د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
14 : 13

لَهٗ دَعْوَةُ الْحَقِّ ؕ— وَالَّذِیْنَ یَدْعُوْنَ مِنْ دُوْنِهٖ لَا یَسْتَجِیْبُوْنَ لَهُمْ بِشَیْءٍ اِلَّا كَبَاسِطِ كَفَّیْهِ اِلَی الْمَآءِ لِیَبْلُغَ فَاهُ وَمَا هُوَ بِبَالِغِهٖ ؕ— وَمَا دُعَآءُ الْكٰفِرِیْنَ اِلَّا فِیْ ضَلٰلٍ ۟

१४. त्यालाच पुकारणे खरे आहे. जे लोक त्याच्याखेरीज दुसऱ्यांना पुकारतात, ते त्यांच्या कोणत्याही हाकेला उत्तर देत नाहीत जणू एखाद्या माणसाने आपले हात पाण्याकडे पसरविले असावेत की पाणी त्यांच्या तोंडात येऊन पडावे, वास्तविक ते पाणी त्यांच्या तोंडात जाणार नाही.१ त्या काफिर लोकांचे जेवढे पुकारणे आहे सर्व पथभ्रष्ट आहे. info

(१) अर्थात जे लोक अल्लाहला सोडून इतरांना मदतीसाठी पुकारतात, त्यांचे उदाहरण असे की जणू एखाद्याने पाण्याकडे हात पसरवून पाण्याला सांगावे, ये माझ्या तोंडात ये, उघड आहे पाणी न चालणारे आहे, त्याला काय माहीत की हात पसरविणाऱ्याची गरज काय आहे आणि न त्याला हे माहीत की मला तोंडापर्यंत येण्याचे सांगितले जात आहे, आणि त्याच्यात हे सामर्थ्य नाही की आपल्या जागेवरून चालत जाऊन, त्याच्या तोंडापर्यंत पोहचावे. अशा प्रकारे हे अनेक ईश्वरांची भक्ती आराधना करणारे अल्लाहखेरीज ज्यांना पुकारतात, त्यांना माहीतही नाही की कोणी त्यांना पुकारत आहे, आणि त्याची अमकी एक गरज आहे आणि ना ती गरज पूर्ण करण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य आहे.

التفاسير: