ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

ߞߐߜߍ ߝߙߍߕߍ:close

external-link copy
7 : 58

اَلَمْ تَرَ اَنَّ اللّٰهَ یَعْلَمُ مَا فِی السَّمٰوٰتِ وَمَا فِی الْاَرْضِ ؕ— مَا یَكُوْنُ مِنْ نَّجْوٰی ثَلٰثَةٍ اِلَّا هُوَ رَابِعُهُمْ وَلَا خَمْسَةٍ اِلَّا هُوَ سَادِسُهُمْ وَلَاۤ اَدْنٰی مِنْ ذٰلِكَ وَلَاۤ اَكْثَرَ اِلَّا هُوَ مَعَهُمْ اَیْنَ مَا كَانُوْا ۚ— ثُمَّ یُنَبِّئُهُمْ بِمَا عَمِلُوْا یَوْمَ الْقِیٰمَةِ ؕ— اِنَّ اللّٰهَ بِكُلِّ شَیْءٍ عَلِیْمٌ ۟

७. काय तुम्ही नाही पाहिले की अल्लाह आकाशांची व जमिनीची प्रत्येक गोष्ट जाणतो. असे नाही होत की तीन माणसांमध्ये कानगोष्टी व्हाव्यात आणि त्यांच्यात चौथा अल्लाह नसावा आणि ना पाच माणसांमध्ये, व त्यांच्यात सहावा अल्लाह नसावा. कानगोष्टी करणारे याहून कमी असोत किंवा जास्त असोत, तो त्यांच्यासोबतच असतो. मग ते कोठेही असोत, मग कयामतच्या दिवशी त्यांना त्यांच्या कर्मांशी अवगत करविल. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे ज्ञान बाळगतो. info
التفاسير:

external-link copy
8 : 58

اَلَمْ تَرَ اِلَی الَّذِیْنَ نُهُوْا عَنِ النَّجْوٰی ثُمَّ یَعُوْدُوْنَ لِمَا نُهُوْا عَنْهُ وَیَتَنٰجَوْنَ بِالْاِثْمِ وَالْعُدْوَانِ وَمَعْصِیَتِ الرَّسُوْلِ ؗ— وَاِذَا جَآءُوْكَ حَیَّوْكَ بِمَا لَمْ یُحَیِّكَ بِهِ اللّٰهُ ۙ— وَیَقُوْلُوْنَ فِیْۤ اَنْفُسِهِمْ لَوْلَا یُعَذِّبُنَا اللّٰهُ بِمَا نَقُوْلُ ؕ— حَسْبُهُمْ جَهَنَّمُ ۚ— یَصْلَوْنَهَا ۚ— فَبِئْسَ الْمَصِیْرُ ۟

८. काय तुम्ही त्या लोकांना नाही पाहिले, ज्यांना कानगोष्टी करण्यापासून रोखले गेले होते, तरीही ते त्या मनाई केलेल्या कामाला पुन्हा करतात आणि आपसात अपराधाच्या, अन्यायाच्या आणि पैगंबराशी अवज्ञा करण्याच्या कानगोष्टी करतात आणि जेव्हा तुमच्याजवळ येतात, तेव्हा तुम्हाला त्या शब्दांत सलाम करतात, ज्या शब्दांत अल्लाहने सांगितले नाही, आणि आपल्या मनात म्हणतात की अल्लाह आम्हाला आमच्या अशा बोलण्यावर शिक्षा का नाही देत? त्यांच्यासाठी जहन्नम पुरेशी आहे, ज्यात हे लोक दाखल होतील, तेव्हा किती वाईट ठिकाण आहे! info
التفاسير:

external-link copy
9 : 58

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اِذَا تَنَاجَیْتُمْ فَلَا تَتَنَاجَوْا بِالْاِثْمِ وَالْعُدْوَانِ وَمَعْصِیَتِ الرَّسُوْلِ وَتَنَاجَوْا بِالْبِرِّ وَالتَّقْوٰی ؕ— وَاتَّقُوا اللّٰهَ الَّذِیْۤ اِلَیْهِ تُحْشَرُوْنَ ۟

९. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही कानगोष्टी कराल तर या कानगोष्टी अपराध, अतिरेक (उदंडता) आणि पैगंबरांची अवज्ञासंबंधी नसाव्यात. किंबहुना सत्कर्म आणि अल्लाहच्या भयासंबंध असाव्यात आणि त्या अल्लाहचे भय बाळगत राहा, ज्याच्याजवळ तुम्ही एकत्रित केले जाल. info
التفاسير:

external-link copy
10 : 58

اِنَّمَا النَّجْوٰی مِنَ الشَّیْطٰنِ لِیَحْزُنَ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَلَیْسَ بِضَآرِّهِمْ شَیْـًٔا اِلَّا بِاِذْنِ اللّٰهِ ؕ— وَعَلَی اللّٰهِ فَلْیَتَوَكَّلِ الْمُؤْمِنُوْنَ ۟

१०. (वाईट) कानगोष्टी सैतानाचे काम आहे, ज्यामुळे ईमानधारकांना दुःख व्हावे.१ वस्तुतः अल्लाहच्या मर्जीविना तो त्यांना काहीच नुकसान पोहचवू शकत नाही. आणि ईमान राखणाऱ्यांनी अल्लाहवरच भरवसा ठेवला पाहिजे. info

(१) अपराध, दुष्कर्म व पैगंबराची अवज्ञा या गोष्टींवर आधारित कानगोष्टी सैतानी काम होय, कारण सैतान या गोष्टींची प्रेरणा देतो, यासाठी की याद्वारे ईमान राखणाऱ्यांना दुःखी कष्टी करावे.

التفاسير:

external-link copy
11 : 58

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اِذَا قِیْلَ لَكُمْ تَفَسَّحُوْا فِی الْمَجٰلِسِ فَافْسَحُوْا یَفْسَحِ اللّٰهُ لَكُمْ ۚ— وَاِذَا قِیْلَ انْشُزُوْا فَانْشُزُوْا یَرْفَعِ اللّٰهُ الَّذِیْنَ اٰمَنُوْا مِنْكُمْ ۙ— وَالَّذِیْنَ اُوْتُوا الْعِلْمَ دَرَجٰتٍ ؕ— وَاللّٰهُ بِمَا تَعْمَلُوْنَ خَبِیْرٌ ۟

११. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्हाला सांगितले जाईल की सभा-बैठकांमध्ये जरा विस्तारपूर्वक बसा, तेव्हा तुम्ही जागा व्यापक करा. अल्लाह तुम्हाला विस्तार प्रदान करेल आणि जेव्हा सांगितले जाईल की उठून उभे राहा, तेव्हा तुम्ही उठून उभे राहा. १ अल्लाह तुमच्यापैकी त्या लोकांचे, ज्यांनी ईमान राखले आहे व ज्यांना ज्ञान दिले गेले आहे, दर्जा उंचाविल आणि अल्लाह (ते प्रत्येक कर्म) जे तुम्ही करीत आहात, (चांगल्या प्रकारे) जाणतो. info

(२) यात ईमानधारकांना सभा-संमेलनाचे शिष्टाचार सांगितले जात आहेत. इथे सभा (मजलिस) शी अभिप्रेत ती सभा, ज्यात ईमान राखणारे भलाई व नेकी प्राप्त करण्यासाठी जमले असावेत. सभा शिक्षा-दीक्षा हेतुस्तव असो किंवा जुमा (शुक्रवार) ची असो (तफसीर अल कुर्तबी) विस्तारपूर्वक बसा याचा अर्थ सभेचे क्षेत्र संकुचित राखू नका की ज्यामुळे नंतर येणाऱ्यांना उभे राहावे लागावे, किंवा इतरांना हटवून जागा करणे भाग पडावे. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, कोणीही दुसऱ्या माणसाला हटवून त्याच्या जागी बसू नये. यास्तव सभेचे क्षेत्र विस्तृत करा (सहीह बुखारी, किताबुल जुमआ, बाबु मुस्लिम, किताबुस सलाम)

التفاسير: