ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
8 : 98

جَزَآؤُهُمْ عِنْدَ رَبِّهِمْ جَنّٰتُ عَدْنٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ خٰلِدِیْنَ فِیْهَاۤ اَبَدًا ؕ— رَضِیَ اللّٰهُ عَنْهُمْ وَرَضُوْا عَنْهُ ؕ— ذٰلِكَ لِمَنْ خَشِیَ رَبَّهٗ ۟۠

८. यांचा मोबदला, त्यांच्या पालनकर्त्याजवळ निरंतर राहणाऱ्या जन्नती आहेत, ज्यांच्या खाली (थंड पाण्याचे) प्रवाह वाहत असतील, ज्यात ते सदैवकाळ राहतील. सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांच्याशी राजी झाला, आणि हे त्याच्याशी राजी झाले. हे (केवळ अशा माणसाकरिता आहे जो आपल्या पालनकर्त्याचे भय राखतो.१ info

(१) अर्थात हा चांगला मोबदला आणि सुख - संपन्नता त्याच लोकांसाठी आहे जे या जगात अल्लाहचे भय बाळगून राहतात आणि या भयामुळे अल्लाहच्या अवज्ञेपासून दूर राहतात. जर प्रसंगी, मानवी निकडीमुळे अल्लाहची अवज्ञा झाली, तर त्वरित क्षमा याचना (तौबा) करतात आणि पुढे तसा अपराध न करण्याचा दृढसंकल्प करून आपले आचरण सुधारतात. येथपावेतो की त्यांच्या मृत्यु याच आज्ञापालनासह झाला, अवक्षेसह नव्हे. तात्पर्य, जो मनुष्य अल्लाहचे भय राखतो तो अवज्ञा करण्यावर दुराग्रह करीत नाही आणि ना त्यावर अटळ राहतो.

التفاسير: