणि जेवढ्या म्हणून चीज-वस्तू आहेत, त्या सर्वांचा खजिना आमच्याजवळ आहे, आणि आम्ही प्रत्येक वस्तू तिच्या निर्धारित प्रमाणात उतरवितो. info
التفاسير:

external-link copy
22 : 15

وَاَرْسَلْنَا الرِّیٰحَ لَوَاقِحَ فَاَنْزَلْنَا مِنَ السَّمَآءِ مَآءً فَاَسْقَیْنٰكُمُوْهُ ۚ— وَمَاۤ اَنْتُمْ لَهٗ بِخٰزِنِیْنَ ۟

२२. आणि आम्ही वजनदार वाऱ्यांना पाठिवतो, मग आकाशातून पर्जन्य वृष्टी करून तुम्हाला तृप्त करतो आणि तुम्ही त्याचा संग्रह करून ठेवणारे नाहीत. info
التفاسير:

external-link copy
23 : 15

وَاِنَّا لَنَحْنُ نُحْیٖ وَنُمِیْتُ وَنَحْنُ الْوٰرِثُوْنَ ۟

२३. आणि आम्हीच जीवन देतो आणि मृत्युही देतो आणि (शेवटी) आम्हीच वारस आहोत. info
التفاسير:

external-link copy
24 : 15

وَلَقَدْ عَلِمْنَا الْمُسْتَقْدِمِیْنَ مِنْكُمْ وَلَقَدْ عَلِمْنَا الْمُسْتَاْخِرِیْنَ ۟

२४. आणि तुमच्यापैकी पुढे जाणाऱ्यांना आणि मागे राहणाऱ्यांनाही आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
25 : 15

وَاِنَّ رَبَّكَ هُوَ یَحْشُرُهُمْ ؕ— اِنَّهٗ حَكِیْمٌ عَلِیْمٌ ۟۠

२५. आणि तुमचा पालनकर्ता समस्त लोकांना एकत्रित करेल. निःसंशय तो मोठा तत्त्वदर्शी, मोठा ज्ञानी आहे. info
التفاسير:

external-link copy
26 : 15

وَلَقَدْ خَلَقْنَا الْاِنْسَانَ مِنْ صَلْصَالٍ مِّنْ حَمَاٍ مَّسْنُوْنٍ ۟ۚ

२६. आणि निःसंशय, आम्ही मानवाला खनकणाऱ्या (कोरड्या) मातीपासून, जी सडलेल्या गाऱ्याची होती, निर्माण केले आहे. info
التفاسير:

external-link copy
27 : 15

وَالْجَآنَّ خَلَقْنٰهُ مِنْ قَبْلُ مِنْ نَّارِ السَّمُوْمِ ۟

२७. आणि त्याच्यापूर्वी जिन्नांना आम्ही अग्निशिखेपासून निर्माण केले. info
التفاسير:

external-link copy
28 : 15

وَاِذْ قَالَ رَبُّكَ لِلْمَلٰٓىِٕكَةِ اِنِّیْ خَالِقٌۢ بَشَرًا مِّنْ صَلْصَالٍ مِّنْ حَمَاٍ مَّسْنُوْنٍ ۟

२८. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी एक मानव, काळ्या सडलेल्या, खनकणाऱ्या मातीपासून निर्माण करणार आहे. info
التفاسير:

external-link copy
29 : 15

فَاِذَا سَوَّیْتُهٗ وَنَفَخْتُ فِیْهِ مِنْ رُّوْحِیْ فَقَعُوْا لَهٗ سٰجِدِیْنَ ۟

२९. तर जेव्हा मी त्याला पूर्ण बनवून घेईन आणि त्यात आपला आत्मा फुंकेन तेव्हा तुम्ही सर्व त्याला सजदा करा (त्याच्यापुढे माथा टेका) info
التفاسير:

external-link copy
30 : 15

فَسَجَدَ الْمَلٰٓىِٕكَةُ كُلُّهُمْ اَجْمَعُوْنَ ۟ۙ

३०. यास्तव सर्वच्या सर्व फरिश्त्यांनी आपला माथा टेकला. info
التفاسير:

external-link copy
31 : 15

اِلَّاۤ اِبْلِیْسَ ؕ— اَبٰۤی اَنْ یَّكُوْنَ مَعَ السّٰجِدِیْنَ ۟

३१. परंतु इब्लिसने सजदा करणाऱ्यांमध्ये सामील होण्यास इन्कार केला. info
التفاسير: